देशमुख
पोस्तसांभार :शुभम सरनाईक
देशमुख हे पद होते.
देशमुख, देशपांडे, पाटील, कुळकर्णी, मोहरीर, चौगुले, देसाई इत्यादी पदं ही वतनदारी पदांमध्ये मोडली जात ज्यांना देशक म्हणत. वतनदार म्हणजे पिढीजात एखादे काम करणारा ज्याला थेट सामान्य जनतेकडून कर वगैरे गोळा करून त्याच्या अधिकार क्षेत्रात राजाकडून प्रतिनिधी म्हणून संरक्षण वगैरे वेगवेगळ्या सुविधा पुरवाव्या लागायच्या. त्याला जनतेकडून गोळा केलेल्या करातूनच विशिष्ट टक्क्यात आपला वाटा किंवा वेतन/मोबदला मिळायचा.
पूर्वी छोटी छोटी गावं म्हणजेच त्याकाळातील मौजे मिळून एक परगणा असायचा. थोडक्यात आजच्या काळातील तालुका म्हणू शकू ज्यात ४०-२०० पर्यंत मौजे असायचे. अश्या परगण्याचा प्रमुख म्हणून देशमुख्य असे पद मुसलमानी रियासतीच्या पूर्वी निर्माण झाले. याच शब्दापासून देशमुख हा शब्द आला. देशमुख हा राजाकडून प्रतिनिधी म्हणून परगण्याचा जमाबंदीचा हिशेब ठेवीत, वसुलीवर देखरेख करत. त्याला मुलकी, दिवाणी, फौजदारी अधिकार असत. तसेच त्या परगण्यात तो गढी वगैरे बांधून थोडेफार सैन्य बाळगून परगण्यातील जनतेला संरक्षण देत. याच्यासाठी त्याला त्याने गोळा केलेल्या करातील २-५% इतका वाटा मिळायचा ज्यास रुसूम म्हणत. तसेच परगण्यातील लोकांकडून विशिष्ट वस्तू जसे तोरण, घट, जोडा, पासोडी, तूप, तेल, वगैरे बलुत्याप्रमाणेंच (जास्त प्रमाणांत) मिळत.
आता पेशवा म्हणजे मुख्यप्रधान. पूर्वी राजदरबारात प्रत्येक कामासाठी वेगळा व्यक्ती नेमला असायचा जसे कर, महसूल/मजमु वगैरे साठी मुजुमदार, परराष्ट्र सम्बन्ध ठेवायला डबीर वगैरे तसेच या सर्वांवर लक्ष ठेवायला पेशवा असायचा. पेशवा हा फारसी शब्द असून त्याच्या जागी भारतीय मुसलमानी रियासती वजीर हे नाव वापरत. पुढे शिवशाहीत याला पर्याय म्हणून मुख्यप्रधान हा शब्द योजला होता पण तो फक्त या पदांवरील लोकांच्या मुद्रांपर्यंतच सीमित राहिला. हे पद पूर्वी पिढीजात नव्हते परंतु पेशवे बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब यांनी ते छत्रपती शाहू महाराजांकडून वंशपरंपरागत भट घराण्यास मिळवून घेतले.
माहिती स्रोत: गावगाडा
चित्रस्रोत: गुगल
No comments:
Post a Comment