इंदोरचे होळकर घराणे – भाग ९
पेशवेकालीन हिंदवी स्वराज्याचे आधारस्तंभ महाराजा शिवाजीराव होळकर, इंदोरनरेश!
प्रशांत सुमति भालचंद्र ठोसर | मराठा नाणी संग्राहक, लेखक, व्याख्याते | नाणेघाट
संपूर्ण हिंदुस्थानवर आपले अधिराज्य गाजवणारी ब्रिटिश सत्ता आणि सत्ताधीश आतापर्यंत स्थिरस्थावर झालेले होते. त्यांच्या विरोधात देशातील स्वातंत्र्यसैनिकांनी १८५७ साली केलेला सुप्रसिद्ध उठाव देखील त्यांनी दमनशक्तीच्या जोरावर मोडून काढला होता. शिवछत्रपतींनी पेटवलेली स्वातंत्र्यज्योत विविध राजघराण्यांत आता बरीचशी मंद होऊन अस्तित्वापुरतीच तेवत राहिली होती असे म्हणण्यास नक्कीच प्रत्यवाय आहे
महाराजा शिवाजीराव होळकर! शिवाजीरावांचा जन्म हा ११ नोव्हेंबर १८५९ या दिवशी झालेला. हे तुकोजीराव दुसरे यांचे सुपुत्र. त्यांच्या आईचे नाव होते महाराणी अखंड सौभाग्यवती पार्वतीबाईसाहेब. वडील तुकोजीराव महाराजांच्या मृत्यूनंतर ते १७ जून १८८६ रोजी होळकरशाहीच्या राजगादीवर विराजमान झाले. ते यावेळी २७ वर्षांचे तरुण महाराजा होते. राज्यावर आल्यानंतर ते लगेचच व्हिटोरिया सम्राज्ञीच्या विशेष निमंत्रणावरून इंग्लंड येथे सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी गेले. तिथे त्यांना सम्राज्ञीतर्फे ’घपळसहीं ॠीरपव उेाारपवशी ेष ींहश डींरी ेष खपवळर’ या पदवीने सन्मानित करण्यात आले. महाराजा शिवाजीरावांनी राज्यपद स्वीकारल्यानंतर लगेचच दिवाणबहादूर रघुनाथराव यांची प्रशासकीय कारभार सांभाळण्यासाठी नेमणूक केली. १८६५ मध्ये त्यांनी प्रथम गिरीजाबाईसाहेब, नंतर वाराणसी बाईसाहेब, चंद्रभागा बाईसाहेब आणि सीताबाईसाहेब यांच्यासोबत लग्न केलं. त्यांना एकूण २ मुले आणि ६ मुली होत्या. मात्र एकूणच शिवाजीरावांचा कारभार हा फारसा यशस्वी ठरू शकला नाही आणि लवकरच ब्रिटिश सरकारने राज्याची घडी सावरण्यासाठी इसवीसन १८९९ मध्ये एका वेगळ्या राजनैतिक अधिकार्याची – ठशीळवशपीं – नेमणूक केली. वडील तुकोजीरावांप्रमाणेच शिवाजीरावांनी विविध प्रकारची / वशीळसपी ची नाणी पाडली होती असे आढळून येते. थेट पुण्यश्लोक अहिल्याबाईंनी मल्हारनगर टांकसाळीची (ज्यांवर छोट्या आकाराचा सूर्य / मार्तंड चिन्ह असायचे तसेच राज्यकर्त्याचे नाव नसायचे) पाडलेली चांदीची नाणी, रुपये हे त्यांच्यानंतरच्या राज्यकर्त्यांनी पण तसेच अनुकरण करून पाडले होते. सूर्यचिन्ह हे मल्हारनगर टांकसाळीचा छाप / ाळपीांरीज्ञ म्हणूनच ओळखले जाते. मात्र आता महाराजा शिवाजीरावांनी त्या छोट्या आकाराच्या सूर्यचिन्हाऐवजी नाण्याच्या कडेला (लेश्रश्रेी) वर्तुळाकार पद्धतीने देवनागरी लिपीत स्वतःचे नाव ‘महाराज शिवाजीराव होळकर’ आणि मध्यभागी मोठ्या आकाराचा सूर्य छापून त्याखाली विक्रमसंवत छापले होते. ही पूर्ण सूर्यचिन्हांकित नाणी विक्रमसंवत १९४७ ते १९५५ (इसवीसन १८९० – १८९९) अशी सुमारे ९ वर्षे सातत्याने पाडलेली दिसून येतात.
या प्रकारची नाणी ही अत्यंत देखणी वाटावीत अशीच होती. यामध्ये २ आणे
(१/८ रुपया), ४ आणे (१/४ रुपया), ८ आणे (१/२ रुपया) आणि एक रूपया पाडलेला
आढळतो. इसवीसन १८९७ मध्ये शिवाजीरावांनी होळकरशाहीच्या राजेशाही पगडीसह
स्वतःची प्रतिमा असलेला / झेीीींरळीं रुपया छापला आहे. अतिशय सुबक, देखणा
आणि उत्कृष्ट पद्धतीने मशिनद्वारे पाडलेला हा नजराणा छाप रुपया नाणी
संग्राहकांसाठी एक मोठेच आकर्षण आणि अभिमानास्पद गणला जातो.
शिवाजीरावांच्या कारकीर्दीत पण विविधांगी चांदीची, तांब्याची नाणी पाडली
गेली होती. यातील अगदी सुरुवातीच्या काही नाण्यांवर, नाण्याच्या मध्यभागी
बसलेल्या नंदीच्या छबीसह कडेला ‘श्रीमंत महाराज होळकर सरकार’ या
लिखावटीसोबत नंदीच्या पायाखालील बाजूस ‘इंदोर’ आणि मागील बाजूस ‘पावआणा सं
(विक्रमसंवत) १९४३’ असे लिहिलेले पावआण्याचे नाणे, तसेच इंदोर शब्दाऐवजी
‘श्रीमंत महाराज शिवाजीराव होळकर’ आणि नंदीच्या पायाखाली ‘इंदोर’ आणि काही
नाण्यांवर ‘१९४३’ हे विक्रमसंवत लिहिलेले पावआणे पण छापलेले आढळतात. ही
नाणी वडील तुकोजीराव यांच्यानंतर लगेचच राजगादीवर आलेल्या शिवाजीराव
महाराजांच्या कालखंडातील आहेत.
याशिवाय कालांतराने ‘श्रीमंत महाराज होळकर सरकार बहादुर’ हे शब्द मध्यभागी
बसलेल्या नंदीच्या सभोवती आणि मागील बाजूला तीन ओळीत ‘इंदोर पावआणा संवत
१९४८’ असे छापलेले पावआणे पण आढळतात. ही पावआण्याची मशिनद्वारे पाडलेली
नाणी जवळपास १६-१७ वर्षे तरी छापलेली आढळून यातात. अशीच अर्धाआणा मूल्याची
याच धाटणीची नाणी पण छापली गेली होती. गंमत म्हणजे यातील पावआणा तसेच
अर्धाआणा हे मूल्य असलेल्या बाजूची लिखावट एकवर्ष तर चक्क उलट्या अक्षरात
छापली गेली होती (एीीेी लेळपी). म्हणजेच नाण्याची ही बाजू आपण आरशासमोर
धरून वाचली तरच यावरील लिखाण सरळपणे वाचता येते. अजून एक गमतीदार प्रकारचे
तांब्याचे नाणे आपणास बघावयास मिळते ते म्हणजे या नाण्यावर चक्क शिवाजीराव
महाराजांचे नाव चुकून ‘सयाजीराव’ होळकर असे छापले गेले आहे. आता सयाजीराव
म्हटलं की, आपल्याला पटकन बडोदानरेश सयाजीराव महाराजच आठवतात परंतु येथे ही
नावाची चूक कशी झाली असावी आणि तरीही ही नाणी चलनात कशी आली असावी हा
देखील संशोधनाचा विषय आहे. असो. याचसोबत शिवाजीरावांनी तुकोजीरावांनी
पाडलेल्या नजराणा पद्धतीच्या नाण्यांबरहुकूम वैशिष्ट्यपूर्ण, आकर्षक अशी
चांदीची नाणी ही पाडली होती. यावर एकमेकांना छेदणार्या खांडा तलवार आणि
भाला यांच्या वरच्या बाजूस कमीअधिक प्रमाणात ज्वाळा दिसणारा सूर्य तसेच
नाण्याच्या कडेला (लेश्रश्रेी) वर्तुळाकार श्रीमंत महाराज शिवाजीराव होळकर
तसेच त्याच्या आतील बाजूस ‘मल्हारनगर’ हे टांकसाळीचे नाव, विक्रमसंवत आणि
पर्शियन आकड्यात हिजरीसन देखील छापलेले दिसून येते.
यामध्ये रुपयासोबत अर्धा रुपया, पाव रुपया, १/८ रुपया पण पाडला गेला होता. याही प्रकारच्या नाण्यात कदाचित डायमेकर च्या भाषिक अज्ञानामुळे एका नाण्यावर ‘सीवीजीराव’ असे त्रुटित प्रकारे नाव छापलेले आढळते. तर अशी ही महाराजा शिवाजीराव होळकर यांची ही विविध प्रकारची नाणीसंपदा व त्यांचा संग्रह हा खरोखरीच नाणीसंग्राहकांना मनापासून तृप्त करणारा आहे यात शंकाच नाही. महाराजा शिवाजीराव यांचा मृत्यू १३ ऑटोबर १९०८ रोजी राजधानी महेश्वर येथे झाला.
No comments:
Post a Comment