भाग १
श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नंतर मराठासाम्राज्याची पडझड होऊ लागली होती. श्रीमंत ताराराणी यांनी सत्ता स्थापन केली परंतू गृहकलहा मुळे पुन:श्च मराठा राज्याची सर्वच आघाड्यांवर पिछेहाट सुरू होती. छत्रपती शिवाजी महाराजांचे चिरंजीव छत्रपती राजाराम यांनी 1680 मध्ये राजगादी सांभाळली. मात्र लगेचच छत्रपती संभाजी महाराजांची (1657-1689) रायगडावर जाऊन कारभार हाती घेत 1681 साली स्वत:स राज्याभिषेक करून घेतला. छ.संभाजीराजेंनी शिवरायांचे अपूर्ण राहिलेले कार्य पुढे नेण्यास आरंभ केला. आदिलशाही, पोर्तुगीज, कुतूबशाही,मोगलसत्ता या सर्वांविरुध्द संभाजीराजे लढले. त्यांचेवर वेळोवेळी विविध आरोपही झालेत. छ. संभाजीराजे व श्रीमंत येसूबाई साहेब यांचे पोटी शाहू राजांचा 1682 रोजी जन्म झाला. शिवरायांच्या गादीस आणखी एक वारस मिळाला.पुढे छ. संभाजी महाराजांची 11 मार्च 1689 रोजी तुळापूर येथे क्रुर हत्त्या झाली. मराठा राज्य आणि रयत सैरभैर झाले. छत्रपती राजाराम महाराजांनी रायगड, पन्हाळा यानंतर सातारा येथे मराठा राज्याची गादी स्थापन केली. त्यांनी मोगलांविरुध्द मोठी मोहिम राबवली. मात्र 3 मार्च 1700 रोजी त्यांचा सिंहगडावर मृत्यू झाला. अंतर्गत कलह व महत्वाकांक्षेपोटी महाराणी ताराबाई यांनी 1701 रोजी छ. शिवाजी (दुसरे) यांना रयतेची इच्छा नसतानांही राज्याभिषेक केला. गृह कलहाची जागा युध्दात परावर्तीत झाली अन् छ. शाहूराजे व महाराणी ताराबाई यांच्या खेड येथील युध्दात ताराराणींचा पराभव झाला. छ.शिवाजी व छ.संभाजी(दुसरे) यांनी कोल्हापूर (करवीर) येथे गादी निर्माण करून अधिकार सांगीतला. सातारच्या मुख्य गादिवर ताराराणींचे नातू छ.रामराजे विराजमान(1750). याच दरम्यान पंतप्रधान पेशवे व महाराणी ताराबाई यांच्यात समेट झाला.
छत्रपती शाहू महाराज (थोरले) यांच्या कारकिर्दीत सातारा येथून मराठा राज्याने हिंन्दुस्थानात घोडदौड केली. गादिवर बसण्यास महाराणी ताराबाईंचा शाहूंना विरोध होता. अनेक वर्षे छ. शाहूराजे मोगलांच्या मुक्त कैदेत होते. पुढे सुटका झाल्यावर त्यांनी अनेक किल्ले ताब्यात घेऊन प्रसंगी ताराराणींशी युध्द करून 1708 मध्ये स्वत:स राज्याभिषेक करुन घेतला व मराठा राज्याची विस्कटलेली घडी नीट बसवली. 1713 मध्ये शाहूराजांनी बाळाजी विश्वनाथ यांना ‘पेशवे’ पद दिले. 1720 मध्ये बाळाजी पेशवेंचा मृत्यू झाल्यानंतर शाहूंनी पहिल्या बाजीरावास पेशवे पद दिले.बाजीराव पेशवेंनी हिन्दुस्थानात स्वार्या करुन मराठा राज्यासाठी मोठी कामगिरी केली. छ.शाहूंनी शिंदे-होळकर आदि अनेक राजे-सरदार-योध्दे निर्माण केले. पहिल्या बाजीरावांच्या मृत्यूनंतर (1740) नानासाहेब यांना पेशवेपद मिळाले. नानासाहेबांनीही हिन्दुस्थानात स्वार्या करुन मराठी राज्याचा ध्वज फडकवला. दिल्लीची सत्ता सूत्र छ.शाहूंच्या आशिर्वादाने श्रीमंत नानासाहेब पेशवेहकडे आली. अटकेपार मर्हाठी झेंडा लावण्याचा संकल्प त्यांनी केला.
No comments:
Post a Comment