पोस्तसांभार ::आशिष माळी
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चीतेला अग्नी दिला साबाजी भोसले यांनी. साबाजी
भोसले हे शिंगणापूर भोसले कुळातील. महाराष्ट्रात अनेक भोसले कुळ पसरले
आहे. जसे शिवाजी महाराज हे वेरूळ भोसले कुलापैकी. त्याच प्रमाणे साबाजी
भोसले हे शिंगणापूर घराण्यातील . शिंगणापूर घराणे हे वेरूळ घराणे मधील मोठे
पाती चे असल्यामुळे त्यांना तो आधीकर मिळाला.
३ एप्रिल
१६८० , शनिवार ,हनुमान जयंती ,पूर्ण महाराष्ट्र साठी काळा दिवस .याच
दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी देह ठेवला.छत्रपती शिवाजी महाराज यांची
मृत्यूची बातमी संभाजी महाराजा पासून लपवली. रायगडच्या बाहेर ही बातमी जाऊन
दिली नाही .त्यामुळे संभाजी महाराजांच्या अनुपस्थित हे काम राजाराम
महाराजाना करायला हवे होते. पण सत्ताप्राप्तीसाठी त्यांनी केले नसावे किंवा
करून दिले नसावे ; हिंदू आणि वैदिक संस्कृतीनुसार मृत्यू झाल्यावर ,
परिवारास सुतक लागते आणि काही दिवस परिवारातील व्यक्तींनी काही व्यवहारीक
कार्ये तसेच महत्वाची कार्ये करायची नसतात ,पण त्या काळात मात्र घडलेल्या
घडामोडी नुसार राजाराम महाराज यांच्या नावाने राज्यभिषेक करण्याचे नियोजन
केले होते. महाराजांच्या मृत्यूनंतर राजाराम महाराजांनी विधी केला असता तर
राजाराम महाराजाना राज्यभिषेक करणे दिवसात शक्य नव्हते.आणि त्याच वेळी ही
बातमी संभाजी महाराजा कडे पोचली असती. कदाचित या प्रथेनुसारच साबाजी भोसले
यास राजांच्या पवित्र देहाला अग्नी द्यायला सांगितले असावे.
पुढे
१५ दिवसांनी , आबासाहेब गेल्याची बातमी शंभुराजांना कळली , नंतर
मंत्रीमंडळामार्फत सोयराराणी आणि कपटी अनाजीने , दि. २१ एप्रिल १६८० रोजी ,
राजरामास मंचकी बसविले वा मंचकरोहण केले , आणि सर्वत्र नव्या राजाची
ग्वाही फिरवली . पुढे लगेचच प्रधानमंडळी ( अनाजी , मोरोपंत ) मोठी फौज घेऊन
संभाजी महाराजांना अटक करण्यास निघाले .
कोण आहेत साबाजी भोसले ?
या
थोरल्या पातीच्या भोसल्यांचा मुळ पुरुष परसोजी भोसले आणि वेरुळकर
भोसल्यांचा बाबाजी भोसले हे संभाजी भोसलेंचे दोन मुलं. परसोजींचा मुलगा
बिंबाजीं भोसलेनी (सातारा जिल्ह्यात पुण्याजवळ) घेऊन शेती वगैरे लाऊन वसाहत
बसवुन गावची पाटिलकी संपादन केली.
बिंबाजीला
दोन मुले मुधोजी भोसले व रुपाजी भोसले शहाजी राजांचे समकालिन असुन
निजामशाहीत नौकरी करुन शिपाईगीरीचा धंदा करित असत. मुधोजींना तिन पुत्र
बापुजी भोसले, परसोजी भोसले व साबाजी भोसले. रुपाजीस मुलगा नव्हता.
रुपाजी
व पुतन्या परसोजी दोघेही शिवाजी महाराजांच्या सैन्यात सरदार होते तर
बापुजी व साबाजी महाराजा साठी शिपाईगीरी करत आणि वडील कडे राहत.
शिवाजीं
महाराजांच्या राज्यभिषेकानंतर १६७४ ला साबाजीला "एकनिष्ठ व पुरातन सेवक"
सनद देऊन राक्षसवाडी तर्फे राशिग तर्फे पिंपरी कडेवाडीत गावे इनाम दिली.
साबाजी विषयी इतिहासात पुढे माहिती मिळत नाही
परसोजी
भोसले हे संभाजी महाराजांच्या विरोधात आणि राजाराम महाराज बाजूचे . पुढे
संभाजी महाराज छञपती बनल्यावर ते निघून गेले. पण 1699 मध्ये त्यांचा
उल्लेख पुन्हा राजाराम महाराज यांच्या एका मोहिमेत आढलून येतो.
परसोजीनी
पराक्रम पाहुन १६९९ मध्ये "सेनासाहेबसुभा" किताब व जरिपटका देऊन वराड व
गोंडवन प्रांतात चौथाई व सरदेशमुखी वसुलीची सनद दिली. नंतर या घराण्याचा
विकास झाला आणि नागपूरकर भोसले म्हणून उदयास आले
No comments:
Post a Comment