एका मराठी राणीनं उत्तर भारतात संस्थान कसं सांभाळलं?
- ओंकार करंबेळकर
- बीबीसी मराठी प्रतिनिधी
कागलच्या राजाचा दिल्लीत राजवाडा
बायजाबाई
शिंदे यांचे भाऊ हिंदुराव घाटगे यांचे ग्वाल्हेर दरबारात विशेष वजन होतं.
मात्र जनकोजी शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे त्यांनाही ग्वाल्हेर सोडावं
लागलं आणि 1835 साली ते दिल्लीला इंग्रजांचं पेन्शन घेऊन राहू लागले.
हिंदुराव यांचा दिल्लीतला वाडा. या वाड्याचं 1857 च्या बंडाच्या काळात मोठं नुकसान झालं होतं. आता तिथं हिंदुराव हॉस्पिटल आहे.
दिल्लीला
त्यांचा स्वतःचा वाडा होता. इंग्रजांशी मिळून मिसळून राहाण्याचं धोरण
त्यांनी ठेवलं होतं. 1856 साली त्यांचा मृत्यू झाला. त्याच्या पुढच्याच
वर्षी 1857 चं बंड झालं. या बंडात या वाड्याचं मोठं नुकसान झालं. परंतु
आजही या वाड्याचे काही अवशेष शिल्लक आहेत.
राजा हिंदुराव घाटगे
आज
इथं दिल्लीतलं प्रसिद्ध हिंदुराव हॉस्पिटल आहे. 19 व्या शतकात झालेल्या
घडामोडींमुळे कोल्हापूर आणि कागलचं नाव उत्तर भारतात गेलं ते कायमचंच.
शिंदे घराणे आणि ज्योतिबा देवस्थान
कोल्हापूर जवळचं ज्योतिबा देवस्थान
हे शिंदे घराण्याचं कुलदैवत आहे. 1730 साली राणोजी शिंदे यांनी ज्योतिबाचं
सध्याच्या मंदिराचं बांधकाम आणि डागडुजी केली, अशी माहिती मिळते. तसंच
दौलतराव शिंदे यांनीही 1808 साली मदत केल्याचा उल्लेख सापडतो. अशा प्रकारे
ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याचा कोल्हापूरशी आणखी संबंध दिसून येतो.
संदर्भ आणि अधिक वाचनासाठी
1) महाराणी बायजाबाई शिंदे ह्यांचे चरित्र- द. बा. पारसनीस- बाबाजी सखाराम आणि कंपनी.
2) माझा प्रवास- विष्णूभट गोडसे- प्रतिभा प्रतिष्ठान
3) झाशीची राणी लक्ष्मीबाई- प्रतिभा रानडे- राजहंस प्रकाशन
4) पुण्याचे पेशवे- अ. रा. कुलकर्णी- राजहंस प्रकाशन
5) ट्रॅवेल्स ऑफ इंडिया- सुखमणी रॉय- रोहन प्रिंट्स
No comments:
Post a Comment