एका मराठी राणीनं उत्तर भारतात संस्थान कसं सांभाळलं?
- ओंकार करंबेळकर
- बीबीसी मराठी प्रतिनिधी
दक्षिणेची सौंदर्यलतिका
बायजाबाई
शिंदे दिसायला अत्यंत सुंदर आणि सुस्वरुप होत्या असं वर्णन अनेक
इतिहासलेखकांनी केलं आहे. इंग्रज लेखकांनी तिला ब्युटी ऑफ डेक्कन
(दक्षिणेची सौंदर्यलतिका) असं म्हटलं आहे.
बायजाबाई
शिंदे ग्वाल्हेरला गेल्यावर त्यांचा सर्व कारभारात वावर असे.
शिकारीमध्येही त्या सहभागी होत. भाला फेकणे, बंदुकीने शिकार करणे,
घोडेस्वारी अशा सर्व कलांमध्ये त्या निपुण होत्या.
दौलतराव
शिंदे यांचा 1827 साली मृत्यू झाला. तत्पुर्वी आपला राज्यकारभार बायजाबाई
शिंदे यांनीच सांभाळावा अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे
बायजाबाई शिंदे यांच्याकडे ग्वाल्हेरच्या सर्व कारभाराची सूत्रं आली.
राज्यकारभार आणि हिंदुराव घाटगे
1810
साली सर्जेराव घाटगे यांचं निधन झाल्यानंतर त्यांचा मुलगा राजा हिंदुराव
(मूळ नाव जयसिंगराव) ग्वाल्हेरला येऊन राहिला. हे हिंदुराव दौलतराव शिंदे
यांच्याबरोबर काम करू लागले. हिंदुराव घाटगे यांचं ग्वाल्हेरच्या दरबारात
मोठं प्रस्थ तयार झालं.
दौलतराव
शिंदे यांचा मृत्यू झाल्यानंतर बायजाबाईंनी शिंदे घराण्यातील मुकुटराव
नावाच्या पुत्रास दत्तक घेऊन राजगादीवर बसवलं आणि त्यांचं नाव जनकोजी असं
ठेवण्यात आलं.
त्यानंतर
बायजाबाई यांनी आपला भाऊ हिंदुराव, बापूजी रघुनाथ, यशवंतराव दाभाडे,
यशवंतरावभाऊ बक्षी, लालाभाऊ, फकीरजी गाढवे, माधवरावपंत ब्रह्माजी,
लक्ष्मणराव विठ्ठल, रामराव फाळके, मणिराम शेट, दाजीबा पोतनीस, आत्माराम
वाकडे या सरदारांच्या मदतीने आणि काही इंग्रज सैन्य अधिकाऱ्यांच्या मदतीने
राज्यकारभार पाहायला सुरुवात केली.
द. बा. पारसनीस यांनी लिहिलेलं बायजाबाई यांचं चरित्र
No comments:
Post a Comment