विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 4 April 2023

त्रिंबकजी डेंगळे पाटील

 

A bright man from dark era..
त्रिंबकजी डेंगळे पाटील 
लेखन :कौस्तुब कस्तुरे


दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचे दिवाण. आधीचे दिवाण सदाशिव माणकेश्वर हे तसे मवाळ होते. आधीचा ब्रिटिश रेसिडेंट बॅरी क्लोज देखील मवाळ होता. पण त्याच्या जागी एल्फिन्स्टन आला आणि तो राज्य गिळणार हे दिसू लागताच बाजीरावांनी सदाशिव माणकेश्वरांना खाजगी कारभारी करून दौलतीत दिवाण म्हणून त्रिंबकजी डेंगळे यांना नेमलं. त्रिम्बकजी म्हणजे प्रती नाना फडणवीस. त्यांनी बापू गोखले, पानसे वगैरे सरदारांना आणि अगदी बडोदेकर गायकवाड, शिंदे, होळकर, नागपूरकर भोसले यांना एक करून इंग्रजांना हाकलून द्यायचं राजकारण सुरू केलं. एल्फिन्स्टनला नेमकी बाजीरावांची ही चाल खुपली. काहीतरी निमित्त काढून त्रिंबकजींना दूर करावं म्हणून बडोदेकर वकील गंगाधर शास्त्री पटवर्धन यांची पंढरपुरात हत्या करवून त्याचा आळ डेंगळे पाटलांवर आणला. बाजीराव त्रिंबकजींना इंग्रजांकडे सोपवायला तयार नसल्याने ब्रिटिशांनी युद्धाची तयारी केली. त्रिंबकजी स्वतःहून इंग्रजांच्या ताब्यात गेले. पुढे एक वर्ष ठाण्याच्या कैदेत होते, आणि अखेरीस कैदेतून पळाले. या सगळ्याला बाजीरावांची अंतर्गत मदत होती. सुटल्यावर पेंढारी जमवून त्रिंबकजी लपून छपून ब्रिटिशांची लांडगेतोड करत होते. अखेरीस तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धात ते उघडपणे बाजीरावांकडे आले. १८१८ मध्ये बाजीरावांच्या शरणागती नंतर त्रिम्बकजी पकडले जाऊन त्यांना चुनारच्या किल्ल्यात कैद केलं, पुढे दहा वर्षांनी त्यांचा कैदेतच मृत्यू झाला.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...