______मराठ्यांच्या इतिहासाचा जर इंग्रज,पोर्तुगिज,मोंगल,आदिलशाही साधनांतून अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की,शिवराय व शंभूराजे यांचे नुसते नाव जरी ऐकले तरी यांची स्थिती अशी होत होती जसा वाघ जंगलात आल्यावर माकडांची जशी आवस्था होते.अगदी तशीच आवस्था या सर्व लोकांची होत होती.
मराठ्यांचा इतका दरारा व धसका या लोकांनी घेतला होता की,यांना जळी,स्थळी,स्वप्नी फक्त शिवाजी महाराज दिसायचे.
शिवरायांच्या एखाद्या सरदाराने जरी गोवा परिसर व कोकण किनारपट्टीवर कुठे हल्ला केला तरी यांना असे वाटायचे की आले शिवाजीराजे आले..!
यांच्या तात्कालीन कवींनी शिवरायांना जादू वगैरे येते,
ते साक्षात देवाचा अवतार आहेत,
ते एकाच वेळी अनेक ठिकाणी जावू शकतात,
या भारत देशात जर कुठे लढाई झाली तरी त्याचे सुत्रधार हे शिवाजी महाराजच आहेत अशीच या लोकांची धारणा होती..!
गोव्यात एका वेळी महाराजांनी एक आफाट गनिमी कावा केल्याचे उदाहरण अभ्यास करण्याजोगे आहे.हे मी बोलत नाही या लोकांचा पत्र व्यावहार बोलतो आहे.आमचे नशिब चांगले की निदान लोकांचा पत्र व्यावहार आपल्याकडे उपलब्ध आहे.त्यातून बराचसा इतिहास समोर आला या लोकांच्या पत्रव्यावहारात स्थळ व वेळ यांची जरी थोडीफार गफलत असेल तरी हे लोक खोट बोलणार नाहीत ते त्रयस्थ आहेत.त्यांच्याकडच्या सिस्टम अफलातून होत्या.आपल्या सारखी राम भरवशी व मुखोद्गत सिस्टम त्यांच्याकडे नव्हती ते सर्व लिहून ठेवायचे.पत्रांच्या मार्फत ते आपल्या राजाला,व्हॉईसरॉय,गव्हर्नर यांना ते कळवायचे.हबसानातील सिद्धी असतील,पोर्तुगिज,इंग्रज,डच या लोकांच्या वसाहती,राहती घरे,त्यांचे शासन हे वखाणण्याजोगे होते.घरांची व्यवस्थित मांडणी,सांडपाणी,पाणी,रस्ते,सुरक्षा यंत्रणा या प्रगत होत्या.त्यांनी आपल्यावर राज्य केले ते खुपच पुढचा विचार करुन केले याचा आदमास यांच्या पत्रव्यावहारावरुन येतो.या लोकांनी धर्माच्या नावाखाली खुप मोठ्या प्रमाणावर आपल्या हिंदू लोकांवर अत्याचार केले.पण १६६४ नंतर जेव्हा शिवराय व संभाजीराजांनी त्या परिसरात आक्रमणे केली.तेव्हा पासून या सर्व गोंधळावर आळा बसला हे प्रामुख्याने विचार करण्याजोगे आहे.
यातील एक पत्र येथे देत आहेत…!
“पोर्तुगिज व्हाईसरॉय आंतोनियु द मेलू द काश्चुं ह्याने १४ जानेवारी १६६४ रोजी पोर्तुगालला आपल्या राजाला लिहलेल्या पत्रात शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानावर मिळवलेला विजय यावर लिहिले आहे.”
तो लिहतो की….
“शिवाजी हा एक कष्टाळू राजा आहे.त्याने इनिझा मालुकु(iniza maluco) चे राज्य बळकावले.हा प्रदेश डोंगराळ असल्याने त्याचे त्याला सुलभतेने रक्षण करता येते.इदलशहाच्या सैन्याशी त्याच्या अनेक लढाया झाल्या.पण त्या सर्व लढाया त्याने जिंकल्या.गेल्या वर्षी मोंगलांचे एक बलाढ्य सैन्य शिवाजीवर चालून आले.त्याने डोंगराळ प्रदेशाचा आसरा घेऊन मोगलांशी युद्ध सुरु ठेवले.मोगलांना आपल्या सैन्याला रसद पोचविणे अशक्य झाल्याने त्यांना माघार घ्यावी लागली.शिवाजीच्या सैन्याने एका अरुंद खिंडीत गाठून त्यांची धुळधाण उडवून दिली.”
No comments:
Post a Comment