विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 30 March 2023

।। रयतेचा राजा शिवछत्रपती ।। भाग १३

 



।। रयतेचा राजा शिवछत्रपती ।।
भाग १३
रयतेचा राजा
छत्रपती शिवरायांनी सतराव्या शतकात मुघली सत्तेला आव्हान देत एक स्वतंत्र राज्य घडविले.शिवरायांमुळे त्या काळातील हिंदूस्थानातील जनतेत स्वातंत्र्याची लाट आली.छत्रपती शिवरायांनी हिंदू धर्माचे,संस्कृतीचे रक्षण केले पण त्यांनी इतर धर्माचा पण तेवढाच आदर केला.छत्रपतींच्या आरमारात इब्राहिमखान,दौलतखान हे सर्वोच्य पदावर होते.सिद्दी हिलालने आपल्या पाच पुत्रासह पन्हाळगडाच्या लढाईत मोठा पराक्रम गाजविला.सिद्दी इब्राहिम हा अफजलखान भेटीच्या वेळी छत्रपतींच्या अंगरक्षकापैकी एक होता.काझी हैदर हा शिवाजीराजांचा खास सचिव व वकील होता.मदारी मेहतर हा शिवरायांचा विश्वासू नोकर होता.दर्यासारंग हा छत्रपतींच्या आरमाराचा पहिला सुभेदार होता.शिवरायांच्या तोफखान्यातील जवळपास सर्व गोलंदाज(तोफची)मुसलमान असत.त्यामुळे छत्रपती शिवराय हे केवळ हिंदूचे राजे नव्हते तर ते सर्व रयतेचे राजे होते हे सिध्द होते.छत्रपती शिवरायांनी इस्लामी राजसत्तेशी संघर्ष केला पण इस्लामी प्रजा तसेच इतर धर्मीयांशी ते आपूलकीने वागले,या महान राष्ट्रपुरूषाला आज आपण धर्माच्या चौकटीत अडकवून ठेवणे कीतपत योग्य आहे ?,याचा खरोखर गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे.
शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर १२ दिवसात जिजाबाईंचे निधन झाले.अशा वेळी शोकमग्न न होता छत्रपतींनी वेगवेगळ्या मोहिमा आखल्या. कर्नाटकची प्रसिध्द मोहिम ही त्यापैकी एक होय.
कर्नाटकच्या मोहिमेवरून परत आल्यानंतर छत्रपतीं आजारी पडले व शके १६०२ रुद्रनाम संवत्सरे चैत्र शुद्ध पौर्णिमा, हनुमान जयंती, दि. ३ एप्रिल १६८० या दिवशी महाराजांचे निधन झाले.सभासद च्या बखरीत पुढीलप्रमाणे उल्लेख आहे.ते दिवशी पृथ्वीकंप जाहला.गगनी घूमकेतू उदेला.उल्कापात आकाशाहून जाला.रात्री जोड-इंद्रधनुष्ये निघाली.अष्टदिशा दिग्दाह होऊन गेल्या.श्रीशंभुमहादेवी तळ्याचे उदक रक्तांबर जाले.पाण्यातील मत्स्य बाहेर पडून अमासवणी उदक जाहाले.ऐशी अरिष्टें जाहाली.मग राजियाचे कलेवर चंदनकाष्टें व बेलकाष्टें आणून दग्ध केलें
छत्रपतींच्या आयुष्यातील प्रत्येक प्रसंगावर हजारो पाने अपुरी पडतील,पुढील कालात मी सविस्तरपणे याबद्दल लिहिणार आहे.
।। प्रौढप्रतापपुरंदर कुळवाडीभुषण,बहुजनप्रतिपालक,
क्षत्रीयकुलावतंस सिंहासनाधिश्वर महाराजाधिराज राजा
शिवछत्रपती की जय।।
छत्रपति शिवरायांची रायगडावरील समाधी
सांभार; ;http://www.marathidesha.com/

।। रयतेचा राजा शिवछत्रपती ।। भाग १२

 



।। रयतेचा राजा शिवछत्रपती ।।
भाग १२
छत्रपतींचा राज्याभिषेक
सर्वसामान्य रयतेला न्याय देण्याकरिता सर्वोच्य सत्ताकेंद्र निर्माण करणे आवश्यक होते.तसेच राज्याभिषेक करून त्यांना स्वतंत्र राज्याची स्थापना करावयाची होती.राज्याभिषेकाची तयारी कित्येक महिने रायगडावर चालू होती.राज्याभिषेक सोहळ्यावेळी काही तथाकथित अतिविद्वान धर्मपंडितांनी आणि महाराजांच्या अष्टप्रधान मंडळीतील काही लोकांनी महाराजांच्या क्षत्रियपणाबद्दल प्रश्न उपस्थित केले.शेवटी बाळाजी आवजी यांनी राजस्थानातील उदयपूरला जाऊन,महाराज हे सिसोदिया राजपूत वंशाचे आहेत हे सिध्द केल्यानंतर अष्टप्रधान मंडळीचा विरोध मावळला.नोकर राजांच्या क्षत्रियपणाबद्दल प्रश्न उपस्थित करतो यापेक्षा मराठेशाहीचे दुर्दैव ते कोणते? असाच प्रकार कोल्हापूरच्या राजर्षि शाहू महाराजां संदर्भात झालेला आहे,त्याचे सविस्तर वर्णन राजर्षि शाहूंच्या लेखात आहे.
सन २९ मे १६७४ पासून राज्याभिषेकासाठी विविध धार्मिक कार्यक्रम होऊ लागले.मुख्य राज्याभिषेकाचा सोहळा ६ जून इ.स.१६७४(शालिवाहन शके १५९६ ज्येष्ठ,शुद्ध त्रयोदशी,आनंदनाम संवत्सर)रोजी रायगडावर संपन्न झाला.तर २४ सप्टेंबर १६७४,ललिता पंचमी अश्विन शु.५ आनंद संवत्सर शके १५९६ या दिवशी तांत्रिक पद्धतीने राजांनी स्वत:ला आणखी एक राज्याभिषेक करून घेतला. सभासदाच्या बखरीत या सोहळ्याचे खूप सुंदर वर्णन आहे.सभासदाच्या लेखानुसार या सोहळ्यात एक करोड बेचाळीस लक्ष होन एवढा खर्च झाला.राज्याभिषेक समारोहाबद्दल सभासद म्हणतो,येणे प्रमाणे राजे सिंहासनारूढ जाले.'या युगी सर्व पृथ्वीवर म्लेंच्छ बादशाहा मर्हाटा पातशहा येवढा छत्रपती जाला.ही गोष्ट काही सामान्य जाली नाही.'
श्री शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा राजधानी रायगडावर झाला.त्याचे पडसाद सातासमुद्रापार युरोपपर्यंत निनादले.हा राज्याभिषेक रोखायचे धाडस आलमगीर औरंगजेबालाही झाले नाही.राज्याभिषेक सोहळा सुरु असताना,स्वराज्याच्या सीमेकडे डोळा वर करुन पहायचे धाडसही चार पातशाह्यांना झाले नाही.इतका प्रचंड दरारा आणि दहशत शिवरायांची,त्यांच्या मराठी सेनेची होती. राज्याभिषेकावेळी शिवरायांनी शिवराज्याभिषेक शक सुरू केला आणि शिवराई हे चलन जारी केले.राज्यव्यवहार कोश बनविला,नवी दंडनिती,नवे कानुजाबते तयार केले.
छत्रपति शिवरायांचे रायगडावरील शिल्प
सांभार ;http://www.marathidesha.com/

।। रयतेचा राजा शिवछत्रपती ।। भाग ११


 
।। रयतेचा राजा शिवछत्रपती ।।
भाग ११
सांभार :www.marathidesha.com
किल्ल्यावर अचानक हल्ला केल्यामुळे मुघल सैनिकांत गोंधळ माजला.किल्ल्यावर मोठी हातघाईची लढाई झाली.किल्लेदार उदयभान राठोड व तानाजी मालुसरे यांच्यात मोठी लढाई झाली.लढताना हातातील ढाल तुटल्यामुळे तानाजीने डाव्या हातावर शेला गुंडाळून त्यावर तलवारीचे वार झेलेले.
शेवटी दोघेही जखमी झाल्यामुळे खाली कोसळले.तानाजी धारातीर्थी पडल्यामुळे मराठी मावळ्यांमध्ये गोंधळ उडाला,याचवेळी सूर्याजी मालुसरे आणि शेलारमामा यांनी मुख्य दरवाज्यातून प्रवेश करून निकराची लढाई करून किल्ला काबीज केला.रात्रीच्यावेळी गडावरील गवताच्या गंज्या पेटवून राजगडावर छत्रपतींना किल्ला जिंकला गेल्याचा इशारा दिला.कोंढाणा इ.स.४फेब्रुवारी,१६७०रोजी मध्यरात्री मराठ्यांच्या ताब्यात आला. कोंढाण्याचे संपूर्ण युध्द हे रात्री झाले.
सभासदाच्या बखरीत या युध्दाचा पुढीलप्रमाणे उल्लेख आहे.तानाजी मालुसरा म्हणून हजारी मवळियांचा होता.त्याने कबूल केले की,'कोंडाणा आपण घेतो',असे कबूल करुन वस्त्रे,विडे घेऊन गडाचे यत्नास ५०० माणूस घेऊन गडाखाली गेला.आणि दोघे मावळे बरे,मर्दाने निवडून रात्री गडाच्या कड्यावरून चढवले.गडावर उदेभान रजपूत होता.त्यास कळले की,गनिमाचे लोक आले.ही खबर कळून कुल रजपूत कंबरकस्ता होऊन,हाती तोहा बार घेऊन,हिलाल (मशाल),चंद्रज्योती लावून बाराशे माणूस तोफाची व तिरंदाज,बरचीवाले,चालोन आले.तेव्हा मावळे लोकांनी फौजेवर रजपुतांचे चालून घेतले.मोठे युद्ध एक प्रहर झाले.पाचशे रजपूत ठार जाले.उदेभान किल्लेदार खाशा त्याशी व तानाजी मालुसरा यांशी गाठ पडली.दोघे मोठे योध्दे,महाशूर,एक एकावर पडले.तानाजीचे डाव्या हाताची ढाल तुटली.दुसरी ढाल समयास आली नाही.मग तानाजीने आपले डावे हाताची ढाल करुन त्याजवर वोढ घेऊन,दोघे महारागास पेटले.मोठे युध्द झाले,एकाचे हातें एक तुकडे होऊन फिरंगीच्या वारें पडले.दोघे ठार झाले.
मग सुर्याजी मालूसरा(तानाजीचा भाऊ),याने हिंमत धरून,कुल लोक सावरुन उरले राजपूत मारिले.किल्ला काबीज केला.आणि गडावर पागेचे खण होते त्यांस आग लाविली,त्याचा उजेड राजियांनी राजगडाहून पाहिला आणि बोलले की,'गड घेतला,फत्ते जाली'!असे जाहालें.तों जासूद दूसरे दिवशीं वर्तमान घेऊन आला कीं,'तानाजी मालसुरा यांनी मोठे युध्द केलें.उदेभान किल्लेदार यास मारिले आणि तानाजी मालसुरा पडला.'असें सांगितलें.गड फत्ते केला असें सांगताच राजें म्हणूं लागले की,'एक गड घेतला,परंतू एक गड गेला!'असे तानाजीसाठीं बहूत कष्टी जाहाले.
कोंढाणा किल्ला जिंकल्याची बातमी छत्रपतींना समजल्यानंतर अत्यंत दु:खी झालेल्या राजांनी"गड आला पण सिंह गेला"असे उद् गार काढले.त्यांनी कोंढाण्याचे नाव बदलून सिंहगड असे ठेवले.छत्रपतींनी आपल्या या सवंगड्याचे शव उमरठ या तानाजींच्या गावी पाठविले,ज्या मार्गावरून तानाजींचे शव गेले,तो मार्ग 'मढेघाट' या नावाने ओळखला जातो.आपल्या धन्याच्या वचनाला जागून किल्ला ताब्यात घेणारा तानाजी खरोखरच सिंह होता.
सिंहगडावरील तानाजी मालुसरे यांचे स्मारक

।। रयतेचा राजा शिवछत्रपती ।। भाग १०

 


।। रयतेचा राजा शिवछत्रपती ।।
भाग १०
सांभार :www.marathidesha.com
कोंढाणा सिंहगडाची लढाई
आग्र्याहून सुटल्यानंतर छत्रपती शिवरायांनी मोठ्या मोहिमा आखून मुघलांच्या ताब्यातील तेवीस किल्ले घेण्याचे ठरविले.सुरूवातीला त्यांनी कोंढाणा किल्ला घ्यायचे ठरवले.कारण कोंढाणा किल्ला स्वराज्यातील मध्यवर्ती किल्ला होता,या किल्ल्याच्या साह्याने बारा मावळावर ताबा ठेवणे शक्य होते.कोंढाणा किल्ला जिंकण्याची जबाबदारी तानाजी मालुसरे यांनी आपल्या शिरावर घेतली.
रायगड जिल्ह्यातील उमरठ(पोलादपुरजवळ)गावचे असणारे तानाजी मालुसरे यांचे मुळ गाव सातारा जिल्ह्यातील,जावळी तालुक्यातील गोडोली होय.तानाजी मालुसरे छत्रपतींचे बालपणीचे सवंगडी होते.आपला मुलगा रायबा याच्या लग्नात व्यस्त असलेल्या तानाजींनी ,"आधी लगीन कोंढाण्याचे मग लगीन रायबाचे" असे म्हणत कोंढाणा ताब्यात घेण्याचा विढा उचलिला.
कोंढाण्याचा किल्लेदार उदयभान राठोड हा एक शूर राजपूत होता.त्याच्या दिमतीला १५०० हशमांची फौज होती.४ फेब्रुवारीच्या रात्री(माघ वद्य नवमी)राजगडावरून निघालेले मराठा सैन्य गुंजवणी नदी पार करून सिंहगडाच्या पायथ्याला पोहचले.दिवसासुध्दा चढण्यास अवघड असणारा द्रोणगिरीचा कडा तानाजींनी कोंढाण्यावर चढाईसाठी निवडला.भयाण काळोखी रात्री मर्द मावळे दोरखंडाच्या साह्याने द्रोणगिरीचा कड्यावरून वर चढू लागले.कडा चढत असताना दोर तुटून कित्येक मावळे दरीत पडले पण शेवटी पाचशेवर मावळे कढा चढण्यात यशस्वी झाले.
द्रोणागिरी कडा(सिंहगड),याच मार्गाने तानाजी मालुसरे
आपल्या मावळ्यासह दोरखंडाच्या साह्याने कोंढाण्यावर चढले होते

#सिंहगड_चा_रणसंग्राम_१७०२_१७०३ #औरंगजेब_विरुद्ध_मराठे

 

सचिन लेखन :सचिनदादा पवार 





आपल्या नाकाम सरदारांपुढे हतबल होऊन गेली ३ वर्षे खुद्द औरंगजेब बादशाह सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात भटकत होता.
एक एक गड कोट हस्तगत करत (मुळात लाच देऊन) तो आता सिंहगडाच्या पायथ्याशी आला होता.
सिंहगड बद्दल मोगल इितहासकार साकी मुसतैदखान म्हणतो की “वास्तवीक पाहता तो किल्ला (सिंहगड) इतका मजबूत आहे की परमेश्वरानेच तो मीळवून द्यावा, नाही तर, िकतीही प्रयत्न करा तो सर होणे शक्यच नाही.”
औरंगजेब कितीही दृढनिश्चयी असला तरी ही सिंहगडाचा ही वारसा जवलनंत संघर्षाचा होता. सल्तनत काळात इ.स. १३३५ मध्ये मोहम्मद तुघलक विरुद्ध महादेव कोळी जमातीतील नागनायक ह्याने तब्बल ८ महिने हा गड लढवला होता.
डिसेंबर १७०२ च्या अखेरीस २७ तारखेस मोगलांनी सिंहगड ला वेढा घातला.
औरंगजेबाची छावणी गडाच्या पायथ्याशी पडली होती. मोगलांचे मोर्चे गडाच्या दिशेने सरकत होते. दरबारातील बातमी पत्रावरून असे दिसते की, शंकराजी नारायण, सचीव हा १ जानेवारीपयȊत सिंहगडवर होता. गडावरील सवर् व्यवस्था लावून देऊन त्याने सिंहगड सोडले .
मुगलांच्या बातमीपत्रात किल्लेदाराचेनाव बंधजी असे दिले आहे. तो धनाजी जाधवच्या भाऊबंधांपैकी होता, असे म्हटले आहे.
किल्ल्या भोवती मोर्चा बसवून औरंगजेबाने किल्ल्या समोरील टेकडीवर तोफा चढिवल्या. वेढ्याचे काम चालिवण्यासाठी बादशहाने निरनिराळ्या ठिकाणाहून तोफा मागीवल्या.. या तोफा वीशालगड, ब्रह्मपुरी, पेडगाव, अहमदनगर येथून आणण्यात आल्या होत्या. बादशाही छावणीत असलेले सैन्य वेध्यासाठी कमी पडत असावे असे िदसते. बादशहाने िंसहगडाभोवती, पुणे-िंसहगड मागार्वर िशवापूर आिण इतर िठकाणी ठाणी कायम ठेवली. वेध्याच्या कामासाठी त्याने इतर प्रदेशातील किल्लेदारांना आिण फौजदारांना आपापली
पथक घेऊन छावणीत रुजू होण्यासाठी हुकम पाठिवले . चाकणचा किल्लेदार अमामुल्लाखान, रायगडचा किल्लेदार िशविंसग, धारूरचा किल्लेदार उजबेगखान इत्यादी अिधकारी मुगल छावणीत येऊन दाखल झाले . वेढा चालवण्याची मुख्य जबाबदारी, बादशहाच्या तोफखान्याचा प्रमुख तरिबयतखान याच्याकडे देण्यात आली. बादशहाचा सुप्रसिद्ध सेनापती झुल्फिकारखान हाही चार फेब्रुवारीला येऊन बादशहाला िमळाला. त्याचीही नेमणूक िंसहगडासमोरील ठाण्यावर करण्यात आली.
बादशहाच्या या हालचालीला प्रतिकार करण्यासाठी मराठ्यांनी एक मोठी योजना आखली. तीचे स्वरूप जितके व्यापक तितकेच प्रभावी होते. िंसहगडकडे येणारी रसद अडिवणे, िवशालगड ब्रम्हपुरी, पेडगाव इत्यादी िठकाणांहून िंसहगडाकडे येणाऱ्या तोफा गडापयȊत न पोहोचतील असे प्रयत्न करणे. या तोफा आणणाऱ्या मोगल पथकांवर हल्ले करणे, आिण खुद्द बादशाही छावणी भोवती सतत आकर्मणे करून दहशतीचे वातावरण िनमार्ण करणे हा मराठ्यांच्या योजनेचा कवळ एक भाग होता.
समकालीन इतिहासकारांनी व वेढ्याचे तपशील फार
दिले नाहीत. इतिहासकार भीमसेन सक्सेना हा त्यावेळी झुल्फिकारखानाच्या छावणीत होता. झुल्फिकारखान
हा मराठयांचा पाठलाग करून बादशहाच्या छावणीत आला होता. सिहगडच्या वेढ्याचे वणर्न करताना भीमसेनने मराठ्यांनी मोगल फौजांची ठीकिठकाणी कशी अडवणूक केली याचे पुढील प्रमाणे वणर्न कले
आहे :––
"बादशहा स्वतः कोंडाणा जिंकून घेण्यासाठी निघाला.
(२ डिसेंम्बर १७०२) या कामासाठी लागणाऱ्या तोफा आिण इतर सामग्री खेळण्याहून (िवशालगड) आणण्याचे काम फत्तेउल्लाखान आलमगीर शाही यास देण्यात आले रहमतपुराच्या जवळ मराठयांनी फत्तेउल्लाखान वर मोठा किठण प्रसंग आणला. बादशहाच्या आदेशा ने झुल्फिकारखानाने फत्तेउल्लाखान यास मदत कली."
इकडे सिंहगडच्या वेढ्याचे काम चालू होते.
भीमसेन सक्सेना पुढे लिहतो की
"मागे जसवन्तिंसग याने (इ.स.१६६३ मध्ये) ज्या टेकडीजवळ मोर्चे घातले होते तेथेच तरिबयतखान याने मोर्चे बांधले . जुल्फीकारखानाने किल्ल्याच्या पायथ्याशी बादशहाची गाठ
घेतली. िशवापूरच्या बाजुने नवीन मोर्चा उभे करण्याची बादशहाने जुल्फिफकारखानास आज्ञा कली.”
ही वरील हकीकत जुल्फिकारखान हा िंसहगडाहून खानदेशाकडे जाण्याच्या पूवीर्ची आहे.
साकी मुसतैदखान हा ही त्यावेळी बादशाही छावणीत हजर होता. त्याने सिंहगडासंबंधी थोडक्यात पुढील प्रमाणे लिहले आहे:
किल्ल्याच्या बुरुजासमोर एक टेकडी होती. तरिबयतखानाने त्यावर तोफा चढिविल्या. काही दिवस त्याने तोफांचा मारा केला आिण शत्रूंचे तट बुरूज आिण घरे दारे उध्वस्त केली.”
पण मोगल दरबारातील बातमीपत्रात वेढ्याचे तपशील बरेच आढळतात.
मराठ्यांनी बादशहास एवढा त्रास दिला होता की त्यास फक्त वेढ्याचे नियोजन न करता छावनीचे नियोजन ही करावे लागे. किल्ल्याच्या आसमंतातील वाटा व ठाणे वरही चौकी पहारे बसवावे लगे त्यानुसार त्याने एक जानेवारीस शीवापूरच्या ठाण्यावर मन्सूरखान, किल्ल्याच्या दरवाज्यासमोर अमानुदुल्लाखान, किल्ल्याच्या पलीकडे अिमनखान यांस नेमावे लागले.
त्याच वेळेस मराठ्यांच्या छावणी भोवती छापेमरी मुळे मोगल छावणीत धान्याची महगाई ही झाल्याची नोंद आहे .
मोगलांनी सिंहगडास वेढा दिला खरा पण मराठी पथकांमुळे त्यांना स्वतः ही छावणीत कोंडून घ्यावे लागले. वेढ्या व्यतिरिक्त मोगल छावणीभोवतीही चौक्यांचा बंदोबस्त करावा लागला.
(४जानेवारी १७०३ चे बतमीपत्र)
खरतर मोगल छावणी म्हणजे सर्व वस्तूंची तयारी, पण आता मोगल छावणीत ती बात राहिली न्हवती. किल्ल्या वरील मराठ्यांच्या चिवट प्रतिकाराच्या उत्तरादाखल त्यांना छावणी व्यतिरिक्त इतर किल्ल्यातून तोफा मागवाव्या लागत होत्या. व त्यासाठी त्यांनी विशाळगड अहमदनगर त्याच बरोबर ब्रम्हपुरीच्या छावाणीतून ही त्याला तबबलल दोन वेळा तोफा मागवाव्या लागल्या. व त्याच बरोबर वेध्याचे कामासाठी चाळीस मण सरब व बंदुकीची दारू आिण पाचशे लोखंडी गोळे ही मागवले.
(७/१३/२०/२५ जानेवारी ची बातमी पत्रे)
एवढी जययत तयारी करून ही मोगलांच्या हाती विशेष काही लागले नाही. सिंहगड च्या वेढ्याचे किंमत औरंगजेब मोगली सेनाधिकारी व मनसबदार ह्यांच्या रणांगणातील मृत्यू स्वरूपात चुकवत होता. मोगल दरबारातील बातमी पत्राच्या नोंदी प्रमाणे " सोळा जानेवारी रोजी मुहमद जमाल हा सिहगडच्या वेध्यात गोळा लागून ठार झाला. व फेब्रुवारीच्या एक तारखेस मोगलांच्या पायडळातील एक हजर मनसबदार गौतम हजेरी हा ठाण्यावर बंदोबस्तास असताना चकमित ठार झाला.
व्ह मोगलांसाठी ह्याच्या पेक्षा शरमेची गोष्टी ह्या की त्यांचे बडे बडे अधिकारी मराठ्यांच्या कैदेत पडत होते. (उदा. दाखल म्हणजे) त्यातीलच एक म्हणजे ख्वाजाखान (तुकताजखानाचा भाऊ) हा मराठ्यांच्या कैदेत पडलयाची नोंद २९ जनेवरी १७०३ च्या बतमीपत्रात मिळते.
त्यामुळे छावणीतील इतर मोगल सरदार बिथरले होते व कोण्ही स्वतः हुन पुढे येऊन कामगिरी घेत न्हवते. म्हणून की काय बादशहास लांबून लांबून लांबून अधिकारी आणून वेढ्याच्या कामास नेमावे लागत होते.
१७ व १४ जनेवारी चौ बतमीपत्रा नुसार औरंगजेबास गुलबर्गा येथील किल्लेदारास पुण्यातील ठाण्यावर नेमावे लागले व रायगड चा किल्लेदार शिवसिंग ह्यास छा वणीत बोलुवून वेढ्याच्या कामास जुंपवे लागले.
त्यातही मराठ्यांचा जोर एवढा वाढला होता की बादशहास छावणी भोवती भिंत बांधावी लागली.
(२६ जानेवारी १७०३ चे बातमी पत्र)
मराठ्यांचा उपद्रव हा दुहेरी होता. किल्ल्यावरील मराठे कधीही रात्री अपरात्री वेढ्यातील चौक्यांवर छापा घालीत तर परिसरात पसरलेल्या मराठी तुकड्या अचानक कधीही छावणी वर धाड टाकत.
मराठयांच्या ह्या त्रासाने बादशाह ही गर्भगळीत झाला होता म्हणून की काय त्याने च्या जन्मजात संशयी स्वभावाला अनुसरून त्याच्या शयनगृहा भोवती असलेल्या बंधुकंधारी तुकडीतून २० हिंदू बरकनदाजां ऐवजी मुसलमान बरकनदाज नेमले
(मोगल छावणीतील बातमी पत्रे - ०२ फेब्रुवारी १७०३)
शेवटी ह्या सगळ्या त्रासास कंटाळून त्याने व्हरांड खानदेशात मराठ्यांच्या मागावर असलेल्या झुल्फिकार खानास परत बोलावून सिंहगड वेढ्याच्या बंदोबस्तास बोलवावे लागले. परंतु तिकडे मराठ्यांनी नर्मदा ओलांडल्याने बादशहाने पुन्हा झुल्फिकार खानाची नियुक्ती मराठ्यांच्या मागावर परत केली.
ही घटना अतिशय त्वरेने म्हणजे झुल्फिकार खानाच्या छावणीत येण्याचा एक आठवड्यातच झाली असे ४ ते ११ फेब्रुवारची १७०३ चीमोगल बतमीपत्री सांगतात.
आता काही पर्याय शिल्लक नसल्याने बादशहास स्वतः जातीने वेढ्यात लक्ष घालावे लागले व पुन्हा सम्पूर्ण वेढ्याचे चौफेर नवी व्यवस्था करावी लागली. व त्याने १६ फेब्रुवारी १७०३ रोजी मोगलखान ह्यास छावणी पासून ते औरंगाबादे पर्यंत च्या मार्गावर संरक्षण अधिकारी नेमले गेले .
व स्वतः आता वेढ्यातील ठाण्यावर जाऊन मोर्चे तपासत असे. असेच १८ फेब्रुवारी रोजी मोर्चे तपासत असताना मराठ्यांनी वरून त्याच्या स्वारीवर तोफ गोळे उडवले होते पण केवळ देव बलवत्तर म्हणून तो बचावला. पण ह्य त्याचा जोडीला असलेली मतलंबखनाला मात्र भुंड्या डोक्याने परत गेला होता करण त्याचा मोगली शिरपेच किल्ल्यावरील मराठ्यांनी टोफगोळ्या द्वारे मातीत मिळवला होता.
तरीही ह्या नवीन व्यवस्थेचा काही एक परिणाम मराठी पथकांवर न होता त्यांनी घसदाना आणण्या साठी छावणीतून बाहेर गेलेल्या पथकांवर हल्ला केल्याची नोंद २१ फेब्रुवारी १७०३ च्या बतमीपत्रात मिळते.व ह्यावरून मराठ्यांचे किल्ले घेण्यास निघालेले मोघलच उलट छावणी रुपी कारागृहात मरठूनद्वारे बंदिस्त झाल्याचे लक्षात येते. कारण सनरक्षणा शिवाय एकटे दुखते कोणी बाहेर गेला की तोहह मराठ्यांच्या तावडीत सापडला म्हणूनच समजा. आता मात्र बादशहा स्वतःच वेढा पुढे सरकत नसल्याने सरदारणवर राग राग करू लागला.
परंतु मार्च महिन्यात कडक उन्हाळा पसारला होता. छावणीतील काही हत्तीही ह्या उन्हाळ्यातील गर्मीने मरण पावल्याची नोंद 13 मार्च च्या बतमीपत्रात आहे.
उन्हाचा त्रासाने आता किल्ल्यावर ही पाण्याची विलक्षण तनचाई झाली होती. त्यातच रोगराई पसरून सिंहगडाच्या किल्लेदाराच्या १२ मार्च रोजी मृत्यू झाल्याने चित्र पालटू लागले होते.
किल्लेदाराच्या मृत्यू नन्तर आठवद्यायचं मोगलांचे मोर्चे २१ मार्च रोजी कल्याण दरवाजात पर्यंत सरकले होते.
त्यास उत्तर म्हणून किल्ल्यातील दीड हजार मराठयांनी २५ मार्च रोजी उजबेकखांनाच्या ठाण्यावर सडकून हल्ला केला. व तेथे कापाकापी करून परत किल्ल्यात गेले.
मराठ्यांच्या ह्या कृत्याने चिडून जाऊन मोगल्लानी ही धाडसी निर्णय घेतला व ३ एप्रिल रोजी एक तुकडी ने दोर लावून रात्री च्या अंधारात वर जाण्याचा प्रयत्न केला खरा पण तो फसला. मराठ्यांनी तुकडीतील बऱ्याच हशमांना कापून काढले. पण जे वाचले ते मात्र बदशहचून शाब्बाष्कीस पत्र ठरले व बादशाहने त्यांना सोन्याची कडी बक्षीस दिली .
पुढे ४ एप्रिल ला तर सेनापती धनाजी जाधव चा पुत्र शम्भूसिंह जाधवने म्हलर्जी व खंडोजी च्या सोबतीने ४ हजार घोडदळ सकट इराडत खानाच्या ठाण्यावर हल्ला केला. हे ठाणे बादशाही छावणीच्या रक्षणाच्या हेतूने छावणी पासून केवळ ४ कोस दूर होते.
व माघारी जाता जाता आखरपूर इथून छावणी कडे येणारी रसद ही १० एप्रिल ला लुटली.
परंतु कडक उन्हाळा, भीषण पाणी टंचाई व जेवघेनी रोगराई मुळे किल्ल्यावरील मराठ्यांचा धीर सुटत चालला होता. व विनाकारण हकनाक जीव गमावण्या पेक्षा सध्या माघार बरी ह्या विचारा पर्यंत येऊन मराठयांनी मोगलांशी बोलनी सुरु केली.
११ एप्रिल ला मराठ्यांकडून बाळाजी विषवनाथ व मोगलांकडून तोफखाण्याचा प्रमुख तरबीयतखंन व त्याचा भाऊ कमियाबखान ह्यांच्या नेतृत्वात चर्चा सुरू होऊन १३ एप्रिल रोजी मोगलांनी ५० हजार रुपये च्या बदल्यात सिंहगड किल्ला ताब्यात घेतला .
तरीही जाताजाता पायउतार होताना काही कारणास्तव १५ एप्रिल रोजी मराठे व मुघल ह्यांच्यात छावणी समोरच पुन्हा चकमक झाली.
शेवटी ह्या सर्वांची इतिश्री होऊन व नवीन ताब्यात आलेल्या किल्ल्याचे बक्षीदाबक्ष असे नामकरण करून २४ एप्रिल रोजी बादशाह सिंहगड च्या असमनतातून पुढील पावसाळ्या साठी पुण्याकडे रवाना झाला.
सिंहगड बद्दल मोगल इितहासकार साकी मुसतैदखान याने फार त्रोटक उल्लेख कला आहे.
भीमसेन सक्सेना हाही त्याकाळी िंसहगडाच्या जवळपासच होता. तो अिधक मोकळेपणाने लिहतो. तो म्हणतो: “तरिबयतखानाने किल्ल्यातील लोकांशी बोलणे लावले आिण त्यांना भरभक्कम रक्कम चारून किल्ला ताब्यात घेतला.
िंसहगडावरील पाण्याची टंचाई, रोगराई, आिण अन्न धान्याचे दुिर्भक्ष इत्यादी कारणांनी मराठ्यांनी किल्ला सोडून द्यावयाचे ठरिवले असे िदसते, तरी किल्ला इतक्या लवकर का सोडला, पावसाळा येईपयȊत तरी लढवायचा होता असा ठपका महाराणी ताराबाईंनी किल्ल्यातील शिबंदीवर ठेवला.
आपल्या पत्रात ताराबाई म्हणतात–-“सिंहगडास औरंगजेब बिलगला होता. त्यास नितजा पावावया निमित्त स्वामीने तुम्हास किल्ला मजकुरी ठेिवले होते. उतावळी करून हिम्मत सोडून, तहरह करून किल्लायावरून उतरून राजगडास आलेस म्हणोन हे वतर्मान धोंडोजी चव्हाण दिम्मत लबे यांनी हुजूर विदत कले . त्यास स्वामीने तुमचे मदतीस लोक पाठवले . ऐवज दास पाठिवण्यास काही न्यून कले नसता
उतािवळी करून हिम्मत सोडून ही गोष्ट केली, हे काही बरे कले नाही, पजर्न्य पडेपयȊत किल्ला भांडवावयाचा होता, ती गोष्ट न केली.”
अशा प्रकारे तब्बल १०८ दिवस व हिंदुस्थान च्या बादशहास सिंहगड साठी स्वतः झगडावे लागले. व शेवटी इतर गडां प्रमाणे हा गड ही लाच देऊनच ताब्यात घ्यावा लागला.
यावेळी जरी मराठयांना िंसहगड सोडावा लागला तरी मराठ्यांनी तो १७०५ मध्ये िंजकन घेतला. मोगलांनी शाहूराजांना पुढे करून इ.स.१७०६ मध्ये परत घेतला. त्याच्या पुढच्याच वर्षी म्हणजे १७०७ मध्ये मराठयांनी तो कायमचा परत मिळिवला.
संदर्भ
मासिरी - इ - आलमगिरी
मोगल दरबाराचे बातमी पत्रे खंड 3

।। रयतेचा राजा शिवछत्रपती ।। भाग ८

 



।। रयतेचा राजा शिवछत्रपती ।।
भाग ८
सांभार :www.marathidesha.com
आग्र्याहून ऐतिहासिक सुटका
छत्रपतीच्या आयुष्यातील अनेक प्रसंग नाट्यमय घटनांनी भरलेले आहेत त्यापैकी एक म्हणजे आग्र्याहून सुटका होय.या घटनेत छत्रपतीनी दाखवलेल्या समयसूचकता आणि चाणाक्षपणामुळे आजवरच्या महान योद्धे तसेच सेनानीमध्ये,त्यांचे इतिहासातील स्थान वेगळे गणले गेले आहे.
इ.स. १६६६ साली छत्रपती पुरंदरच्या तहाच्या अटीनुसार औरंगझेबला भेटण्यासाठी दिल्लीला गेले.तेथे औरंगझेबने छत्रपतींचा अपमान करून राजांना आग्र्याला नजरकैदेत ठेवले.अशा वेळी राजेंनी आजारी पडण्याचे नाटक करून बरे होण्यासाठी गोरगरिबांना,मंदिराना मिठाईचे पेटारे पाठविण्यास सुरूवात केली.सुरूवातीला मोघलांचे सैन्य पेटारे योग्य प्रकारे तपासत,नंतर ते तपासण्यास आळसपणा करू लागले.या संधीचा फायदा घेऊन छत्रपती वेषांतर करून बाहेर गेले.यावेळी हिरोजी फर्जंद,मदारी म्हेतर यांनी मोठी कामगिरी बजावली(छत्रपती आग्र्याहून कसे सुटले याबद्दल इतिहासकारांमध्ये वादविवाद आहे).
आग्र्याहून सुटल्यानंतर संभाजीराजांच्या सुरक्षिततेसाठी त्यांना विश्वासू लोकांकडे सोपवून,छत्रपती वेशांतर करून वेगळ्या मार्गाने महाराष्ट्रात आले.तर काही दिवसांनी संभाजीराजे आले.
छत्रपती शिवरायांनी याच आग्रा किल्ल्यातून सुटका करून घेतली होती

जानोजीराजे भोसले(प्रथम)

 



जानोजीराजे भोसले(प्रथम)
नागपुर कर भोसले मुळ चे कोरेगाव तालुका सातारा मधील देऊर या गाव चे आहेत
राजेरघुजी भोसले यांचे पुञ नागपुर,इ स १७५५ to १७७२ = राजेरघुजी याना ४ पुञ होते-मुधोजी, जानोजी, बिँबाजी आणि साबाजी. जानोजी व साबाजी हे धाकट्या राणीचे आणी मुधोजी व बिँबाजी हे मोठ्या राणीचे पुञ परंतू जानोजीराजे हे सर्व भावंडात मोठे असल्याने रघुजीराजे यांच्या म्रुत्युपुर्वीच "सेनासाहेब सुभा" हे पद व गादिवर बसण्याचा निर्णय दिला.परंतु जानोजीराजे व मुधोजीराजे यांच्यात गादिवरुन वैमनस्य आले त्यामुळे दरबारातील वडिलधार्या व मुत्सद्दी लोकांनी पुढाकार घेउन पेशव्याकडुन जानोजीराजेस "सेनासाहेब सुभा" ची वस्ञे देऊन गादिवर बसवले आणि मुधोजीराजेस "सेनाधुरंधर" हा किताब देऊन समेट घडवुन आणला.
रघुजीराजेनी बंगालवर स्वार्या करुन ओरिसा पर्यँत मुलुख काबीज केला त्यात जानोजीराजे यानी चांगला पराक्रम गाजवला.मराठ्यांतर्फे ओरिसा प्रांतावरील सुभेदार असलेल्या मीर हबीब यास अलवर्दिखानाने ञास दिल्यानंतर त्याचा बंदोबस्त जानोजीराजेनी केला व इ स १७५१ मध्ये भोसल्याना बलसोर बंदरापर्यँत सर्व कटक प्रांत देऊन तह केला,शिवाय बंगाल व बिहार यांच्या चौथाई बद्दल नवाबाने रघुजीराजेना दरसाल १२ लाख रु देण्याचे कबुल केले.
याप्रमाणे जानोजीराजेंच्या कर्तबगारीमुळे ओरिसाप्रांतावर नागपुरकर भोसल्यांचा अधिकार झाला.इ स १७६१ मधिल पानिपतच्या पराभवानंतर नानासाहेब पेशव्याचा २३ जुन १७६१ धक्क्याने पुण्यात म्रुत्यु झाला त्यावेळी जानोजीराजेनी बुंदेलखंडात जाऊन बंडाळ्या मोडुन मराठ्यांचा दरारा प्रस्थापीत केला, याचे श्रेय जानोजीराजेकडेच जाते. पानिपतचा पराभव व नानासाहेबाचा म्रुत्यु यामुळे निजामाने ६० हजार फौज घेऊन पुण्यावर चाल करण्यास निघाला त्यावेळी जानोजीराजेना मराठा संघराज्यातुन अलग करण्यासाठी दिवाण विठ्ठल सुंदर तर्फे सातार्याच्या गादिचे अमिष दाखवुन कटकारस्थान केले.पुढे हैदराबादचा निजाम अलिखानाने वर्हाडातिल प्रदेश जिँकण्यास सुरुवात केली.निजामअलीची व जानोजीराजेची गाठ बर्हाणपुर जवळ पडली निजामअलिने इब्राहिम खान गारदीच्या(हाच पुढे पानिपतच्या युद्धात मराठ्याकडुन लढला) तोफखान्याच्या मदतीने जानोजीराजेँचा इ स १७५७ मध्ये पराभव केला आणी एलिचपुर येथे तह झाला त्यानुसार वर्हाडातील उत्पन्नापैकी ४५% नागपुरकर भोसल्यानी तर 55% निजामाने घ्यावे असे ठरले.
राघोबादादा व माधवराव पेशवे यांच्या भांडणात जानोजीराजेनी राघोबादादाकडुन बाजु घेतल्यामुळे आणि पुण्यावर १७६३ साली केलेल्या स्वारीचा(यात जानोजी यांच्या रघुजीं कारंडे या सरदाराने मोठा पराक्रम केला होता.) वचपा म्हणून जानोजीराजेना धडा शिकवण्यासाठी माधवराव पेशव्याने इ स १७६८ मध्ये नागपुरवर स्वारी करुन शहराची धुळधाण करुन प्रचंड लुटमार केली.नंतर चंद्रपुरला वेढा दिला.परंतु जानोजीराजे बाहेर असल्याने नजरकैदेत असलेल्या राघोबादादाची सुटका करतील या भितीने वेढा उठवुन त्यांचा पाठलाग करुन तह करण्यास भाग पाडले.या तहास कनकपुरचा तह म्हणतात.
या तहानुसार जानोजीराजेकडुन पेशव्यानी मराठासंघावरील स्वत:चे सर्व अधिकार मान्य करुन घेतले.२४ एप्रिल इ स १७६९ रोजी मेहकर येथे जानोजीराजे व माधवराव पेशवे यांच्या भेटी झाल्या.याच भेटीच्या परतीच्या मार्गावर नळदुर्ग परिसरात जानोजी यांच्या खालावलेल्या प्रकृतीला प्लेगच्या काळात आजाराने येडोळा या गावी गाठले. १६ मे १७७२ साली त्यांच्या जेष्ठ बंधुनी याच गावी भडाग्नि दिला.
जानोजी भोसले (नागपुर) यांची समाधी, यडोळा, उस्मानाबाद.
संदर्भ __ Rajenaresh Jadhavrao

।। रयतेचा राजा शिवछत्रपती ।। भाग ७




।। रयतेचा राजा शिवछत्रपती ।।
भाग ७
सांभार :www.marathidesha.com

पुरंदरचा तह

छत्रपती बसरूर मोहिम संपवून स्वराज्यात परत येत असताना त्यांना मिर्झाराजे जयसिंग याच्या आक्रमणाची बातमी समजली.स्वराज्यावर आलेल्या या मोठ्या संकटाशी सामना करण्यासाठी महाराज लगोलग राजगडावर पोहचले.शके १५८७ म्हणजेच १६६५ मध्ये मोगल सरदार मिर्झाराजे जयसिंग याच्या दिलेरखान या सेनापतीने पुरंदराला वेढा घातला.पुरंदरच्या माचीवर खानाचे आणि मुरारबाजीचे घनघोर युद्ध झाले.सभासदाच्या बखरीमध्ये याचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे.

'तेव्हा पूरंधरावरी नामजाद लोकांचा सरदार राजियाचा मुरारबाजी परभू म्हणून होता.त्याजबरोबर हजार माणूस होते.याखेरीज किल्ल्याचे एक हजारे असे दोन हजारे लोक होते.त्यात निवड करून मुरारबाजी याने सातशे माणूस घेऊन ते गडाखाली दिलेरखानावरी आले.दिलेरखान तालेदार जोरावर पठान पाच हजार याखेरीज बैईल वगैरे लोक ऐशी गडास चौतरफा चढत होती.त्यात होऊन सरमिसळ जाहले.मोठे धूरंधर युद्ध जहले.मावळे लोकांनी व खासां मुरारबाजी यानी निदान करून भांडण केले.पाचशे पठाण लष्कर ठार जाहले.तसेच बहिले मारले.'

मुरारबाजी देशपांडेचे हे शौर्य पाहून दिलेरखान बोलिला,'अरे तू कौल घे.मोठा मर्दाना शिपाई तुज नावाजितो.'ऐसे बोलीता मुरारबाजी बोलिला, 'तुझा कौल म्हणजे काय? मी शिवाजी महाराजांचा शिपाई तुझा कौल घेतो की काय?'म्हणोनि नीट खानावरी चालिला.खानावरी तलवारीचा वार करावा तो खानने आपले तीन तीर मारुन पुरा केला.तो पडला,मग खानाने तोंडात आंगोळी घातली,'असा शिपाई खुदाने पैदा केला.'

मिर्झाराजे जयसिंगच्या रूपाने स्वराज्यावर आलेले मोघलांचे आक्रमण, परतावण्यासाठी छत्रपती शिवरायांनी ११ जून १६६५ रोजी मिर्झाराजे जयसिंग बरोबर इतिहास प्रसिद्ध 'पुरंदरचा तह'केला.या तहान्वये तेवीस किल्ले मोघलांना द्यावे लागले.तह करून छत्रपतींनी स्वराज्यावरील संकट परतवून लावल्यामुळे तह करून सुध्दा राजे जिंकले.

पुरंदरावरील मुरारबाजीचे शिल्प

।। रयतेचा राजा शिवछत्रपती ।। भाग ६

 




।। रयतेचा राजा शिवछत्रपती ।।
भाग ६
सांभार :www.marathidesha.com

मुघलांशी संघर्ष

इ.स.१६६३ साली मुघल साम्राज्याचा नर्मदा नदी पलीकडे विस्तार करण्यासाठी त्याचबरोबर छत्रपती शिवरायांच्या राज्यविस्ताराला वेसण घालण्यासाठी औरंगझेबाने त्याचा मामा शाहिस्तेखान याला दख्खनच्या मोहिमेवर पाठविले.हजारो सैन्य,प्रचंड मोठा लवाजमा सोबत घेऊन शाहिस्तेखान दख्खनला निघाला.दख्खनला जात असताना मध्ये वाटेत लागणार्‍या प्रत्येक गावा-गावात त्याने दहशत पसरवीत मोठा विध्वंस केला.पुण्याजवळील चाकणचा किल्ला जिंकून पुण्यातील छत्रपती शिवरायांच्या लाल महालात खानाने तळ ठोकला.

खानाचे सैन्य रोजच आजूबाजूच्या गावा-गावामध्ये जाऊन लुटालूट करत.खानाच्या रूपाने एक मोठे संकट स्वराज्यावर चालून आले होते.खानाला धडा शिकविणे गरजेचे होते.समोरासमोरच्या युध्दात मराठ्यांचा टिकाव लागणे शक्य नव्हते,अशा वेळी छत्रपतींनी लालमहालावर हल्ला करून खानाला धडा शिकविण्याचे ठरविले.राजांना लाल महाल नवा नव्हता,त्यांचे लहानपण लालमहालातच गेले होते त्यामुळे लालमहालातील कोपरा न कोपरा त्यांना माहीत होता.

लालमहालाभोवती खानाच्या शेकडो सैनिकांचा बंदोबस्त होता.अशावेळी अंधार्‍या रात्री लग्नाच्या वरातीचा आधार घेऊन राजे व काही निवडक मावळे वेशभूषा बदलून महालात घुसले .लालमहालात मराठ्यांनी कत्तल आरंभिली सगळीकडे गोंधळ चालू झाला,छत्रपती खानाच्या शामियानात शिरले .ऱाज्यांना प्रत्यक्ष समोर पाहून खानाची पाचावर धारण बसली,जीव वाचविण्यासाठी खानाने खिडकीतून उडी मारली,छत्रपतींचा चपळाईने केलेला वार हुकल्यामुळे खानाची तीन बोटे तुटली गेली.खान बचावला गेला पण शिवरायांची दशहत मनात बसल्यामुळे तो मराठी मुलूख सोडून गेला.या प्रकरणामुळे मुघलांची बेइज्जत झाली तर शिवरायांचे नाव हिंदूस्थानभर झाले.
हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध

।। रयतेचा राजा शिवछत्रपती ।। भाग ५



।। रयतेचा राजा शिवछत्रपती ।।
भाग
सांभार :www.marathidesha.com

अफझलखानाच्या वधानंतर शिवरायांनी खानाच्या शवाचे इस्लामी पद्धतीने अंत्यसंस्कार करुन त्याची कबर प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधली आणि त्या कबरीच्या कायम देखभालीची व्यवस्था केली.तर अफझलखानाच्या वधानंतर खानाचा मुलगा व इतर सरदारांना पळून जाण्यास मदत करणार्‍या खंडोजी खोपडेला महाराजांनी डावा पाय आणि उजवा हात तोडण्याची प्रतापगडावर शिक्षा दिली.
पन्हाळगडची लढाई
इ.स.२ मार्च १६६० रोजी सिद्दी जोहरने पन्हाळयास वेढा दिला होता यावेळी छत्रपती शिवाजीराजे पन्हाळा किल्ल्यावर अडकून पडले होते.मुसळधार पावसात सुध्दा सिद्दी वेढा सोडावयास तयार नव्हता.या कठीण प्रसंगी महाराजांनी सिध्दीस तहाचा निरोप धाडला त्यामुळे सिध्दी गाफील राहिला.शिवा काशीद नावाच्या मावळ्याने छत्रपतींच्या वेशात सिध्दी जोहर यास तहाची बोलणी करण्यात गुंतवून छत्रपतींना पन्हाळ्याहून निसटण्यास पुरेसा अवधी दिला.शिवा काशीद चे खरे रूप कळल्यावर सिध्दीने त्यांस ठार केले,तोवर छत्रपती विशाळगडाच्या वाटेवर होते.
छत्रपती शिवरायांनी पन्हाळ्यावरून,विशाळगडाकडे पलायन केल्याचे समजल्या- नंतर,सिद्दीने,सिद्दी मसूदला छत्रपतींच्या मागावर पाठवले व त्यांचा पाठलाग चालू झाला.मसूदच्या सैन्याने मराठ्यांना घोडखिंडीत गाठले,अशावेळी बाजीप्रभूंनी छत्रपतींना विशाळगडावर पोहोचून तोफानी इशारा करत नाहीत तोवर ही खिंड लढवली जाईल असे सांगितले.घोडखिंडीतील अतिशय चिंचोळ्या वाटेमुळे मराठ्यांनी मसूदच्या सैनिकांची कत्तल आरंभली,शरीराला असंख्य जखमा झाल्या असतानाही बाजीप्रभू,फ़ुलाजी,संभाजी जाधव,बांदल यांनी मोठा पराक्रम गाजविला.
महाराज विशाळगडावर पोहोचल्यानंतर तोफांचा गजर झाला.इकडे घोडखिंडीत बाजीप्रभूने तोफांचा आवाज ऎकल्यानंतरच समाधानाने आपला जीव सोडला.या युध्दात मराठ्यांचे जवळपास सर्वच ३०० मावळे कामी आले तर मसूदचे जवळपास ३००० सैनिक मारले गेले.बाजीप्रभू व इतर मावळ्यांच्या पराक्रमाने घोडखिंड पावनखिंड म्हणून इतिहासात अमर झाली.
पावनखिंडीतील विजयी स्मारक

।। रयतेचा राजा शिवछत्रपती ।। भाग ४



।। रयतेचा राजा शिवछत्रपती ।।
भाग
सांभार :www.marathidesha.com

अफझलखानांस घाबरून मसूरचे जगदाळे, उत्रोळीचे खोपडे आदि खानाला मिळाले तर कान्होजी जेधे (संदर्भ:जेधे शकावली)सारखे मावळातील बहूसंख्य इमानी वतनदार महाराजांना सामील झाले.आपल्या जीवाचे बरेवाईट होईल हे जाणून जिजाऊंच्या ताब्यात राज्यकारभार देऊन आपल्या सहकार्‍यांना भावी काळासाठी त्यांनी सूचना दिल्या.
खानाला आपण फार घाबरतो आणि आपल्याकडून खूप अपराध झाल्यामुळे आपण खानास भेटावयास जाण्याऐवजी खानानेच आपल्या भेटीस प्रतापगडाच्या पायथ्याशी यावे, असा आग्रह शिवरायांनी केला.शिवरायांच्या नम्रतेच्या निरोपामुळे व स्वत:च्या सामर्थ्याची घमेंडीमुळे अफझलखान प्रतापगडाच्या पायथ्याशी यावयास तयार झाला.
भेटीच्या वेळी दोन्हीकडील मोजकीच माणसे भेटीसाठी येतील आणि यावेळी सर्वांनी निशस्त्र राहण्याचे ठरले.१० नोव्हेंबर १६५९ या दिवशी छत्रपती शिवराय भेटीसाठी खानाला सामोरे गेले असता धिप्पाड खानाने अलिंगन देण्याचा बहाणा करून शिवरायांचे मस्तक काखेत दाबून दुसर्‍या हाताने कट्यारीचा वार शिवरायांच्या शरीरावर केला.शिवरायांनी अंगरख्याच्या आत घातलेल्या चिलखतावर हा वार बसला.खानाचा दगा लक्षात येताच शिवरायांनी उजव्या हातातील वाघनख्यांनी वार करून खानाचे पोट फाडून आतडी बाहेर काढली.
खान'दगा दगा'असे ओरडत आतडी सावरीत बाहेर आला असता,खानाचा अंगरक्षक सय्यद बंडाने शिवरायांवर केलेला वार शिवरायांचा अंगरक्षक जिवा महालाने वरच्यावर अडवून सय्यद बंडाला ठार केले.पालखीत बसून पळून जाणार्‍या खानाचे मुंडके संभाजी कावजी याने उडविले.महाराज गडावर जाताच तोफेचा आवाज करण्यात आला आणि खानाच्या बेसावध सैन्यावर दाट जंगलात लपून बसलेल्या मावळयांनी तुटून पडून त्यांची दाणादाण उडविली.

।। रयतेचा राजा शिवछत्रपती ।। भाग ३

 



।। रयतेचा राजा शिवछत्रपती ।।
भाग ३
सांभार :www.marathidesha.com
चंद्रराव मोरेचा बंदोबस्त
जावळीचा चंद्रराव मोरे हा आदिलशहाचा चाकर होता,त्याच्या त्रासाने जावळी खोर्यातील जनता त्रस्त झाली होती.मोरे याचा पाडाव करून शिवाजी महाराजांनी जावळी काबिज केली,शके १५७७ पौष वद्य चतुर्दशी मंगळवार १५ जाने १६५६ (संदर्भ:जेधे शकावली).यशवंतराव मोरे जावळीहून पळून रायगडावर जाऊन राहिला तर प्रतापराव मोरे विजापूरास पळाला.महाराजांनी ६ एप्रिल १६५६ रोजी रायरीस म्हणजेच रायगडास वेढा घातला व मे महिन्यात रायरी महाराजांच्या ताब्यात आला.कैदेतील मोरे आदिलशाहीशी गुप्तरुपाने पत्रव्यवहार करताना सापडल्यामुळे महाराजांनी त्याला ठार केले.रायरीवरील विजयाने महाबळेश्वर ते रायगडापर्यंतच्या कोकण भागात स्वराज्याचा विस्तार झाला.
प्रतापगडची लढाई
आदिलशाहच्या ताब्यातील चाळीस किल्ले इ.स.१६५९ पर्यंत छत्रपतींनी जिंकले होते,या कालावधीत त्यांनी मुघलांशी नरमाईचे धोरण ठेवले.शिवरायांना नेस्तनाबूत करण्यासाठी अफझलखान या सरदारास आदिलशहाने पाठविले. शिवरायांना कैद करून विजापूरात घेऊन येण्याची प्रतिज्ञा करून अफाट सैन्यासह खान स्वराज्यावर चालून आला.स्वराज्यात येताना खान तुळजापूर,पंढरपूर आणि वाटेतील इतर गावातील देवस्थानाची तोडफोड करत, वाईला तळ ठोकून राहिला.
खानाच्या प्रचंड अशा सैन्याशी समोरासमोर लढण्याची ताकद त्यावेळी शिवरायांकडे नव्हती.याच अफझलखानाने शहाजीराजांना कैद करून अपमानास्पदरितीने बेड्या ठोकून विजापुरात नेले होते तर कनकगिरीच्या वेढ्यात शिवरायांचे थोरले बंधू संभाजीराजे यांचा खानामुळे मृत्यू झाला होता.
याच प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपतीं शिवरायांनी खानाचा वध केला होता

।। रयतेचा राजा शिवछत्रपती ।। भाग २

 



।। रयतेचा राजा शिवछत्रपती ।।
भाग २
सांभार :www.marathidesha.com
बेंगलोरहून परत आल्यानंतर शिवरायांनी बारा मावळ(राजमाची व चाकण येथून दक्षिणेस रायरेश्वराचा डोंगर,अंबेडखिंड,खंबाटकीचा घाट येथपर्यंत पुण्याजवळचा मुलूख) खोऱ्यात राहणार्या आपल्या सवंगड्याना सोबत घेऊन स्वत:ची फौज तयार केली.वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी इ.स.२७ एप्रिल १६४५ साली त्यांनी भोरजवळच्या,रायरेश्वराच्या पठारावर स्वराज्याच्या स्थापनेची शपथ घेतली.
छत्रपती शिवरायांनी सुरवातीच्या कालखंडामध्ये तोरणा,सिंहगड,चाकण आदी किल्ले आदिलशहाकडून जिंकून आपल्या वर्चस्वाखाली आणले.आदिलशहाने शिवाजीराजांना आळा घालण्यासाठी फत्तेखान नावाच्या सरदाराला शिवरायांवर हल्ला करण्यास पाठविले शिवाय विश्वासघाताने शहाजीराजांना कैद केले.
पुरंदरावर शिवरायांनी फत्तेखानाचा पराभव केला.यावेळी आपल्या मुसद्दीने मुघल बादशाह शाहजहान यास दख्खनच्या सुभेदार,शहजादा मुरादबक्ष याच्यामार्फत पत्र पाठवून शहाजीराजां सहित मुघलांच्या चाकरीत जायची इच्छा प्रकट केली.शाहजहानाने आदिलशहावर दबाव आणल्यामुळे शहाजीराजांची सुटका झाली याबदल्यात शिवरायांनी सिंहगड किल्ला आदिलशहाला दिला.
स्वराज्य वाढण्यास हातभार लागावा म्हणून वेगवेगळ्या मराठी सरदारांशी नाते जोडण्यासाठी जिजाऊंनी,शिवरायांची एकूण आठ लग्ने केली.त्यापैकी सईबाई निंबाळकर घराण्यातील,सोयराबाई मोहिते घराण्यातील,पुतळाबाई पालकर घराण्यातील,गुणवंताबाई इंगळे घराण्यातील,सगुणाबाई शिर्के घराण्यातील, काशीबाई जाधव घराण्यातील,लक्ष्मीबाई विचारे घराण्यातील तर सकवारबाई गायकवाड घराण्यातील होत्या.
सईबाईना संभाजीराजे हा पुत्र तर सखूबाई,रानूबाई,अंबिकाबाई या मुली होत्या. सोयराबाईंना राजाराम हा पुत्र तर दीपाबाई ही मुलगी होती.सगुनाबाईना राजकुंवर ही मुलगी होती. तर सकवारबाईना कमलाबाई ही मुलगी होती.
छत्रपती शिवरायांनी याच शिवलिंगावर स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती

।। रयतेचा राजा शिवछत्रपती ।। भाग १



 ।। रयतेचा राजा शिवछत्रपती ।।
भाग १
सांभार :
www.marathidesha.com

तीनशे वर्ष महाराष्ट्र इस्लामी राज्यसत्तेच्या ताब्यात खितपत पडला होता,या लोकांनी महाराष्ट्रावर आपली राजकीय,सामाजिक,सांस्कृतिक गुलामगिरी लादून रयतेचा प्रचंड छळ चालविला होता.या कालखंडातील दिल्लीचे मोगल राजे,स्वत:ला हिंदूस्थानाचा अधिपति मानत.मोघलांच्या सत्तेला हिंदूस्थानात सर्वप्रथम छत्रपती शिवरायांनी आव्हान दिले आणि आपले स्वतंत्र व सार्वभौम राज्य स्थापिले.हिंदूस्थानातील जे राजे पारतंत्र्यात जगत होते त्यांना छत्रपतींनी स्वतंत्र होण्याचा संदेश दिला.त्यामुळेच छत्रपतीं शिवरायांना युगकर्ते ,शककर्ते असेही म्हटले जाते.
छत्रपती शिवरायांचा जन्म इ.स.१९ फेब्रुवारी १६३०(फाल्गुन वद्य तृतीया,शके १५५१) रोजी पुण्यापासून जवळच असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर झाला(संदर्भ:जेधे शकावली).सन १६३९ ते १६४२ या कालावधीत बालशिवाजी कर्नाटकात असताना शहाजीराजांनी त्यांना राज्यकारभार तसेच युद्धाभ्यासाचे शिक्षण देण्याची व्यवस्था केली होती(संदर्भ:परमानंदकृत शिवभारत).त्यामुळे लहानपणीच बालशिवाजी लाठीकाठी, तलवारबाजी, दांडपट्टा, घोडेस्वारी यात तरबेज झाले.रामायण, महाभारत या ग्रंथाचे जिजाऊंकडून संस्कार झाल्यामुळे,परकीयांविरूद्ध लढण्याचे बाळकडू त्यांना लहानपणापासून मिळाले.जन्मानंतर इ.स १६४२ पर्यत त्यांचे वास्तव्य शिवनेरी, सिंदखेडराजा, खेड शिवापूर, पुणे जहागीर तसेच बेंगलोर आदि ठिकाणी होते
छत्रपती शिवरायांचा जन्म किल्ले शिवनेरीवर याच ठिकाणी झाला

।। राजमाता जिजाबाई ।। भाग ७

 


।। राजमाता जिजाबाई ।।
भाग ७
सांभार :http://www.marathidesha.com
महाराज शककर्ते छत्रपती झाले.जिजाऊ व शहाजीराजे यांच्या संकल्पनेतील स्वराज्य प्रत्यक्षात आले.राज्याभिषेकानंतर थोड्याच दिवसात इ.स.१७ जून १६७४ रोजी रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावी जिजाऊंचे निधन झाले.जिजाऊ थोर माता होत्या तसेच त्या सर्व श्रेष्ठ राजनितीतज्ञ,सर्वश्रेष्ठ योध्दा ,सर्वश्रेष्ठ भाषातज्ञ अशा सर्व कलानिपूण व्यक्ती होत्या.
थोर समाजसेवक महात्मा फुलेंनी आपल्या पोवाड्यातून जिजाऊंची थोरवी गायली आहे.
कन्या वीर जाधवांची जिने भारत लावले पुत्रा नीट ऎकविले ॥
या क्षेत्राचे धनी कोण कोणी बुडविले सांगत मुळी कसे झाले॥
क्षेत्रवासी म्हणौन नांव क्षत्रिय धरले क्षेत्री सुखी राहिले॥
अन्य देशिचे दंगेखोर हिमालयी आले होते लपून राहिले॥
पाठी शत्रू भौती झाडी किती उपाशी मेले गोमासा भाजून घाले॥
सर्वदेशी चाल त्यांचे पुंड माजले उरल्या क्षत्रिया पिडीले॥
शुद्रा म्हणती तुम्हा ह्रदयी बाण रोवले आज बोधाया फावले॥
गाणे गात ऎका बाळा तुझ्या आजोळी शिकले बोलो नाही मन धरले ॥
शिवराज्याभिषेकावेळी गागाभट्टानी जिजाऊ विषयी पुढीलप्रमाणे उद्गार काढले,
कादंबिनी जगजीवनदान हेतु:॥
सौदामिनीत्व सकलही विनाशेजाय ॥
आलंबिनी भवति राजगिरे दिदानी॥
जीजा भिदायजयती शहाबकुटूंबिनीसा ॥
राजमाता जिजाऊंची समाधी,पाचाड(रायगड)

।। राजमाता जिजाबाई ।। भाग ६

 


।। राजमाता जिजाबाई ।।

भाग ६
सांभार :
http://www.marathidesha.com

इ.स. १६६६ साली छत्रपती शिवाजी महाराज पुरंदरच्या तहाच्या अटीनुसार औरंगजेबला भेटण्यासाठी दिल्लीला गेले.तेथे औरंगजेबने छत्रपतींचा अपमान करून आग्र्याला नजरकैदेत ठेवले.अशा बिकट प्रसंगी खचून न जाता जिजाऊंनी महाराष्ट्रात स्वराज्याचा राज्यकारभार नीट केला.
आग्र्याहून सुटल्यानंतर शिवबांनी मोघलांच्या ताब्यातील किल्ले परत घेण्याचा सपाटा चालविला.शिवरायांचा दरारा संपुर्ण भारतात निर्माण झाला होता.पण त्यांची स्वतंत्र राजा म्हणून ओळख नव्हती.त्यामुळे जिजाऊंनी शिवरायांचा राज्याभिषेक करण्याचा निर्णय घेतला.
इ.स. ६ जून इ.स.१६७४(शालिवाहन शके १५९६ ज्येष्ठ,शुद्ध त्रयोदशी,आनंदनाम संवत्सर) रोजी राज्याभिषेकाचा सोहळा रायगडावर संपन्न झाला.तर २४ सप्टेंबर १६७४,ललिता पंचमी अश्विन शु.५ आनंद संवत्सर शके १५९६ या दिवशी तांत्रिक पद्धतीने शिवरायांनी स्वत:ला आणखी एक राज्याभिषेक करून घेतला. सभासदाच्या बखरीत या सोहळ्याचे खूप सुंदर वर्णन आहे.सभासदाच्या लेखानुसार या सोहळ्यात एक करोड बेचाळीस लक्ष होन एवढा खर्च झाला.राज्याभिषेक समारोहाबद्दल सभासद म्हणतो,येणे प्रमाणे राजे सिंहासनारूढ जाले.'या युगी सर्व पृथ्वीवर म्लेंच्छ बादशाहा मर्‍हाटा पातशहा येवढा छत्रपती जाला.ही गोष्ट काही सामान्य जाली नाही.'
श्री शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा राजधानी रायगडावर झाला.त्याचे पडसाद सातासमुद्रापार युरोपपर्यंत निनादले.हा राज्याभिषेक रोखायचे धाडस आलमगीर औरंगजेबालाही झाले नाही.राज्याभिषेक सोहळा सुरु असताना,स्वराज्याच्या सीमेकडे डोळा वर करुन पहायचे धाडसही चार पातशाह्यांना झाले नाही.इतका प्रचंड दरारा आणि दहशत शिवरायांची,त्यांच्या मराठी सेनेची होती. राज्याभिषेकावेळी शिवरायांनी शिवराज्याभिषेक शक सुरू केला आणि शिवराई हे चलन जारी केले.राज्यव्यवहार कोश बनविला,नवी दंडनिती,नवे कानुजाबते तयार केले.

।। राजमाता जिजाबाई ।। भाग ५




 ।। राजमाता जिजाबाई ।।

भाग ५
सांभार :
http://www.marathidesha.com

छत्रपती संभाजीराजेंचा जन्म इ.स. १४ मे, १६५७ रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. संभाजीराजांच्या 'मातोश्री सईबाईंचे' निधन, संभाजीराजांच्या लहान वयात झाल्यामुळे त्यांच्या पालनपोषनाची जबाबदारी जिजाऊंनी पार पाडली.पुढे संभाजीराजा इतिहासातील एक थोर,बुध्दिमानी,अजिंक्य पराक्रमी राजा म्हणून उदयास आला.
तिकडे दक्षिणेत आपल्या जनतेची काळजी शहाजीराजे अगदी पुत्रासारखी घेत होते.आपल्या प्रजेची जंगलातील नरभक्षक वाघाच्या तावडीतून सुटका व्हावी म्हणून अशा वाघांचा बंदोबस्त करण्यासाठी शहाजीराजे बेंगलोर नजिकच्या होदेगिरीच्या जंगलात गेले होते.वाघाचा पाठलाग करताना घोड्यावरून पडून त्यांचा दुदैवी मृत्यु झाला.ही दुदैवी घटना इ.स.२३ जानेवारी १६६४ रोजी घडली.
अशा दु:खद प्रसंगी पतीविरहाचे दु:ख बाजूला ठेवून जिजाऊंनी स्वराज्याच्या बांधणीवर लक्ष केंद्रित केले.या निर्णयामागे शिवरायांना घडविण्याची,स्वराज्यप्राप्तीची,गुलामगिरीतून लोकांना सोडविण्याची प्रबळ प्रेरणा होती.स्वराज्य वाढण्यास हातभार लागावा म्हणून वेगवेगळ्या मराठी सरदारांशी नाते जोडण्यासाठी जिजाऊंनी,शिवरायांची एकूण आठ लग्ने केली.त्यापैकी सईबाई निंबाळकर घराण्यातील,सोयराबाई मोहिते घराण्यातील,पुतळाबाई पालकर घराण्यातील,गुणवंताबाई इंगळे घराण्यातील,सगुणाबाई शिर्के घराण्यातील, काशीबाई जाधव घराण्यातील,लक्ष्मीबाई विचारे घराण्यातील तर सकवारबाई गायकवाड घराण्यातील होत्या.
पाचाड(रायगड) येथील जिजाऊंचा वाडा

।। राजमाता जिजाबाई ।। भाग ४


 ।। राजमाता जिजाबाई ।।

भाग ४
सांभार :
http://www.marathidesha.com

शहाजीराजांनी राजमुद्रा,विश्वासू नोकर सोबत देऊन,स्वतंत्र मराठी राज्य स्थापनेचा निर्धार करून बालशिवाजींना व जिजाऊंना पुण्याला इ.स. १६४२ मध्ये आपल्या जहागीरीमध्ये पाठविले.थोरले पुत्र संभाजीराजे शहाजीराजेंसोबत कर्नाटकात राहिले. पुण्यास आल्यानंतर जिजाऊंनी प्रथम लोकांना त्रास देणाऱ्या सावकारांचा,गुंड लोकांचा बंदोबस्त केला.हिंसक जंगली स्वापदांपासून लोकांना मुक्त केले.लोकांमध्ये हळूहळु सुरक्षिततेची भावना निर्माण झाली.पिण्याच्या पाण्यासाठी आंबवडी,पनवडीचा धरणे बांधली.शेतकऱ्यांना बी-बियाणे उपलब्ध करून दिले.शेतसारा कमी केला.जिजाऊंची राहणी अत्यंत साधी होती..
कातकरी,कोळी,भिल्ल,कुणबी,मुसलमान,हरिजन अशा विविध जातीधर्मातील मुलांसोबत शिवरांय युध्दाचे खेळ खेळत असत.जहागिरीची वस्त्रे बाजूला ठेवून शिवराय आपल्या संवंगड्यासोबत जेवत असत.त्यामुळे बारा मावळाच्या तरूणांना शिवराय आपल्यातीलच एक वाटू लागले.मावळातील पासलकर, जेधे, मालूसरे, निंबाळकर, मोहिते, महाडिक, शिर्के, कंक, शिळीमकर,महाले,जाधव,जगताप आदि अनेक लोकांना एकत्र आणून बाल शिवबांनी स्वराज्य स्थापनेचा निर्णय घेतला.याकामी त्यांना जिजाऊंचे मागदर्शन मिळाले.
शहाजीराजे दक्षिणेत मराठा राज्य वाढवत होते,तर महाराष्ट्रात जिजाऊंच्या मार्गदर्शनात शिवबा आपले राज्य वाढवत होते.बेंगलोरहून परत आल्यानंतर शिवरायांनी बारा मावळ(राजमाची व चाकण येथून दक्षिणेस रायरेश्वराचा डोंगर,अंबेडखिंड,खंबाटकीचा घाट येथपर्यंत पुण्याजवळचा मुलूख) खोर्‍यात राहणार्‍या आपल्या सवंगड्याना सोबत घेऊन स्वत:ची फौज तयार केली.वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी इ.स.२७ एप्रिल १६४५ साली त्यांनी भोरजवळच्या,रायरेश्वराच्या पठारावर स्वराज्याच्या स्थापनेची शपथ घेतली.
राजमाता जिजाऊंचे शिल्प,जन्मस्थानातील आतील बाजू

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...