मराठा स्वराज्य मग ते शिवकालातील असो किवा पेशवेकाळातील असो किवा होळकर काळातील असो त्या वीरांचा इतिहास .जे मराठा स्वराज्यासाठी लढले त्या मराठा वीरांचा इतिहास
विनोद जाधव एक संग्राहक
Monday, 25 July 2022
क्षत्रप राजघराणे --------------१
क्षत्रप राजघराणे --------------१
पोस्तसांभार :: - प्राजक्ता देगांवकर
क्षहरात हे क्षत्रपांचे महाराष्ट्रावर राज्य करणारे पहिले परकीय घराणे होय. महाराष्ट्रात या क्षत्रपांनी सातवाहनांशी जोरदार संघर्ष केला. महाराष्ट्रातील सातवाहन सत्तेच्या अधःपतनाचे मुख्य कारणच क्षत्रपांचे सततचे हल्ले हेच होय.
काही इतिहास अभ्यासकांच्या मते क्षत्रप ही पदवी पर्थियन या सिथियन राज्याची द्योतक आहे. मूळ शब्द क्षत्रपावन असून त्याचा अर्थ भूपाल असा होतो. हिंदुकुश पर्वताच्या उत्तरेस बॅक्ट्रीयाचे राज्य होते तर बॅक्ट्रीयाच्या पश्चिमेस पर्थियनांचे राज्य होते. इ.स.पू. २३१ पासून मौर्य साम्राज्याला उतरती कळा लागलेली बघून या बॅक्ट्रीयाच्या शकांनी व पर्थियानांनी हिंदुस्थानावर हल्ले चढवून काही भाग जिंकून घेतला व त्याचा कारभार बघण्यासाठी काही भुपालांना नेमले तेच हे क्षत्रप.
भारतीय आणि पाश्चिमात्य साहित्यातून शक क्षत्रपांचे विस्तृत उल्लेख आपल्याला सापडतात. पाश्चिमात्य साहित्यात स्ट्रोबो, एरियन, प्लिनी, टोलेमी यांच्या लेखात तर पेरीप्लस या ग्रंथात शकांचा उल्लेख आलेला आहे, तर भारतीय साहित्यात महाभारत आणि पुराणांमध्ये शकांचा उल्लेख आलेला दिसतो. महाभारतामध्ये शक योध्ये भारतीय युद्धामध्ये दुर्योधनाच्या बाजूने लढल्याचे म्हणले आहे. तसेच शक, यवन, पहलव, बार्बर आणि किरत आदी सिंधू खोऱ्यात राहत असत असे उल्लेख महाभारतात आहेत.
क्षत्रपांनी उत्तर, मध्य आणि पश्चिम भारतावर काही काळासाठी राज्य केले. ते स्वतःस राजा, स्वामी व महाक्षत्रप अशी बिरुदे लावत. त्यांच्या बिरुदांवरून तसेच शिलालेख आणि नाण्यांवरून ते स्वतंत्र झाल्याचे स्पष्ट होते. या क्षत्रपांची अनेक घराणी भारताच्या वेगवेगळ्या भागात राज्यकारभार करत होती. त्यापैकी पंजाब, मथुरा, तक्षशिला येथील क्षत्रपांना पश्चिमी क्षत्रप असे म्हणत तर महाराष्ट्रात राज्य करणाऱ्या क्षत्रपांची क्षहरात आणि कार्दमक अशी दोन घराणी होती. त्यांनी इ.स. ७८ ते ३०४ या कालखंडात महाराष्ट्रात राज्य केले. महाराष्ट्राच्या नाशिक जुन्नर परिसरावर क्षहरात घराण्याचे राज्य होते. नाणकशास्त्रीय पुराव्यांवरून महाराष्ट्रातील पहिला क्षत्रप अघुदक वा अभेदक हा समजला जातो. त्याच्या नंतर भुमक, नहपान हे महत्त्वाचे राजे या घराण्यात झाले. क्षत्रपंची दुसरी शाखा असणाऱ्या कार्दमक घराण्यात चष्टन, रुद्रदामन हे महत्त्वाचे राजे होऊन गेले.
महाराष्ट्रात इ.स. ३०४ पर्यंत चष्टन घराण्याने राज्य केले, तर इ.स.३८८ पर्यंत रुद्रसिंह घराण्याने राज्य केल्याचे दिसते. याच काळात उत्तरेत गुप्त राजा चंद्रगुप्त दुसरा आणि तर दक्षिणेत असलेला वाकाटक राजा पृथ्वीसेन यांनी क्षत्रपांनविरुद्धची मोहीम उघडली. त्यांनी एकत्रित हल्ले करून इ.स.३९० च्या सुमारास क्षत्रपांचे राज्य नष्ट केले. यामुळेच गुप्त राजा चंद्रगुप्त विक्रमादित्य याने स्वतःला ‘शकारी’ म्हणजेच शकांचा विनाश करणारा असे बिरूद लावलेले आहे.
संदर्भ
१) सातवाहनकालीन महाराष्ट्र - डॉ. रा. श्री. मोरवंचीकर
२) प्राचीन भारत इतिहास आणि संस्कृती - डॉ. गो. बं. देगलूरकर
३) मुसलमानपूर्व महाराष्ट्र महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास - वा. कृ. भावे
Subscribe to:
Post Comments (Atom)
“कोरलाईचा किल्ला”.
१३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...
-
११ माशी अक्करमाशी असा उल्लेख असा येतो. आपण प्राचीन क्षत्रियांचे वंशज आहों असें मराठे म्हणतात. प्रचारांतल्या त्यांच्या आडनांवा...
-
## धनगर व माळी समाजातील लढवय्ये ## दामाजी थोरात postsaambhar:Udaykumar Jagtap ## ## ## नायगाव ,तालुका -पुरंदर जिल्हा -पुणे , गा...
-
*राणूबाई भोसले-जाधव* राणूबाई म्हणजे शंभूराजांची दुसरी आईच.शंभूराजांचा जन्म झाला त्या दिवशी बेभान होणाऱ्या म्हणजे "राणूबाई".त्यां...
No comments:
Post a Comment