विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 8 March 2022

भीमाशंकर लेणी, जुन्नर ( पुणे )

 

भीमाशंकर लेणी, जुन्नर ( पुणे ) / Bhimashankar Caves, Junnar ( Pune ) 

 


भीमाशंकर लेणी, मानमोडी टेकडी, जुन्नर ( पुणे )
सातवाहनकालीन बौद्ध धर्मातील थेरवाद (हीनयान) पंथीय लेणी संख्येच्या दृष्टीने भारतातील सर्वांत मोठा लेणी–समूह आहे. जुन्नर हे ठिकाण पुण्यापासून ९० किमी अंतरावर कुकडी नदीकिनारी वसले असून अवतीभोवती सुमारे आठ-दहा किमी. च्या परिघात मानमोडी, शिवनेरी, मांगणी, हातकेश्वर, लेण्याद्री, दुधारे इत्यादी टेकड्यांनी वेढलेले आहे. यांतील काही टेकड्यांत प्राचीन बौद्ध लेणी खोदली आहेत.


जुन्नर लेणींचे साधारणतः नऊ समूह पाडता येतात. असाच एक समूह मानमोडी टेकडीवर आहे, ज्याचं नाव भीमाशंकर लेणी समूह आहे. या टेकडीत कुल तीन लेण्यांचे समूह आहेत. बाकीचे दोन लेण्या म्हणजे अंबा-अंबिका लेणी व भूतलिंग लेणी होय.


या समूहात महत्त्वाच्या १७ लेणी असून इतर आठ अपूर्ण लेणी आहेत. त्यातील लेणी क्रमांक २ हे चैत्यगृह असून बाकी सामान्य खोल्या आहेत. या समूहात १३ पोढीही आहेत. लेणी क्रमांक १ च्या दर्शनी भागात, मध्यभागी दोन स्तंभ व बाजूंस अर्धस्तंभ आहेत. याच्या मागे ओसरी असून मागील भिंतीत तीन खोल्या आहेत. लेणी क्रमांक २ या चैत्यगृहाच्या दर्शनी भागाची उंची १२.२० मीटर, रुंदी ६.१० मीटर असून, हे दोन भागांत विभागले आहे. लेण्याच्या ओसरीत पायऱ्या चढून गेल्यानंतर दोन्ही बाजूंस दोन स्तंभ व अर्धस्तंभ आहेत. स्तंभांस खाली कलश नसून ते दगडी बाकावर आधारित आहेत. बाकांस आतील बाजूने पाठ टेकण्यास कक्षासने व बाहेरील बाजूस वेदिकापट्टी कोरल्या आहेत. भीमाशंकर समूहातील लेणी क्रमांक ६ मधील मंडपात असणारा महाक्षत्रप नहपान याचा मंत्री अयन वत्स याचा लेख महत्त्वाचा ठरतो.

सन्दर्भ :
- लेणी महाराष्ट्राची ( प्र. के. घाणेकर )

No comments:

Post a Comment

! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !!

  ! ! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !! प्रस्तुत वंशावळीची मांडणी आपणास तीन टप्प्यात करावी लागेल. १] श्रीमन्नारायण...