विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 9 August 2022

इचलकरंजीत मराठेशाहीच्या पाऊलखुणा ……भाग २

 

इचलकरंजीत मराठेशाहीच्या पाऊलखुणा ……
लेखक ::संजय खूळ

भाग २
संताजी घोरपडे घराण्याने इचलकरंजी संस्थानचे संस्थापक नारो महादेव यांना लहानपणीच अनेक प्रकारचे शिक्षण दिले होते. नारो महादेव घोरपडे उर्फ नारोपंत यांनी घोरपडे घराण्याचे सेनापती संताजी राव यांना मोठी साथ दिली. नारोपंतांनी अनेक लढायांमध्ये पराक्रम दाखवून एक पराक्रमी सैनिक म्हणून ख्याती मिळवली. त्यांच्या पराक्रमाचे इनाम म्हणून इचलकरंजी संस्थानास आजचे आरग, मनेराजुरी, म्हापण, बहिरेवाडी शिपूर आधी गावे इनाम म्हणून मिळवली आणि संस्थानाचा नावलौकिक वाढला. नारोपंतांची ख्याति यामुळे दूरवर पसरली होती. संताजीचा नारोपंतवर विश्वास
कापशीकर घोरपडे घराण्याचा वेगळा इतिहास आहे. त्यांनी विजापूरच्या बादशहाची चाकरी सोडून शिवाजी महाराजांचा पक्ष धरला होता. त्यांचे पाचशे स्वारांचे पथक होते. पथकांनीशी हजर राहून म्हाळोजी घोरपडे शिवाजी महाराजांची चाकरी करीत. त्यांना संताजी, बहिर्जी व मालोजी हे तीन पुत्र होते. शिवाजी महाराजांनी तिघांना तीन तीन स्वतंत्र पथकाची जबाबदारी सांगून त्यांची साकरी हंबीरराव सेनापती कडे दिली होती. त्या तिघा भावात संताजी यांचा नावलौकिक विशेष होता. इचलकरंजी संस्थानाचा संस्थापक नारोपंत १८ वर्षाचे असताना शिवाजी महाराजांचे निधन झाले. त्या पुढील नऊ वर्षे संभाजी महाराजांनी राज्याची सूत्रे आपल्या हाती ठेवली. १६८९ मध्ये औरंगजेबाने संभाजी महाराजांना कैद केले. त्यावेळी झालेल्या लढाईत संताजी यांचे वडील म्हाळोजी ठार झाले. त्यामुळे अधिक जबाबदारी संताजी यांच्यावर आली. संभाजी महाराजांच्या कारकीर्दीमध्ये संताजी रावांच्या पथकास अनेक स्वाऱ्या व लढाया कराव्या लागल्या. या प्रत्येक वारीत नारोपंत हजर राहात असल्याने त्यांना लष्करी कामाचा अनुभव येऊ लागला. संभाजी महाराजांना वीरमरण आल्यानंतर राजाराम महाराज गादीवर बसले. त्यांनी १६९१ मध्ये संताजीरावांकडे सेनापती पदाची सूत्रे सोपवली. सेनापती पद मिळाल्यानंतर संताजी रावांच्या आपण पराक्रमाची परंपरा सुरू झाली. नारोपंतवर संताजी यांचा पूर्ण विश्वास असल्यामुळे आपल्या दौलतीचा संपूर्ण कारभार त्यांच्याकडे सोपविला होता. इचलकरंजी संस्थानाच्या लिहिलेल्या बखरीमध्ये संताजी यांच्याबरोबरीने अनेक महत्त्वपूर्ण कामे नारोपंत यांनी केल्याचे उल्लेख आहे.

No comments:

Post a Comment

राजश्री शहाजीराजे भोसले आणि त्यांचे विश्वासू, सरदार मलोजी बिन तुकोजी रणनवरे

  राजश्री शहाजीराजे भोसले आणि त्यांचे विश्वासू, सरदार मलोजी बिन तुकोजी रणनवरे : सरदार मलोजी रणनवरे हे जिंती तालुका फलटण येथील पुरातन वतनदार....