राजेवाडी (ता. खंडाळा
पोस्तसांभार :विकास चौधरी
गतकाळाचे वैभव सांभाळणारा पूर्वाभिमुखी असलेला वाडा भोर जवळील राजेवाडी इथे आहे. दर्शनी भागात भव्य सागवाणी दरवाजा, दरवाजाच्या बाहेरील बाजूस आठ खांबी लाकडातील लहान सोपा, त्याला कमरे इतक्या उंचीचा लाकडी सज्जा, सोप्याच्या मध्यातून दरवाजाकडे जाणाऱ्या पायऱ्या. सोप्याला लाकडी फळ्यांचा छत, त्या छतावर दुसऱ्या मजल्याचा नक्षीदार सज्जा. प्रवेशद्वाराबाहेरील नक्षीदार सागवानी खांब घडीव दगडीवर स्थापित केलेले आहेत. तळ मजला घडीव दगडी बांधकामात असून दर्शनी भागातील दुसरा व तिसरा मजला वीट बांधकामात आहे. मात्र वाड्याचा अंतर्गत भाग दुमजली आहे.
चौसोपी वाड्याचे छताला थापिव कौलांचे आच्छादन आहे. भव्य दरवाजा ओलांडून आत प्रवेश करताच पहिल्या चौकाच्या मध्यभागी तुळशी वृंदावन, चारही बाजूला असलेल्या पडव्यांनी हा चौक होत असला तरी चोहोबाजूचे दगडी बांधकामातील जोते अष्टकोणी असून संपूर्ण फरसबंदी चौकात पडणारे पाऊसाचे पाणी बाहेर पडण्यासाठी अष्टाकृती आकाराचे घडीव दगडातील पाणी वाहिका देखणी आहे. डाव्या बाजूला देवघर आहे. देवघरात कुलस्वामिनी व इतर देवदेवता आहेत. तेथे एक ॲल्युमिनियमची लहान थाळी व वीणा असून ह्या दोन्हीही वस्तू राष्ट्रसंत गाडगे महाराजांची असल्याचे ह्या वाड्याचे यजमान मा. श्री. दाजीसाहेब चंद्रसेन मोहिते सांगतात. त्यांच्या म्हणण्यानुसार किर्तनसेवेला महाराज आल्यावर ते त्यांचे वाड्यात राहायचे. हे मोहिते घराणे मूळ इंदापूर बावडा नजीक असलेल्या टण्णू टाकळी येथील असून छत्रपति राजाराम
महाराजांची असल्याचे ह्या वाड्याचे यजमान मा. श्री. दाजीसाहेब चंद्रसेन मोहिते सांगतात. त्यांच्या म्हणण्यानुसार किर्तनसेवेला महाराज आल्यावर ते त्यांचे वाड्यात राहायचे. हे मोहिते घराणे मूळ इंदापूर बावडा नजीक असलेल्या टण्णू टाकळी येथील असून छत्रपति राजाराम महाराजांच्या कालखंडात येथे वतनदार म्हणून आले व तत्कालीन पूर्वजांनी हा वाडा बांधला. मोहिते घराण्याचे नातेसंबंध अनेक सरदार घराण्यांशी आहेत, तर दाजीसाहेब यांच्या आजी ह्या सयाजीराव गायकवाड घराण्यातील तर आई सिन्नरच्या वावीकर भोसले घराण्यातील होत्या अशी माहिती मोहिते सांगतात.
माहिती - सुरेश शिंदे
No comments:
Post a Comment