कराडचे सरदार डुबल घराणे भाग ४
अग्नोजींचे वंशज सध्या धुळगाव येथे वास्तव्यास आहेत. अग्नोजींना माधवराव पेशव्यांचे सासरे शिवाजी बल्लाळ जोशी यांनी दंडोबाच्या पायथ्याशी कपटाने मारले. त्यानंतर त्यांच्या पत्नी ताराबाई सती गेल्या. त्यांची समाधी मिरजेत आहे.चारशे वर्षांची लष्करी परंपरासाळोखे-डुबल घराण्याला चारशे वर्षांहून अधिक काळाची लष्करी परंपरा आहे. बाळोजी, शिदोजी, शिवाजी, अग्नोजी, नाथाजी, आनंदराव, हणमंतराव, अमृतराव या व्यक्तींनी मराठेशाहीत पराक्रम गाजवला. साळोखे-डुबल घराण्याची पराक्रमाची ही परंपरा मराठेशाहीच्या अस्तानंतर आजतागायत टिकून आहे. पहिल्या महायुध्दात धुळगांवच्या रामचंद्रराव बळवंतराव आणि ज्ञानोबा बळवंतराव यांनी मोठा पराक्रम गाजवला. रामचंद्र यांनी पहिल्या महायुध्दात केलेल्या कामगिरीबद्दल त्यांना पदके मिळाली होती. दुसरे महायुध्द, भारत-चीन युध्द, भारत-पाकिस्तान युध्द, कारगील युध्द अशा विविध लढायांत डुबल घराण्यातील व्यक्तींनी पराक्रम गाजवला आहे. सन 1971 च्या भारत-पाकिस्तान युध्दात धुळगांव येथील विश्वासराव डुबल हे शहीद झाले. आजही कराड, बांबवडे, नरवाड, चरेगाव, धुळगांव येथील 250 हून अधिक डुबल व्यक्ती लष्करात विविध पदांवर कार्यरत आहेत.स्वातंत्र्यलढय़ात सहभागडुबल घराण्याने मराठेशाहीत स्वराज्य रक्षणासाठी काम केले. ब्रिटीशकाळात इंग्रजांच्या जुलमी राजवटीला विरोध करण्यासाठी डुबल घराण्यातील व्यक्तींनी काम केले आहे. कराड, चरेगाव, धुळगांव येथील काही व्यक्तींनी चलेजाव चळवळीत सहभाग घेतला. भूमिगत देशभक्तांना डुबल मंडळींनी आश्रय दिला होता.
No comments:
Post a Comment