विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 24 January 2023

शहाजी महाराजसाहेब

 शहाजी महाराजसाहेब



२३ जानेवारी रोजी शहाजी महाराजसाहेब यांचा स्मृती दिन.२३ जानेवारी १६६४ रोजी महाराजसाहेबांचा काळ झाला.
त्यांची समाधी मुंबई-बंगलोर राष्ट्रिय महामार्गावरील दावणगिरी पासुन ५० कि मी आत होदेगिरि या गावी आहे.
महाराजसाहेब यांचा जन्म पराक्रमी मालोजीराजे व उमाबाई राणीसाहेब यांच्या पोटी इ सन १५९४ साली झाला.पराक्रमी व मुत्सद्दी मालोजीराजे व विठोजीराजे यांच्या मार्गदर्शनाखाली आपली कारकिर्दिची सुरुवात केली ते त्यानी मागे कधी पाहिलेच नाही. इ स १६१०-११ मध्ये राजेलखुजीराव जाधवराव यांची कन्या जिजाऊ यांच्यासोबत देवगिरीवर संपन्न झाला. त्यानंतर मुस्लीम शाहीच्या राजवटीत मराठ्यांचे सामर्थ्य वाढवण्यासाठी राजेलखुजीराव व शहाजी महाराजसाहेब यानी विरोधाचा गनिमीकावा करुन मराठ्याना उर्जितावस्था मिळवुन दिली परंतु इतिहासकारानी या विरोधाच्या गनिमीकाव्याचे विँडबन वैमनस्यात करुन टाकले. २५ जुलै १६२९ रोजी या गनिमीकाव्याचा एक मोती निजामशहाने निखळवला, परंतु शहाजीमहाराजसाहेब न डगमगता धीरोधात्तपणे व सावधतेने पाऊले टाकत मोगलाच्या अधिपत्याखाली जाधवरावानी खतम केलेल्या निजामाच्या घराण्यातील एका निजाम बालकास मांडीवर बसवुन तब्बल 3 वर्ष स्वतंत्र राज्यकारभार केला.यातुन त्यांचा दुरदृष्टीता आणी आपल्या भुमिला गुलामगिरीतुन मुक्त करण्याचे गुण दिसतात म्हणजेच स्वराज्याचे संकल्पक शहाजीमहाराजसाहेबच हेच इतिहासकार विसरले.पहिला प्रयत्न फसला परंतु दुसर्याँदा मात्र त्यांचे दोन बलाढ्य पुत्र संभाजीराजे व बालशिवबाराजे आणी जीजाऊ ( या स्वराज्याच्या प्रेरणास्थान) होत्या.जुलमी मुस्लिम राजवटीला गुंगारा देत व विरोधाचा गनिमीकावा करत एक नाही दोन स्वराज्याची बीजे पेरली,जोपासली व वाढविण्यासाठी आपल्या बलाढ्य पुत्राना मोलाचे योगदान दिले तरीदेखिल इतिहास या अशा महान,मुत्सद्दी,पराक्रमी,धीरोदात्त,आणी दोन स्वराज्याचे संकल्पकाकडे कानाडोळा करतो .
त्यांची युद्धनिती,राजनिती,न्यायनिती,17 भाषेवरील निर्विवाद प्रभुत्व,कुशल गनिमीकावा ,दुरदृष्टीपणा आणी कुशल संघटन कौशल्य या आणी असंख्य गुणामुळे मराठ्यांची 2 स्वराज्य उभी राहिली.ज्या भुमीत मराठ्याना श्वास घेण्यासाठी मुक्तता नव्हती त्या भुमीत मराठ्यांची दोन स्वतंत्र स्वराज्य उभी राहीली त्याचे प्राथमिक श्रेय हे शहाजी महाराजसाहेब यानाच जाते. त्यानी मोगल,निजाम आणी आदिलशाही या 3ही राजवटीच्या अधिपत्याखाली कार्य केले परंतु लक्ष एकच होते मराठ्यांचे संघटन आणी स्वराज्यनिर्मिती.तसेच सतत व्यस्त असुनही बालशिवबाराजे व आऊसाहेब यानी वाढवलेल्या स्वराज्या घडी,बालशिवबाराजे यांचे शिक्षण याची जबाबदारी लिलया पार पाडली.
बालशिवबाराजे यांचे खेडेबारे येथे असताना महाभास यांची शिक्षक म्हणुन नेमणुक करुन आऊसाहेबांच्या देखरेखीखाली सुरु केले आणी इ स १६३८ ते १६४२ या काळात बालशिवबाराजे व आऊसाहेबाना कंपिली येथे बोलावुन पुढच्या शिक्षणाची जातिने लक्ष देऊन पुर्ण केले याच्या शिवभारतात नोँदी आहेत.तसेच याच काळात पुणे येथे महाराजसाहेबानी बालशिवबाराजे व आऊसाहेबासाठी लालमहाल बांधुन घेतला आणी इ स १६४२ मध्ये पुणे परगण्यात बालशिवबाराजे यांच्या दिमतीला आपले सर्वोत्तम माणसे दिली.
शहाजी महाराज साहेब यांचे पणतु छत्रपती थोरले शाहु महाराज यांनी इ सन १७३२-३३ साली शहाजी महाराज साहेब यांच्या समाधीचा जिर्णोद्धार व दिवबत्तीची सोय केली...त्यानंतर आजतागायत महाराष्ट्राच्या भुमीतुन शहाजी महाराज साहेब यांच्या समाधी जिर्णोद्धार व दिवबत्तीची सोय केलेली दिसत नाही.
"एक सर्वोत्तम पिता,सर्वोत्तम पती,सर्वोत्तम स्वराज्यसंकल्पक ,सर्वोत्तम राजा आणी सर्वोत्तम योद्धा कसा असावा याचे एकमेव उदाहरण म्हणजेच शहाजीमहाराजसाहेब,त्यांच्या स्मृतीदिना निमित्त मानाचा त्रिवार मुजरा आणी विनम्र अभिवादन!!"
.......मराठा स्वराज्यसंकल्पक शहाजीमहाराजसाहेब याना कोटी कोटी प्रणाम ......
!!"जय शहाजीराजे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराय जयोस्तु मराठा"!!

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...