फडतरे हे ९६ कुळी मराठ्यातील १ प्रमुख कुळ.खटाव परगण्याचे बहामनी कालखंडापासूनचे देशमुख होत. दिल्लीस्थित केंद्रीय दफ्तर खाना व विविध मराठी इतिहास साधनांत त्यांचे उल्लेख आहेत. शं.ना.जोशी यांनी भारत इतिहास संशोधक मंडळातर्फे यांची माहिती प्रसिद्ध केली होती. त्यात बहुधा ६ जण भाऊ प्रत्येकी २ जण आदिलशाही, निजामशाही व मराठेशाहीत होते. छत्रपती शाहूकाळात मानाजी, म्हैसाजी, सुलतानजी, केदारजी, इ. शिलेदार व सरंजामदार होते. शाहुकाळात भोईटे, फडतरे, अनंत व धुमाळ हे कोकणात काळुस्ता वगैरे किल्ले घेण्यासाठी लढले होते. पेशवे काळातही पानिपत, खर्डा वगैरे युद्धात फडतरेंचा सहभाग होता. उत्तर पेशवाईत फडतरे घराण्यातील एक रावजी फडतरे हुजूरातीत पागेचे सरदार होते. फडतरे मंडळी छत्रपतींची जुनी निष्ठावंत सरदार होत. कोल्हापूर व तंजावर संस्थान कडेही ते होते. ग्वाल्हेर संस्थानात बकसनपुर इथ भोईटे तडवळेकर, यादव औंधकर, फडतरे कुरोलीकर हे जहागिरदार होते. नागपुरकर मंडळीचे व अक्कलकोट च्या फत्तेसिंग भोसले यांचे सहाय्यक सरदारांत फडतरे घराणे होते. खटाव तालुक्यात यांचा वंश आहे व ते पाटीलकी व देशमुखी ची इनामी गाव चालतात. देशमुख शिक्का फारसी होता. काही गाव कुरोली, नेर, लोणी, जिहे-कठापुरजवळचे, सासवड नजिक बोपेगाव, तसेच, फडतरे मंडळीं सोलापूर, सांगली, नगर कडेही आहेत. पेशवाईत होळकर व फडतरे मानापमान रंगला होता. बरीच माहिती आहे याबद्दल पण वेळेअभावी इथ पोस्ट करीत नाही.
-राहुल भोईटे
No comments:
Post a Comment