सरदार बुबाजी पवार विश्वासराव यांना काळोजी व संभाजी असे दोन पुत्र होते. त्यापैकी हे ज्येष्ठ तर संभाजी कनिष्ठ पुत्र होय.
त्यांनी विश्वासराव किताब व विश्वासराई सरंजाम चा हिस्सा वडील नंतर त्याच्या पराक्रमी मुळे छत्रपती कडून मिळाले. साबुसिंग, कृष्णाजी व बुबाजी यांनी छत्रपती च्या मार्गदर्शन खाली औरंगजेब शी झगडून जेरीस आणले. तोच पराक्रम काळोजी व व संभाजी या दोन्ही बंधू ने मराठे सरदारांबरोबर मोगलांच्या मुलाखावर हल्ले करून१६९६ मध्ये माडूंगड घेऊन मराठे जरीपटका व छत्रपती राजाराम महाराजांचे अमंल माळवा प्रांत बसवले. १७०३ मध्ये माळवा व गुजरात तसेच खानदेश मराठे सरदारां बरोबर सरदार काळोजी पवार सोबत भाऊबंद केरोजी, रायाजी संभाजी, संभाजी पूत्र उदाजी पवार सह प्रचंड पराक्रमी केला.
माळव्यात पराक्रमी बद्दल तत्कालीन वीरगीतात
कालू ले चढियो कटक, धर निजाम धर दाट!
कीधां मुगला की केले, सुभटे कियो सम्राट!!
छत्रपती संभाजी महाराज पूत्र थोरले शाहू महाराजांनी औरंगजेब शी लढून जो पराक्रम गाजवला त्याबद्दल १६१४ मध्ये सातारा येथे सुभेलष्कर पदवी व पोशाख देऊन सन्मानित केला.
तसेच छत्रपती शाहू महाराजांनी मुजुमदार म्हणून तुको नारायण, कारभारी म्हणून बाळाजी मल्हार व जमेनिस विसाजी राम यांनी १६१९ नाव्हेंबर १९रोजी सातारा दरबारात दिले सुभेलष्कर सरदार काळोजी पवार यांनी चार पूत्र थोरले कृष्णाजीराव , तुकोजीराव जिवाजीराव व मानाजी राव ही होत. येतील तुकोजीराव हे देवास थोरली पाती व जिवाजीराव हे देवास धाकटी पातीतील मूळ पुरुष होते तर मानाजी राव हे पाथ्रेकर पवार घराण्यातील मूळ पुरुष होते...
श्री
सवादरोखा सके १६४३ प्लवनाम संवछरे कार्तिक शुद्ध ९नवमी ते दिवशी राजश्री कालोजी पा पवार मोकदम मौजे गणेगाव पा कर्डे जुन्नर सु सन ११३१ यासी सुभानजी डागरे मौजे मार सवादरोखा लेहोन दिल्हा यैसाजे पाढंरीने तुम्हास वाडा व घर बांधावयास जागा दिल्ही त्यामध्ये आपलेहि घर सापडले. आमच्या घरठाणियावरी दगड होते ते आपण तुम्हास खूष रजा बंदीने दिल्हे. तुम्ही आपणास लुगडे १एक व दाणे मण ८३व ३रूपये दिल्हे आपणास पावले. आजीपासोन आपणास दगडाची व घरवाडि यांची नाव गोष्टी करावयास आर्था आर्था समध नाही. आपल्या श्वसतोसे दिले आसे. या उपरी तुम्हासी आपला भाऊबंद कोण्ही कटकट करावयास उभा राहिला तरी त्यास आपण वारून. तुम्हासी बोलावयास समंध नाही. हा सवादरोखा दिल्हा.
सही
गोतसभा
१सिदसेट तोडकर
मौजे गणेगाव
१बागोजी पा बाबर
मौजे मजकूर
१तुकोजी टेमगिरे
१बि! केसो खंडेराव जोशी कुलकर्णी मौजे मजकूर (नि नांगर)
१ संभाजी पा ताबे मो मौजे मार गुर आबाजी आखाडे.
१संताजी नलकंडे
१चिलोजी चौधरी
केरोजी चौधरी
१राणोजी टेमगिरे
१सुभानजी सुतार
१दुलबाजी कुभांर
१पुजाजी चाभांर
१माणिक नाक माहार
सदरहू गोष्टी मौजे मार
--------------------------
सदर पवार घराण्यातील समाध्याचे नोंद करण्यात यावी म्हणून अखिल भारतीय मराठा महासंघ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य तर्फे निवेदन देण्यात आले यावेळी मा श्री. संदीप देशमुख (राष्ट्रीय जनसासंद शिरूर तालुका अध्यक्ष) उपस्थित होते)
आपले
मा श्री रणजित दादा जगताप
(अखिल भारतीय मराठा महासंघ युवक प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्य)
सदर लेख व माहिती संकलित
अखिल भारतीय मराठा महासंघ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष मा श्री संतोष झिपरे
९०४९७६०८८८
No comments:
Post a Comment