विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 18 July 2022

घाटगे मराठा घराणे -भाग १

 


घाटगे मराठा घराणे -भाग १
- मराठे सरदारांमध्यें घाटग्यांचें कुटुंब प्रमुख आहे. हे मूळचे खटाव गांवचे राहणारे व मलवडीचे देशमुख. ब्राम्हणी राज्यांत त्यांस माण प्रांताची देशमुखी व सरदेशमुखी मिळाली. कामराजे घाटगे हा त्यांचा मूळ पुरूष. इब्राहिम आदिलशहानें स.१६२६ त नागोजी घाटगे यास सरदेशमुख व झुंजारराव हे किताब दिले. विजापूरच्या राज्यांतून त्यास जहागिरीहि पुष्कळ होत्या. “सर्जेराव”, “प्रतापराव” इत्यादि अनेक किताब या कुटुंबास मिळाले आहेत.
इ.स.१६३३ त दौलताबाद मोंगलांच्या हातीं लागल्या वर विजापुरचें सैन्य स्वदेशीं परत येत असतां त्याच्या मोहो बतखान नामक मोंगल सरदाराशीं ज्या चकमकी झाल्या त्यांपैकीं एकींत नागोजी घाटगे मारला गेला.
अवरंगजेब व मीरजुमला हे आदिलशहाच्या मुलखांत चालून आले तेव्हां सर्जेराव नांवाचा एक घाटगे विजापूरकरांकडून लढत होता (१६५७).
इ.स.१६५९ त विजापूर दरबाराकडून शिवाजी राजाच्या पारिपत्याकरितां पाठविण्यांत आलेल्या अफजुलखानाबरोबर झुंजारराव म्हणून एक घाटगे असून तो शिवरायांच्या हातीं सापडला होता. त्यास शिवरायांनी मोठया सन्मानपूर्वक विजापुरला रवाना केलें. या झुंजाररावाचा बाप शहाजी राजांचा मोठा मित्र होता. स. १६६१ च्या पावसाळयानंतर आदिलशहा कर्नाटकांतील बंडें मोडण्याकरितां त्या प्रांतीं गेला तेव्हां हा झुंजारराव त्याच्या बरोबर होता.
पुढें (१६७५) हा व निंबाळकर यांनीं शिवरायांनी नुकतींच घेतलेलीं पन्हाळा वगैरे ठाणीं विजापूरकरांस परत घेऊन दिली पण शिवरायांनी झुंजाररावाचा पराभव करून तीं ठाणीं पुन्हां काबीज केलीं १६७८ शाहूच्या कारकीर्दीत घाटगे हे कोल्हापूरकर संभाजीकडे गेले. परंतु कोल्हापूरकराशीं त्यांचें नेहमीं भांडण चाले म्हणून ते पेशव्याशीं मिळून मिसळून असत. खडर्याच्या लढाईंत घाटगे हे आपले पथक घेऊन पेशव्यांकडे हजर होते.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...