विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 27 January 2023

लक्ष्मीबाई रासे पोवाडा

 

लक्ष्मीबाई रासे ' हा

पोवाडा झाशीतील रहिवासी मदनेश यांनी रचला होता . मदनेश यांचे आजोबा हे राणीचे दरबारी होते त्यांनी युद्धात प्रत्यक्ष सहभागही घेतला होता . त्यांचे त्यावेळचे अनुभव त्यांनी आपल्या नातवाला सांगितले होते . त्यावरून नातू मदनेश याने पोवाडा रचला होता . त्यातील भाव , भाषा सौंदर्य , राणीच्या प्रराक्रमाचे सुंदर वर्णन करते
तन कवच, कसे कामिन सिर टोप कमानी |
दस्ताने दोउ कर क्रमान लीने पानी |
तलवार चलावे मे चंचला लजानी |
जहाँ तहाँ लगी मुंडन को झुंड गिरानी |
निज सैन छोड आगेको करौ पयानी |
संगे न कोऊ आय धंसी फौज बिरानी |
है अति निसंक तेजरूप गन की खानी |
श्री बाई लक्ष्मी है प्रत्यक्ष भवानी |
तिने अंगात चिलखत घातले , मस्तकावर कमानदार मुंडासे बांधले , दोन्ही हातावर लोखंडी मोजे चढवले , हातात कृपाण घेतले , तलवार तर अशी चालवली की विजेलाही लाज वाटली , तिची तलवार जिथे जिथे पडती , तिथे तिथे मुंडक्यांचे ढीग पडले .
आपले सैन्य मागेच सोडून तिने पुढेच प्रयाण केले , तेव्हा तिच्याबरोबर कोणीही न्हवते , ती एकटीच पुढे सैन्यात घुसली . निर्भय , तेजस्वी , सद्गुणांची खान अशी श्री लक्ष्मीबाई म्हणजे साक्षात देवी भवानीच !
संदर्भ :- झाशीची राणी लक्ष्मीबाई :- प्रतिभा रानडे
कुंचची लढाई हरल्यानंतर काल्पीला परत जात असताना झाशीची राणी पाणी पिण्यासाठी एका विहिरीजवळ थांबतात त्यावेळी तिथे गोडसे भटजी पाणी काढत होते. राणीला पाहिल्यावर ते राणीसाठी विहिरीतून पाणी काढायला लागतात त्यावेळी राणी त्यांना थांबवते व म्हणते " तुम्ही विद्वान, तुम्ही पाणी काढून मी पिणार नाही. मीच पाणी काढते "
गोडसे भटजी ' माझा प्रवास ' या त्यांच्या पुस्तकात लिहितात पाणी पिऊन झाल्यावर राणी गोडसे भटजींना सांगते
" खरं म्हणजे मी अदशेर आट्याची धनीण. मजला रांडमुंडेंस ( विधवेस ) काही एक गरज न्हवती . परंतु सर्व हिंदूंच्या धर्मसंबंधे अभिमान म्हणून या कार्यास प्रवृत्त जाहले . परंतु ईश्वरे यश दिले नाही !"
🚩 झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना मानाचा मुजरा 🚩
श्री . नागेश सावंत .

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...