*श्रीमंत शिवराव कृष्णराव पवार* ( तृतीय )
यांना पुण्यतिथीनिमित्त
विनम्र अभिवादन !!
श्रीमंत कृष्णराव पवार यांचा जन्म दिनांक 28/8/1908 रोजी धार येथे झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव कृष्णराव तर आईचे नाव लक्ष्मीबाई (सातारा जिल्ह्यातील मोळ येथील गुणाजीराव घाडगे ,झुंझारराव यांची कन्या ) या होत.
श्रीमंत शिवराव पवार वयाच्या सहाव्या वर्षी शिक्षणासाठी पुणे येथे गेले ,१३ वर्षापर्यंत त्यांचे शिक्षण पुण्यातील सेंट हेलीना स्कूल येथे झाले. त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचे शिक्षण बडोदा येथे झाले ,पुढे श्रीमंत शिवराव पवारांनी आपली जहागिरी नगरदेवळे येथे राहण्याचे निश्चित केले. श्रीमंत शिवराव पवार नगरदेवळात राहून सार्वजनिक कार्यात भाग घेत असत, पूर्व खानदेश जिल्हा लोकल बोर्डाचे प्रेसिडेंट म्हणून त्यांनी सण 1935 पासून दोन वर्ष कारभार सांभाळला .सन 1941 मध्ये जिल्हा स्कूल बोर्डाचे चेअरमन म्हणून काम केले. ते ऑनररी मॅजेस्टेट ही होते .
सन 1937 मध्ये बादशाह सहावा जॉर्ज याच्या राज्यरोहन प्रसंगी त्यांचा रौप्यपदकाने सन्मान केला गेला होता. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात 1939 ते 45 त्यांनी ऑनररी ऑफिसर या नात्याने सैन्य भरतीचे कार्य केले होते .श्री श्रीमंत शिवराव पवारांनी नगरदेवळे ग्रामपंचायतचे सरपंच म्हणून 21 वर्षे काम पाहिले.
त्यांनी आपल्या मातोश्री लक्ष्मीबाई यांच्या स्मरणार्थ त्यांच्या नावाने " लक्ष्मीबाई पवार लायब्ररीची " स्थापना केली, त्यांनी झेंडा बुरुज, नगरखाना ,राम मंदिराचा जिर्णोध्दार इत्यादी बांधकामे केली. ते निष्णाची शिकारी म्हणूनही प्रसिद्ध होते, त्यांनी उघड्यावर वाघाची शिकार करण्याचे धाडसही केले होते .
श्रीमंत शिवराव पवार यांची दोन विवाह झाले होते प्रथम विवाह सोंडूर संस्थांनचे अधिपती व्यंकटराव महाराज घोरपडे यांच्या कन्या सुशीला राजे यांच्याबरोबर तर दुसरा विवाह मालेगाव येथील श्री. कृष्णसिंह शंभूसिंह राजेजाधव यांच्या कन्या माणिक बाई यांच्याबरोबर झाला होता. श्रीमंत शिवराव पवारांना 1941 मध्ये एक पुत्र झाला, त्यांचे नाव कृष्णराव उर्फ बाळासाहेब होते.
श्रीमंत शिवराव पवार यांचे दिनांक १०/०२/ 1956 रोजी हृदयविकाराच्या आजाराने निधन झाले.
आज पुण्यतिथी निमीत्त विनम्र अभिवादन !!
महेश पवार
७३५०२८८९५३
No comments:
Post a Comment