मराठाशाहीतील जगदाळे घराणे
लेखन : अमित जगदाळे
घराण्याचा विस्तार[संपादन
]
बहामनी काळापासून या घराण्याला सुमारे १६८
गावाची मसूर परगणा येथील देशमुखी होती.नंतर शिवशाही आल्यामुळे वतनदारी
पद्धत बंद झाली आणि देशमुखीच्या ऐवजी जगदाळे घराण्याने सर-पाटीलकी
स्वीकारली.मसूर परगण्यातीलच काही गावाची पिढीजात सर-पाटीलकी शिवाजी
महाराजांकडे सुद्धा होती.त्यावेळी या घराण्याला मसूर,गराडे व दौंड-लिंगाळी येथील दीडशे गावांची सर-पाटीलकी मिळाली[१]
.जगदेवराव जगदाळे हे या घराण्याचे मूळ पुरुष समजले जातात.
इतिहास[संपादन
]
, सरदार महादजी जगदाळे, सरदार मल्हारराव जगदाळे, सेनापती आबाजीराव जगदाळे, सरदार यशवंतराव जगदाळे, सरदार पिराजीराव जगदाळे
असे अनेक पराक्रमी मराठा योद्धे या घराण्यात होऊन गेले.
सरदार
यशवंतराव जगदाळे व सरदार पिराजीराव जगदाळे यांनी पानिपतच्या लढाईत
भीम-पराक्रम गाजवला दत्ताजीराव शिंदे यांच्यासमवेत ते नजीबखान याच्या
विरुद्ध बुराडीघाटच्या लढाईत लढले. शिंदे यांच्या बरोबरच या दोन सरदारांनी
आपल्या प्राणाची आहुती या संग्रामात दिली[२]
.
श्रीमंत छत्रपती शाहू
(थोरले) महाराजांच्या आदेशावरून सरदार आबाजीराव जगदाळे (वय ७३) यांनी निजामाविरुद्ध १७४२ साली बेलूर मोहीम काढली, त्यावेळी त्यांनी महादजी शिंदे
(वय ११) यांना मांडीवर बसवून मोहिमेस नेले. ....(संदर्भ- शिंदे दफ्तर)
गणेशोत्सवाची सर्वात जुनी परंपरा
या
संदर्भातच १७३२ मधील नोंद उपलब्ध असून, गराडे या सासवडजवळील गावाची
सर-पाटीलकी जगदाळे यांची होती.तर पोट-पाटीलकी थोरले बाजीराव पेशवे आणि
त्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी विकत घेतली होती. ती नानासाहेब पेशवे
यांनी पुरंदरे यांना देऊन टाकली. या पाटीलकीचे हक्क आणि मानपान याविषयी कलम
असून, "गणेश गौरी पुरंदऱ्यांच्या पुढे व मागे जगदाळे यांच्या' असा स्पष्ट
उल्लेख आहे.गराडेसारख्या गावातदेखील गणेश-गौरीची प्रथा पूर्वापार चालत
होती आणि तेथेसुद्धा मिरवणुकीने मानाच्या क्रमांकासह प्रतिष्ठापना होत
होती.वंश परंपरेनुसार पहिला मान जगदाळे यांना होता [३]
संदर्भ
- जगदाळे कैफियत- मराठा इतिहासाची साधने
- पानिपत- विश्वास पाटील आणि पेशवा दफ्तर
- भारत इतिहास संशोधक मंडळ
"जगदाळे घराणे" हे मुळचे धार(माळवा) येथील सम्राट परमार/पवांर/पवार यांच्या घराण्याची शाखा होय. पवार घराण्यापासून जगदाळे,निंबाळकर आणि दळवी ही घराणी निर्माण झाली. श्रीमंत जगदाळे , पोकळे घराणे ९६ कुळी मराठा घराणे आहे. हे घराणे १६५९ पासून मराठा साम्राज्यात म्हणजेच स्वराज्यात समाविष्ट झाले.
थोडीशी माहिती जगदाळे आडनाव बद्दल आणि थोडासा मागोवा इतिहासातील
मुळ
घराणे मध्य प्रदेशातील धार संस्थांनचे पवार.पवार घराण्याची
जगदाळे,नाईक-निंबाळकर,पोकळे-पाटील हि उपघराणी आहेत.जगदाळे सुमारे ८००
वर्षांपूर्वी महाराष्ट्रात स्थलांतरित झाले.नंतरच्या सुलतानी काळात
मसूर-कराड भागातील सुमारे १६८ गावाची देशमुखी मिळाली.जगदंबेचे उपासक
असल्याने लोक जग्धने म्हणू लागले त्याचा अपभ्रंश होऊन नंतर जगदाळे आडनाव
झाले.
मसूर
च्या देश्मुखीतील काही गावाचा मोकासा शहाजी महाराजांनी घेतला त्यामुळे
देशमुखी ९१ गावाची झाली.नंतरच्या काळात स्वराज्य निर्माण झाले आणि देशमुखी
वतनदारी संपुष्टात आली.तसेच जगदाळे घराण्याच्या शाखा पुरंदर आणि दौंड-फलटण
येथे विस्तारल्या आहेत
सदरची
माहिती आडनावाचा इतिहास या गूगल पेजवरून भेटली आहे ज्यांनी माहिती दिली
त्याबद्दल जगदाळे कुटूंबीय आणि श्रीमंत पाटिलवाडा गणेशोत्सव मसुर आपले
आभारी आहे.
No comments:
Post a Comment