कवि भूषण यांनी थोरले बाजीराव पेशवे यांच्यावरील रचलेला एक वीररसयुक्त छंद
लेखन ::श्री नागेश सावंत
बाजे बाजे राजे ते निवाजे है नजर करि बाजे बाजे राजे काढि काटे असि भत्ता सौं /
बाँके बाँके सूबा नालबंदी दै सलाह करें बाँके बाँके सूबा करै एक एक लत्ता सौं /
गाढ़े - गाढ़े गढ़पति काटे रामद्वार दै दै गाढ़े – गाढ़ - गाढ़े गढ़पति आने तरे कत्ता गढ़पति सौं /
बाजीराव गाजी तैं उबारयो आइ छत्रसाल आमिल बिठायो बल करिकै चकत्ता सौं //
छंदाचा अर्थ :-
बाजीरावांनी
काही काही राजांना नजराणे देऊन आपलस केले तर काहींना तलवारीच्या जोरावर
आपलस केले – जिंकून घेतलं. भल्या भल्या साहसी वीरांनी कर भरून बाजीरावांशी
तह केले , तर काहींनी लाथा खाल्या व नंतर तह केले. ताकदवान राजांना तर
बाजीरावांनी थेट स्वर्गलोकीच धाडले, तर काहींना कत्याच्या टोकाखाली दाबले.
धर्मवीर बाजीरावांनी छत्रसालांना संकटातून वाचविलं आणि औरंगजेबापेक्षाही
उच्च स्थानी आरुढ केलं.
साजी दल सह सिताराममहाराज चलै वाजत नगारा पढै धारधार साथ से /
राव उमराव राना देस देसपति भागे तजि जती गढन गढोई दसमाथ से /
पैग पैग होत भारी डावाँडोल भूमिगोल पैग पैग होत दिग्गमैगल अनाथ से /
उलटत पलटत गिरत झुकत उसकत सेवपन नंदपाहिन के हाथ से //
छंदाचा अर्थ :-
बाजीराव
आणि सेनेसहित साताराछत्रपती निघतात , तेंव्हा पर्वत कोसळण्याचा आणि
विद्युतपाताचा भास होतो, रावणासारखे बलाढ्य राजे किल्ले टाकून दडी मारतात ,
भूमीचा तोल ढाळतो , रक्षक हतबल होतात , बाजीच्या कर्तुत्वांन शेषनागही
हलतो , वाकतो उठतो , तडफडतो .
नागेश सावंत
शिवराजभूषण :- केदार फाळके
शिवभूषण :- निनाद बेडेकर
भारतीय टपाल खात्याने थोरले बाजीराव पेशवा यांच्यावर काढलेले टपाल तिकीट व प्रथम दिवस आवरण ( FIRST DAY COVER )
No comments:
Post a Comment