विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 8 May 2023

#सरदार_रास्ते_वाडा- भाग - ३

 

भाग - ३
पोस्तसांभार ::विकास चौधरी 


आनंद माधवांच्या आजोबांनी या वाड्यावर तिसरा मजला चढवला. मोठी दालने असलेला हा तिसरा मजला आता वापरात नाही. दुसऱ्या मजल्यावरील राहता भाग सोडला, तर काही दालने सरकारी कार्यालयासाठी दिलेली आहेत, वरच्या मजल्यावर छपराखाली पोपटांना राहण्यासाठी नक्षीदार गवाक्षे बांधली आहेत. तसेच पाळीव प्राण्यांना राहण्याची सोयही केलेली आहे. सरदार रास्ते घोडदळाचे प्रमुख असल्यामुळे, वाड्याभोवती पागा होत्या. पिलखाना होता. कालांतराने त्याचा वापर बारा बलुत्यांच्या राहण्यासाठी करण्यात येऊ लागला.
मुख्य दरवाज्यातून आत शिरल्यावर तटर्मितीला लागून असलेल्या दरबार हॉलमध्ये आता लक्ष्मीबाई रास्ते प्राथमिक शाळा भरते. पूर्वी वाड्याच्या चौकात आगरकर शाळा भरत असे. आवारात पूर्वेस उमाबाईसाहेब खंडेराव रास्ते यांनी बांधलेले रामाचे देऊळ आहे. त्यातील राम-लक्ष्मण-सीतेच्या मूर्ती देखण्या आहेत. शेजारी दत्ताचे मंदिर आहे. वर नगारखाना आहे. मंडपातही लाकडी कोरीव खांब आहेत. एकूण लाकडी खांब व खिडक्या यांची निगा राखायची, तर त्याला तेलपाणी करावे लागते. एकावेळी त्याला अंदाजे पंधरा-वीस हजार रुपये खर्च येतो.रामजन्माचा उत्सव केला जातो. (डाॕ. मंदा खांडगे) सन २००२
माहिती -वैभव पेशवेकालीन वाड्यांचे
फोटो - रास्ते वाडा, रास्ता पेठ पुणे महानगरपालिका
विकास चौधरी

No comments:

Post a Comment

राजश्री शहाजीराजे भोसले आणि त्यांचे विश्वासू, सरदार मलोजी बिन तुकोजी रणनवरे

  राजश्री शहाजीराजे भोसले आणि त्यांचे विश्वासू, सरदार मलोजी बिन तुकोजी रणनवरे : सरदार मलोजी रणनवरे हे जिंती तालुका फलटण येथील पुरातन वतनदार....