1760
च्या डिसेंबर अखेरीस गोविंद पंत बुंदेला अब्दालीची रसद मारण्यासाठी
रोहिलखंडात शिरले. पानिपत येथे मराठा सैंन्याची अन्न पाण्यावाचून वाताहात
झाली होती. अन्न विकत घेण्यासाठी हातात पैसा सुद्धा नव्हता. भाऊ सतत
मामलेदारांकडे पैशासाठी तगादा लावत होते. त्याच वेळी उत्तरेतला एक मामलेदार
गोपाळराव गणेश बर्वे दहा हजारांचे अनअनुभवी सैन्य घेऊन शुजाच्या मुलखात
घुसला. गोपाळरावांच्या मराठा शिलेदारांनी भोजपुरच्या बळकट गढीवर हल्ला
चढविला. या गढीत काही उत्तम बंदुकधारी रोहिले होते. पण मराठ्यांच्या पुढे
त्यांचा काही टिकाव लागला नाही आणि ते पळून जवळच असलेल्या धरेमौ गढीच्या
आश्रयाला गेले. मराठ्यांनी आता या गढीस वेढा घातला. उपासमार झाल्याने
किल्लेदाराने पुर्ण ताकतीने मराठ्यांवर प्रतिहल्ला केला पण या चकमकीत
सुद्धा रोहिल्यांचा पुर्ण बिमोड झाला. त्यांचे अनेक सैनिक कापले गेले तर
अनेक युद्धबंदी झाले. मराठ्यांनी शुजाच्या मुलुखाची वाताहात केली आणि ते
तसेच पुढे अलाहाबाद प्रांतात सरकले अलाहाबाद जवळ असलेल्या नबाबगंज या
समृद्ध पेठेवर मराठ्यांनी हल्ला केला आणि ही पेठ लुटुन फस्त केली. मराठे
तसेच पुढे फुलार्यास गेले आणि तिथे सुद्धा हाच प्रकार केला. गंगेच्या
तीरावर मराठ्यांनी अक्षरशः धुमाकुळ घातला.
मराठ्यांनी भोजपुरच्या आणि धरेमौ च्या गढीवर हल्ला केला ती तारीख होती - 30 डिसेंबर 1760.
No comments:
Post a Comment