सरदार रास्त्यांच्या भव्य चौसोपी वाड्याचा जिना चढून मी त्यांच्या दिवाणखान्यात विसावले. दिवाणखान्याच्या डाव्या-उजव्या हाताच्या उंच खिडकीतून त्या प्रचंड वाड्याचा परीसर दृष्टीत सामावत नव्हता. बाजूच्या चौकातील महालांची नक्षीदार गवाक्षे आणि त्यावरील महिरपी डोळ्यांच्या चौकटीत बंदिस्त करण्याचा प्रयत्न मी करत होते.
श्री. रास्ते सांगत होते, " वेळणेश्वर हे आमचे मूळ गाव. वेळणेश्वर हे आमचे कुलदैवत तिथेच आहे. गुहागरजवळ समुद्राच्या किनाऱ्यावर हे अगदी लहानसं गाव आहे. आम्ही तिथले गोखले-रास्ते.' "म्हणजे तुम्ही मुळचे गोखले, मग रास्ते ही तुम्हाला पदवी मिळाली की काय?" " "होय, ती एक हकीगतच आहे मोठी!" ते पुढे सांगू लागले. "आमचे पूर्वज सावकारी करीत, अगदी विजापूरच्या अदिलशहापासून, कोकण प्रांताची रसद ते पोहचवीत. आमच्या घराण्यातील एका पुरुषाने वेळणेश्वर भागातील लाखो रुपये किमतीची बिनवारशी मिळकत जप्त करून विजापूरास बादशहाकडे पावती केली. त्याला आश्चर्य वाटले. तो म्हणाला, 'यह इसमे से दो-तीन लाख खा जाता, तो भी हमें मालूम न होता. इसलिये गोखले को रास्ते कहना चाहिए!' त्याने रास्त काम केले अशा रीतीने बादशहाने रास्ते ही दिलेली उपाधी. मग गोखले ऐवजी 'रास्ते' हेच नाव रूढ झाले.
-मंदा खांडगे
-क्रमशः
वैभव पेशवेकालीन वाड्यांचे
-डाॕ. मंदा खांडगे
-फोटो सरदार रास्ते वाडा २०२० (विकास चौधरी)
सरदार रास्ते वाडा-
(रास्ता पेठ, पुणे महानरपालिका)
No comments:
Post a Comment