श्रीमंत बाजीराव पेशवे
भाग ६
डेनिस किंकेड या लेखकाने आपल्या ‘हिस्ट्री ऑफ मराठा पीपल’ या पुस्तकात म्हटलंय - ‘ब्रेव्हेस्ट ऑफ द ब्रेव्ह, फेअरेस्ट ऑफ फेअर, बाजीराव डाइड लाइक द मोस्ट फॅसिनेटिंग फिगर इन अ रोमान्स ऑफ लव्ह.’
ग्रॅण्ट डफने ‘हिस्ट्री ऑफ मराठाज’मध्ये म्हटलंय - ही हॅड बोथ द हेड टू प्लॅन अॅण्ड द हॅण्ड टू एक्झेक्यूट.
मिर्झा मोहम्मद नावाच्या एका इतिहासकाराने आपल्या ‘तारीखे मुहम्मदी’ या ग्रंथात बाजीरावाच्या निधनाबद्दल म्हटलंय- साहिबी फुतुहाते उज्जाम. अर्थात प्रचंड विजय मिळवणारा बाजीराव मृत्यूला बिलगला.’’
जगभरातल्या इतक्या इतिहासकारांनी आणि बखरकारांनी ज्याला नावाजलं त्या पंडित प्रधान श्रीमंत थोरल्या बाजीराव पेशवे यांची महती निनाद बेडेकरांनी थोडक्यात वर्णन केली.
खरं तर मराठय़ांच्या इतिहासात आपल्या उंबऱ्याबाहेर जाऊन मुलुखगिरी करण्याचं स्वप्नं सर्वप्रथम बाजीरावानेच दाखवलं. आज आपण परप्रांतीयांच्या घुसखोरी विरोधात आपलाच बचाव करण्यात शक्ती खर्च करतोय. पण बाजीरावाने मराठी साम्राज्यवादाचं स्वप्न तीनशे वर्षांपूर्वी जोपासलं होतं. त्यासाठी त्याने क्षत्रियत्व स्वीकारलं आणि ते ग्रेसफुली पेललं.
घोडदळ हा त्याकाळातल्या लढाईचा आत्मा. मंगोलियन योद्धे घोडय़ावर मोठे होतात असं म्हटलं जायचं. तसाच बाजीराव घोडय़ावर मोठा झाला. तो त्याच्या काळातला सर्वोत्तम घोडेस्वार होता. त्याच्या शिपायांसोबत तो घोडय़ावर सर्वात पुढे असायचा. घोडय़ावरच पिशवीत भाजलेले चणे घेऊन ते खातखात दौड करीत फाके मारत बाजीराव सैनिकांसह प्रवास करी. त्यांच्यासोबतच राही.
No comments:
Post a Comment