भाग १०
सांभार :www.marathidesha.com
कोंढाणा सिंहगडाची लढाई
आग्र्याहून
सुटल्यानंतर छत्रपती शिवरायांनी मोठ्या मोहिमा आखून मुघलांच्या ताब्यातील
तेवीस किल्ले घेण्याचे ठरविले.सुरूवातीला त्यांनी कोंढाणा किल्ला घ्यायचे
ठरवले.कारण कोंढाणा किल्ला स्वराज्यातील मध्यवर्ती किल्ला होता,या
किल्ल्याच्या साह्याने बारा मावळावर ताबा ठेवणे शक्य होते.कोंढाणा किल्ला
जिंकण्याची जबाबदारी तानाजी मालुसरे यांनी आपल्या शिरावर घेतली.
रायगड
जिल्ह्यातील उमरठ(पोलादपुरजवळ)गावचे असणारे तानाजी मालुसरे यांचे मुळ गाव
सातारा जिल्ह्यातील,जावळी तालुक्यातील गोडोली होय.तानाजी मालुसरे
छत्रपतींचे बालपणीचे सवंगडी होते.आपला मुलगा रायबा याच्या लग्नात व्यस्त
असलेल्या तानाजींनी ,"आधी लगीन कोंढाण्याचे मग लगीन रायबाचे" असे म्हणत
कोंढाणा ताब्यात घेण्याचा विढा उचलिला.
कोंढाण्याचा
किल्लेदार उदयभान राठोड हा एक शूर राजपूत होता.त्याच्या दिमतीला १५००
हशमांची फौज होती.४ फेब्रुवारीच्या रात्री(माघ वद्य नवमी)राजगडावरून
निघालेले मराठा सैन्य गुंजवणी नदी पार करून सिंहगडाच्या पायथ्याला
पोहचले.दिवसासुध्दा चढण्यास अवघड असणारा द्रोणगिरीचा कडा तानाजींनी
कोंढाण्यावर चढाईसाठी निवडला.भयाण काळोखी रात्री मर्द मावळे दोरखंडाच्या
साह्याने द्रोणगिरीचा कड्यावरून वर चढू लागले.कडा चढत असताना दोर तुटून
कित्येक मावळे दरीत पडले पण शेवटी पाचशेवर मावळे कढा चढण्यात यशस्वी झाले.
द्रोणागिरी कडा(सिंहगड),याच मार्गाने तानाजी मालुसरे
आपल्या मावळ्यासह दोरखंडाच्या साह्याने कोंढाण्यावर चढले होते
No comments:
Post a Comment