*
शरीफनमुलुख संताजीराजे पांढरे यांचे ऐतिहासिक घुमटाकार स्मारक. ठिकाण- संतापूर, बीदर (कर्नाटक)
राजाराम महाराजांनी पांढरे सरदार घराण्यातील पराक्रमी सरदारांचा यथोचित सन्मान ठेवताना राजश्री संताजी पांढरे यांना 'शरीफनमुलुख' तर त्यांचे बंधू रात्नोजी यांना 'शहामत मुलुख' (साम्राज्याचे शौर्य) तर लुयाजी यांना 'समशेरबहाद्दर' असे किताब देऊन गौरविले होते. सन १७०२ साली विशाळगडाच्या पायथ्याशी असलेले औरंगजेबाचे मलकापूर येथील ठाणे संताजी पांढरे व प्रतापराव मोरे यांनी विशेष पराक्रम दाखवीत काबीज केले. त्यामुळे मोघलांना विशाळगड व त्याच्या आसपासचे किल्ले घेता आले नाहीत. त्यामुळे औरंगजेबाला शह देण्याचा व दहशतीत ठेवण्याचा मराठ्यांचा मनसुबा यशस्वी झाल्याने महाराणी ताराराणी यांनी या दोघांचाही "तुम्ही स्वामींचे एकनिष्ठ सेवक मायेचे विश्वासू आहात" अश्या शब्दांत गौरव केलेला आहे.
* संदर्भ- सरंजामी मरहट्टे- संतोष पिंगळे
No comments:
Post a Comment