#डफळापूर शहर सांगली शहरापासुन ७० कि.मी.वर असुन जत या तालुक्याच्या शहरापासून १७ कि.मी.अंतरावर आहे. जत #संस्थानातील डफळापूर हे एक महत्त्वाचे शहर असल्याने या संपूर्ण शहराभोवती #कोट होता. #सटवाजीराजे #चव्हाण यांच्या काळातच ही तटबंदी बांधली गेली असावी. आजही बहुतांशी डफळापूर हे या कोटातच वसले आहे. आज ही तटबंदी मोठ्या प्रमाणात नष्ट झाली असली तरी काही ठिकाणी ही तटबंदी, बुरुज , कोटाचे मुख्य प्रवेशद्वार त्या शेजारील ढासळलेले बुरुज, कोटाचा लाकडी
डफळापूरचे #पाटील #सटवाजी #चव्हाण यांनी १६८० च्या सुमारास ३,००० मोहरा खंडणीच्या बदल्यात आदिलशाहीकडून #जत, #करजगी, #बार्डोल आणि #कणद यांची #देशमुखी मिळवल्यावर #डफळे #राजघराणे व #जत #संस्थान उदयाला आले. सिद्दी खवासखानकडून आणखी वतने विकत घेऊन त्यांनी जत संस्थान वाढविले. या जत संस्थाना अंतर्गत जत व डफळापूर ही दोन मोठी शहरे आणि ११७ खेडी समाविष्ट होती.#छत्रपती #संभाजी #महाराजांच्या मृत्युनंतर #सटवाजीराजे यांनी धनाजी जाधव व संताजी घोरपडे यांच्या बरोबरीने आपल्या १६००० सैन्यासह मुघल सेनेवर हल्ला केला. पेशवाईच्या काळात आऊसाहेब डफळे (१७०१–५४) यांनी पेशव्यांची अधिसत्ता मान्य करत संस्थानाचे स्वतंत्र कायम ठेवले
*पृथ्वीराज माने सरकार*
9146889612
No comments:
Post a Comment