"गांजवेचा अपरिचीत इतिहास"
लेखन ::Balasaheb Argade Patil
अहमद शाह अब्दाली ह्या अफगाणिस्तान मधून आलेल्या दरोडेखोर शत्रू पासून आपल्या माय भुमीचे रक्षण करण्यासाठी मराठयांनी पानिपत, हरियाणा येथे महाभयंकर युद्ध केले,
आजच्याच दिवशी म्हणजे १४ जानेवारी १७६१ रोजी मकरसंक्रांतिच्या दिवशी मराठयांनी एकमेकांना तिळगुळ देऊन
हे पनिपत युध्द करुन सैन्य माधारी परताना पुण्यनगरीला वळसा मारुन पुढे मार्गस्थ होणार होते. पण पेशव्यानी सैन्य युध्द करुन थकलेल्या, जखमी सैनीकांना बैलगाडीतून जाताना पुण्यातुन वळसा मरुन जाण्यापेक्षा एक सोपा जवळचा मार्ग करण्यासाठी मुळामुठा नदीवर तात्पुरत्या स्वरुपाचा पण मजबुत लाकडी पुल बांधण्याचे ठरवले आणि पुण्यानगरीतुन मोठमोठी लाकड गोळा केली, मोठमोठ्या ओंडकेच्या सहाय्याने पुल बांधला आणि त्याच पुलावरुन सैन्य निजोखमिक पण स्व-घरी परतले.
त्यामुळे याच पुलाला पुढे जाऊन "लकडी पुल" नाव पडले.
लकडी पुलाला लागुनच नदीकिनारी "विठ्ठल मंदीर" होते, मंदीराला लागुन सरदार कै. गोदाजी गांजवे वंशज कै. सखाराम गांजवे परिवाराची जमिन होती, गांजवे त्या जमिनीत शेतीसह, म्हशीचा गोठा, दुध व खव्याची भट्टी होती, तसेच मोठ्या प्रमाणात लाकडाची वखाराही होती व त्या वखारीत मोठमोठे लाकडी सुळक्यांचा, खोडाचा निलाव चालवायचे, त्यावेळेस स्वराज्याच्या कामासाठी लकडी पुल बांधण्यासाठी कै.सखाराम गांजवे व त्याच्याबंधुनी आपल्या वखारीतली सर्व लाकडे, ओंडके, खोड इत्यादी सामुग्री लकडी पुलासाठी खर्ची केली, गांजवे यांचा दानशूर पणा पाहुन पेशव्यांनी गांजवेना "लकडवाला गांजवे" ही उपाधी दिली. पुढे जाऊन उपाधी वरुन कै. सखाराम गांजवेच्या मुलाचे नाव लकडावाला वरुन लक्ष्मणराव म्हणून प्रसिद्ध झाले.
मुळता सरदार कै. गोदाजी गांजवे आडकिल्याची टोलधार, नानेघाटाची टोलधार वसुली व टेहाळनीसाठी सरदार गांजवे परिवार नेमणूकीस होता. इ.न. १७०० सालात स्वराज्याची कामगिरी बजवताना सरदार कै. गोदाजी गांजवे यांना आडगाव, नाशिक. वरुन पाटणच्या आरमारात कोकणच्या समुद्र सिमेचे रक्षण करण्यासाठी पाठवायचे ठरवले, सरदार कै. गोदाजी गांजवे यांचा परिवार मोठा आसल्याने आपल्या मुलांना व नातेवाईकांना इ.न. १७०० सालात पुण्यानगरीत पाटील इनामावर व व्यावसायासाठी कै.गंगाजी गोदाजी गांजवे यांच्या कुटुंबांला स्थाईक करुन पुढे सरदार कै. गोदाजी गांजवे पाटणच्या आरमारांत सामिल झाले.
पुण्यानगरीतु आजही नवि सदाशिव पेठेतील गांजवे वाडीत, सरदार कै. गोदाजी गांजवे याचे वंशज रहात आहेत.
आज सण साजरा करत असताना आपण ह्या विरांचे स्मरण करू व अपरिचीत इतिहासाचा परिचय करुन घेवु.
राष्ट्ररक्षक मराठे
" जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे "
सरदार कै. गोदाजी गांजवे याचे वंशज
मा. नगरसेवक कै.शामराव विठ्ठलराव गांजवे
यांचा नातु श्री राहुल पांडुरंग गांजवे पाटील
यांची मुलगी मास्टर कु. पुर्वी राहुल गांजवे
शिवकालीन युध्द कला व मर्दानी खेळ
राष्ट्रीय खेळाडु, राष्ट्रीय पंच व प्रशिक्षक
No comments:
Post a Comment