विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 6 August 2022

जगन्नाथ शंकरशेट मुरकुटे उर्फ नाना शंकरशेट


 जगन्नाथ शंकरशेट मुरकुटे उर्फ नाना शंकरशेट या मुरबाड येथे जन्मलेल्या मराठी माणसाने मुंबई घडवली आहे.
मुंबई हि कोणी गुजराती मारवाड्यानी घडवलेली नाही तर एका मराठी माणसाने घडवलेली आहे. "त्यांच नाव जगन्नाथ शंकरशेट मुरक्टे, जन्म- १० फेब्रुवारी १८०३ रोजी मुरबाड येथे झाला. जगन्नाथ शंकरशेट हे इंग्रजांना कर्ज देत होते, ते एक उद्योजक होते. मुंबई मध्ये शाळा, कॉलेजस त्यांनीच उभारली व महाराष्ट्रालाच नाहि तर देशाला विद्वानांच्या अनेक पिढ्या दिल्या. मुलींसाठी शाळा उभारुन शिक्षणाची सोय केली. याला सनातनी लोकांनी विरोध केला होता पण नाना शंकरशेट यांनी तो जुमानला नाही. पुढे नानांच्या पुढाकारातून परळ येथील एल्फिन्स्टन काॅलेज उभारण्यात आले. याच काॅलेज मधुन न्यायमूर्ती रानडे, दादाभाई नौरोजी असी मंडळी घडली. १८४५ मध्ये सर ग्रँट मेडिकल कॉलेज ची स्थापना केली व मराठी तरुणांना डाॅक्टरकीच शिक्षण मिळु लागल. भारताला अनेक दिग्गज देणारे जे.जे.स्कूल ऑफ आर्ट ची स्थापना केली. असी अनेक कार्य नाना शंकरशेट यांनी केली. मुंबई च्या उद्धारासाठी याच मराठी माणसाचा मोलाचा वाटा आहे, कोणा गुजराती मारवड्यांचा नाही. तर गुजराती मारवाडी यांनी स्वताच पोट भरल गडगंज पैसा कमावला व स्वताचा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, कौटुंबिक विकास या मुंबई च्या जिवावर केला. हे कोणी विसरु नये. आता नाना शंकरशेट यांच्या कार्या विषयी अधिक जाणून घेउयात. नाना शंकरशेट यांनी इंडियन रेल्वे असोसिएशनच्या स्थापनेत महत्वाची भुमिका बजावली. इसप्टेंबर १८३० मध्ये इंग्लंडमधील लिव्हरपूल ते मँचेस्टर या रेल्वेमार्गाच्या उद्घाटनाची माहिती नाना शंकरशेट यांना समजली आणि त्यांनी अशी गाडी आपल्या शहरातही हवी, असा ध्यास घेतला. आणि नानांनी १८४३ साली रेल्वेची कल्पना सत्यात उतरविण्यासाठी ग्रेट ईस्टर्न कंपनीची स्थापना केली. मुंबईत रेल्वे सुरू करण्याची संकल्पना पहिल्यांदा त्यांचेच मित्र जमशेटजी जिजिभोय यांच्याकडे मांडली. या दोघांनी मिळून १८४५ साली ‘इंडियन रेल्वे असोसिएशन’ची स्थापना केली. या माध्यमातून ते तत्कालीन ब्रिटिश सरकारला रेल्वे सुरू करण्यासाठी विविध प्रकारे समजवू लागले. त्याचच फलित म्हणजे, १ ऑगस्ट १८४८ रोजी ‘द ग्रेट इंडियन पेनिनसुला रेल्वे’ (GIP रेल्वे) ची स्थापना झाली. आणि त्यांच्या अथक प्रयत्नांतून १६ एप्रिल १८५३ रोजी आशिया खंडातील पहिली रेल्वे (Railway) 'बोरीबंदर ते ठाणे' या लोहमार्गावर धावली. त्यांच्या या कार्यामुळे त्यांना ‘भारतीय रेल्वेचे जनक’ म्हणून ओळखले जाते.
बॉंम्बे नेटिव्ह एज्युकेशन:-
भारतीय लोकांमध्ये शिक्षणाचा प्रसार झाला पाहिजे, या कारणा साठी नाना शंकर यांच्या पुढाकाराने एल्‌फिन्स्टनने १८२२ मध्ये हैंदशाळा व शाळापुस्तक मंडळ काढली, त्यांचे आधारस्तंभ नाना होते. यांनी ही पहिली शैक्षणिक संस्था स. का. छत्रे यांच्या साह्याने स्थापिली. पुढे हिचे १८२४ मध्ये बॉंम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीत रूपांतर झाले. शिक्षण प्रसारासाठी मुंबईत एका भारतीयाने स्थापन केलेली ही पहिलीच संस्था होती.
जगन्नाथ शंकरशेट मुरकुटे उर्फ नाना शंकरशेट यांनी मुंबई च्या विकासासाठी स्थापन केलेल्या संस्था ज्यातून मुंबई जा खरा विकास झाला.
जगन्नाथ शंकरशेट यांनी स्थापन केलेल्या संस्था :
१८४५ ला- सर ग्रॅंटच्या मृत्यूनंतर ग्रॅंट मेडिकल कॉलेजची मध्ये स्थापना करून येथे आंग्ल वैद्यक-शिक्षणाची सोय केली. १८४८ ला स्ट्यूडंट्स लिटररी व सायन्टिफिक सोसायटी. १८४९ ला- जगन्नाथ शंकरशेट यांनी मुलींची शाळा उघडली. १८५२ ला- बॉंबे असोसिएशन स्थापण्यात पुढाकार घेतला. १८५५ ला- विधी महाविद्यालयाचा पाया घातला. १८५७ ला- द जगन्नाथ शंकरशेट फर्स्ट ग्रेड ॲंग्लो व्हर्नाक्युलर स्कूल भारतीयांना कलाशिक्षण मिळावे, म्हणून सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या स्थापनेत सक्रिय भाग घेतला. जे.जे. हॉस्पिटलचा पाया घालून त्यांनी रुग्णसेवेस चालना दिली. बॉंबे स्टीम नेव्हिगेशन कंपनीची स्थापना केली.
जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे उर्फ नाना शंकरशेट यांनी भूषविलेली महत्वाची पद:-
मॅजिस्ट्रेट- पहिले देशी मॅजिस्ट्रेट. फेलो- मुंबई विद्यापीठ. ट्रस्ट- बॉंम्बे स्टीम नेव्हिगेशन कंपनी. विश्वस्त- एल्फिन्स्टन फंड. संस्थापक अध्यक्ष- बॉंम्बे असोसिएशन. संस्थापक- जगन्नाथ शंकरशेठ स्कुल, द मर्कंटाईल बॅंक ऑफ इंडिया. संचालक/अध्यक्ष- बॉम्बे नेटिव्ह डिस्पेन्सरी (पहिला धर्मार्थ दवाखाना ). अध्यक्ष- पोटसमिती (शिक्षण प्रसार समिती), डेव्हिड ससून रिफॉर्मेटरी इन्स्टिटयूट, हॉर्टिकल्चर सोसायटी, जिओग्राफिकल सोसायटी, बॉंम्बे स्टीम नेव्हिगेशन कंपनी, बादशाही नाट्यगृह. उपाध्यक्ष-स्कुल ऑफ इंडस्ट्रीज. आद्य संचालक- रेल्वे (मुंबई ते ठाणे पहिला रेल्वे प्रवास गोल्डन पासने). संचालकय- बॅंक ऑफ वेस्टर्न इंडिया, कमर्शिअयल बॅंक ऑफ इंडिया. संस्थापक सदस्य- जे. जे. आर्टस् कॉलेज. सदस्य- बोर्ड ऑफ कॉन्झरवंसी, मुंबई विद्यापीठ व्यवस्थापक मंडळ, सिलेक्ट समिती (म्युनसिपल कायदा व बिल), बोर्ड ऑफ एज्युकेशन, नेटिव्ह स्कुल बुक सोसायटी, द इनलॅंड रेल्वे असोसिएशन. एवढी महत्वाची पदे भुशवली व मुंबई खऱ्या अर्थाने विकास केला. ते मुरबाड येथील मराठी महान युगपुरुष जगन्नाथ शंकरशेट मुरकुटे. मुंबई बनवली ति मराठी माणसांनी बनवली आहे. तर गुजरात असो वा मारवाडी असो वा इतर सर्व परप्रांतीय यांनी स्वताच्या पोटाची खळगी भरली ती याच मुंबई मुळे. मुंबई येउन नोकरी धंदा करुन स्वताचा स्वताच्या कुटुंबाचा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, कौटुंबिक विकास केला तो याच मुंबईच्या जिवावर. त्यांच्या आयुष्यात मुंबई काढली तर काहिच उरणार नाही. व हि मुंबई आहे ती मराठी माणसांची आहे.


No comments:

Post a Comment

राजश्री शहाजीराजे भोसले आणि त्यांचे विश्वासू, सरदार मलोजी बिन तुकोजी रणनवरे

  राजश्री शहाजीराजे भोसले आणि त्यांचे विश्वासू, सरदार मलोजी बिन तुकोजी रणनवरे : सरदार मलोजी रणनवरे हे जिंती तालुका फलटण येथील पुरातन वतनदार....