रंगो नारायण:
पोस्त सांभार ::आशिष माळी
आपल्याला पावनखिंडीच्या बाजीप्रभूच्या इतिहास माहिती आहे पण त्यावेळी विशाळगड च्या किल्लेदार त्यावेळी रंगो नारायण होते.त्यांनी सिद्दी मसूद , सुर्वे जसवंतराव च्या फौजेला पराभव केला आणि महाराज विशाल गड वरबसुखरूप पोचले.विशाळगड सर्व किल्ल्यामध्ये बुलंद किल्ला , अर्ध्या बाजूला अक्खा कोकण उरलेल्या अर्ध्या बाजूला घाट..म्हणजे वेढा पडला तर तुम्हाला फक्त अर्धा च किल्ला लढवायचा आहे .आशा किल्ला फक्त प्रामाणिक माणसाकडे दयायला शिवाजी महाराजांचा मानस.
रंगो नारायण:पोतदार हे विशाळगड चे किल्लेदार होते. त्यांना अफझलखान ने खूप आमिषे दाखवली पण ते बांधले नाही . उलट त्यांनी महाराजांना मदत केली. राज्यभिषेकाच्या वेळी महाराजांनी त्यांना पालखीचा बहुमान दिला. ते सैदव स्वराज्याशी एकनिष्ठ राहिले. शंभू महाराज आणि राजराम महारांच्या काळात सुद्धा ते आणि त्यांची मुले एकनिष्ठ राहिले.. शंभू महाराजनांनी त्यांचे १६८३-८४ च्या वेळी खूप कौतुक केले होतहोते . एकटा विशाळगड असा होता जो मुघली आक्रमणाला जास्त बळी पडला नाही कारण जिंकायला अतिशय अव्वगड. राजाराम महाराज सुद्धा रायगड वरून निसटून विशाळगड ला गेले होते.त्याम्च्या नंतर त्यांचा कुटुंबांनी आणि वारसांनी सुद्धा स्वराज्याशी प्रामाणिक राहिले.रामचंद्र पंत बावडेकर पण इथेच वास्तव्यास होते.आणि शम्भू महाराज नंतर राजाराम महाराज येऊ पर्यंत ते "हुकूमतपन्हा" म्हणून किल्ल्यावरुन कारभार हाकला. सन 1692 त्यांच्या मुलगा काशी रंगनाथ आणि पंत प्रतिनिधींनी मिळून पन्हाळा जिंकला.
No comments:
Post a Comment