विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 22 May 2023

!! क्षञिय शब्दाची व्युत्पत्ति,व्याप्ति व महती !!

 


!! क्षञिय शब्दाची व्युत्पत्ति,व्याप्ति व महती !!
1] रघुवंश द्वितीयसर्गमध्ये = "क्षतात्ञीयते सः क्षञियः" या सदरील व्युत्पत्तीत क्षत् ञीयते असे शब्द निघतात,यात क्षत् म्हणजे जखम,घाव ,व्रण आणी ञीयते म्हणजे तारणारा,रक्षण करणारा म्हणजेच संकटापासुन रक्षण करणारा तो क्षञिय ही व्युत्पत्ती स्थुलप्रकारे झाली. परंतु या व्युत्पत्तीने क्षञियत्वाचा यथार्थ बोध होत नाही. 2] "क्षेञात रमते सः क्षञिय:" ! सदरील व्युत्पत्तीत क्षेञ म्हणजे शेत ,यामध्ये सतत रममाण होत्साता शेतीविषयक म्हणजेच क्रुषिकर्म विषयक कर्तव्यास जो आचरतो तो क्षेञिय म्हणजेच कुळंबी .तसेच क्षेञ म्हणजे रणक्षेञ,समरांगण,धारातीर्थ,युद्धभुमी,यामध्ये जो रमतो तो क्षञिय/क्षेञिय.क्षेञिय हा मुळ शब्द धरल्यावर,क्षेञ इय अशा घटनेने मुळच्या शब्दाचे रुप क्षञिय बदलुन क्षेञीय असे होते.तसेच ऋग्वेदातील क्रुषीसुक्तात देखील क्षेञिय असाच शब्द आढळतो.क्षेञीय या शब्दामधुन क्षेञ हा स्वतंञ शब्द काढुन ठेवल्यावर उरलेल्या तदंतर्गत ईय या प्रत्ययाचा अर्थ तत्संबंधी असा होतो.अर्थात क्षेञीय म्हणजे क्षेञाशी संबंध ठेवणारा असा अर्थ झाला.क्षेञ म्हणजे रणक्षेञ ,अर्थात रणक्षेञाशी संबंध ठेवणारा तो क्षेञीय/ क्षञिय असा त्याचा एकप्रकारे अर्थ होतो. दुसरा अर्थ क्षेञ म्हणजे शेत आणी क्षेञीय म्हणजे शेतासंबंधीचा अर्थात शेतकरी-कुळंबी. कुळंबी हा शब्द कुळंबीजं या संस्क्रुत शब्दाचे पर्यायरुप आहे.कुळांचे जे बीज ते कुळंबीजं.कुळंबीजं या संस्क्रुत शब्दांचे कुळंबीज-कुळंबी असे प्राक्रुतरुप अगदी सरळ सार्थ, भाषा शास्ञ व व्याकरण शास्ञ यांच्या आधारे अगदी यथार्थ आहे. कुळंबी मराठा- क्षञियांच्या मुख्य 96 कुळांचे जे बीज तेच कुळंबी. क्षञियांच्या 96 कुळांचे मुळ खरे बीज आर्य-क्षञिय आहेत हे इतिहास प्रसिद्ध आहे.म्हणुनच मराठ्याना "आर्यर/ आरेय" असे संबोधतात,आणी टालेमीने मराठा जेथे राज्य करतात त्या महाराष्ट्रास आर्याके म्हणजे आर्यांचे राज्य असे म्हटले आहे. तसेच दक्षिणेत आर्यक्षञिय या अर्थी कुळंबी शब्द वापरतात आणी उत्तरेत आर्य क्षञियास कुर्मवंशी म्हणतात. संस्क्रुतात कु म्हणजे प्रुथ्वी आणी रम म्हणजे वल्लभ, यावरुन कुरम म्हणजे भुपति,क्षञियराजा असा सरळ अर्थ होतो. तसेच मिश्रण सुर्यमल्ल याने आपल्या वंशभास्कर नामक ग्रंथात {भाग 2 पेज 1013} कुर्मवंश सुर्यवंशांतर्गतच मानला असुन त्याची उत्पत्ती अयोध्येच्या सुमिञ राजाचा पुञ कुर्म यापासुन झाल्याचे लिहिले आहे= " सुमिञवंश रठ्ठोर कुर्मवंशोत्पत्ति ! ञुतिय राशि सप्त पंचांश मयुख ".तसेच शतपथ ब्राह्मण कांड 7 अध्याय 5 मध्ये,"स यः स कुर्मो$सौ स आदित्यः" म्हणजे कुर्म शब्दाचा अर्थ सुर्य असा आहे असे वर्णिलेले आहे. म्हणजेच यावरुन कुर्मवंश म्हणजे सुर्यवंशी क्षञिय होत. यावरुन कुर्मी, कुळंबी, कुणबी हे अस्सल क्षञिय असल्याचे सिद्ध होते.तसेच ऋग्वेद मंडल 6 सुञ 37 मध्ये, "वरिष्ठोअस्य दक्षिणामियर्तीन्द्रो मधोनां तुविकुर्मितमः" या सुक्तात तुविकुर्मि हा शब्द इंद्राला उद्देशुन आहे,तुवि या शब्दाचा अर्थ मोठा,महा असा होतो.तसेच मराठा क्षञियात तुवर/तोवर या नावाचा श्रेष्ठवंश अद्याप नांदत आहे त्या वंशास तुवि शब्दा वरुनच तुवर हे नाव पडले.म्हणजेच कुळंबी व कुर्मी हे अस्सल क्षञिय आहेत फक्त अनुक्रमे दक्षिण व उत्तर भारतात त्यांची वेगवेगळी नावे पडलेली आहेत. कुळंबी या उच्चार्थी शब्दाने कोणाकोणास उल्लिखिले आहे ते पाहु = ऋग्वेदात इंद्र व सुर्य याना कुर्मि म्हटले आहे.हरिश्चंद्र,दिलिप,रघु,अजय,दशरथ,रामचंद्र,कुश हे कुळंबी उर्फ कुर्मी म्हणजे आर्य क्षञिय होते असे उल्लेख मिळतात. पद्माकर कविक्रुत जगद्विनोद नामक ग्रंथात जयपुरचे राजे सवाई जगतसिँह कच्छवाह याना सुर्यवंशी व कुर्मवंशी म्हटले आहे.प्रुथ्वीराज चौहाण याना कुर्म या संद्न्येने उल्लिखिलेले आहे. तसेच मि हंटर साहेबानी केलेले स्टँटिस्टिकल अकौट आँफ बेँगाल भाग 11 यात म्हटले आहे कि," महाराष्ट्र साम्राज्यसंस्थापक छञपती शिवराय महाराज हे कुळंबी, कुणबी,कुर्मी,मराठा क्षञियच होते. त्यांची वंशावळ उदयपुरच्या सिसोदिया राज घराण्याशी बरोबर मिळाली असुन ती खरी असल्याबद्दल राणी सरकारचा शिक्कामोर्तबही झालेली आहे".तसेच मि.कार्नेजी यांच्या पुस्तकातील विवेचन,"सातारचे राजेभोसले सरकार, ग्वाल्हेरचे शिँदे सरकार व नागपुरचे राजेभोसले हे कुळंबी म्हणजे अस्सल क्षञिय अतेव त्या जाति संबंधित होते. " तसेच मि कँपबेलने असे सिद्ध केले आहे कि,"महाराष्ट्र-महारथ -महारथी-मराठा यांची सत्ता ज्यानी स्थापन केली ते कुळंबी{अस्सल क्षञिय } होते" आणी शिवराय महाराज व त्यांचे बहुतेक सरदार कुळंबी क्षञियच होते. तसेच मुंबई ग्याझेटियर सातारा भाग 19 पेज 75 यात लिहिले आहे कि, "बहुतेक सातारा जिल्ह्यात मराठा जातीचे लोक आढळुन येतात.कुळंबी व मराठा ही एकच जात आहे म्हणुन सन 1881 सालच्या खानेसुमारीत त्याना कुळंबी या सदरातच दाखल केले आहे".तसेच शेतकी करणार्या मराठ्यास कुळंबी म्हणतात.बाँबे ग्याझेटिअर पुणे भाग 18 पोटभाग 1 यात म्हटले आहे कि," कुळंबी या शब्दात मराठा व कुळंबी या दोन मुख्य वर्गाचा समावेश होतो, यांच्यात भेद दर्शविणे ही फार कठिण गोष्ट आहे.मराठा व कुळंबी यांच्यात परस्पर रोटीबेटी व्यवहार आहे आणी रंगरुप,धर्मकर्म, रीतीरीवाज यात काहीच फरक नाही". तसेच 1881 सालाचा वर्हाडचा खानेसुमारीचा रिपोर्ट यात म्हटले आहे कि, राणे राजपुतांची लोकसंख्या वर्हाडात 3632 असुन ते निःसंशय मुळचे मराठे आहेत.या सर्व प्रमाणावर मराठा, कुळंबी,राजपुत क्षञिय हे 400-500 वर्षापुर्वी अगदी एकाच जातीचे असुन त्यांच्यात रोटी व बेटीव्यवहार होत होते असे सिद्ध होते." तसेच इम्पीरिअल ग्याझेटिअर आँफ इंडिया{new edition} भाग 16 यात म्हटले आहे कि," महाराष्ट्र हा देश मराठ्यांचा आहे..मराठा जातीचे लोक वज्रदेही, वीर्यवान व लढवय्ये असुन एकेकाळी सर्व हिँदुस्थानभर त्यांचा दरारा बसला होता. त्या लढवय्या जातीच्यावंशजानाच आज मराठा म्हणतात"

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...