विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 5 April 2022

कुडाळकर शिंदे देशमुख घराण्याला मिळालेली काही मोकसा वतने

 कुडाळकर शिंदे देशमुख घराण्याला मिळालेली काही मोकसा वतने





आमच्या शिंदे देशमुख कुडाळकर घराण्यातील पूर्वजांचा आम्हास सार्थ अभिमान आहे. श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या काळात आमच्या शिंदे देशमुख घराण्याने स्वराज्य रथ पुढे नेण्याचे कार्य केले आणि त्याची दखलही खुद्द छत्रपती शाहू महाराजांनी घेतली.त्याचाच परिपाक म्हणून कुडाळकर शिंदे देशमुखांना बरीच वतने , मोकसा , शेत सनदा, इनामे छत्रपती शाहू महाराज यांनी दिले. आज आम्हाला ही अप्रकाशित माहिती सादर करताना अत्यंत अभिमान आणि आनंद होत आहे.
आमच्या कुडाळकर शिंदे देशमुख घराण्याला मिळालेली काही मोकसा वतने खालीलप्रमाणे
सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील सोनगाव, आरडे, हुमगाव, सोमर्डी, हतगेघर, सनपाने इत्यादी गावांचा समावेश आहे.
आमचे पूर्वज राजश्री बहादूरजी शिंदे कुडाळकर ,
राजश्री मलोजी शिंदे कुडाळकर, राजश्री शाहाजी शिंदे कुडाळकर ( यांच्या उपस्थितीत वाईच्या पिसाळ देशमुखीचा वाद श्रीमंती छत्रपती शाहू महाराजांनी सोडविला आहे) आणि त्यांचे पुत्र राजश्री सर्जाराव शिंदे कुडाळकर या सर्वांना श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांनी वरील गावे मोकसा वतन म्हणून दिलेले अस्सल कागद.
( पुणे पुरलेखगार- शाहू दप्तर)
संकलन आणि लेखन
श्री श्रीनिवास राजेंद्र शिंदे देशमुख शिक्केकरी
कुडाळ परगणे जावळी प्रांत सातारा जिल्हा
संपर्क क्रमांक ९७६६३७९७८१

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...