गाथा पानिपतच्या प्रतिशोधाची..!
लेखन :भूषण गर्जे
महादजींचा
दरारा दिल्लीत वाढला. परंतु ते आता इथवर थांबणार नव्हते. त्यांनी
झाबेतखानाच्या मुलूखवर हल्ला चढवला. तसा झाबेतखान पळत सुटला. शुक्रताल
मराठ्यांच्या हातात आले. आता मराठी फौज आणि शाही फौज पत्थरगडकडे आली. हा
किल्ला रोहिल्यांची राजधानी नाजीबाबादच्या पूर्वेला एक मैलावर नाजीबखान
रोहिल्याने बांधला होता. मराठ्यांनी पत्थरगडला वेढा दिला. स्वतः बादशहा
जलालाबादला आला होता. पत्थरगड बळकट किल्ला होता. तोफा आणि दारुगोळा मुबलक
होता, परंतु अन्नसाठा कमी होता. गडावर फक्त बायका-मुले होती. अफगाण शेजारी
असलेल्या तराईच्या जंगलात पळून गेले होते. पत्थरगडचा वयोवृद्ध किल्लेदार
सुलतानखानचा आत्मविश्वास खचत चालला होता. शेवटी किल्ल्यातील बायकांच्या
इभ्रतीला आणि किल्ल्यावरील लोकांच्या जीवितेला धक्का पोहोचू नये, ह्या
अटीवर त्याने किल्ला मराठ्यांच्या हवाली केला. १६मार्चला पत्थरगड
मराठ्यांना मिळाला. प्रत्येक अफगाणाची कसून झडती घेण्यात आली. मराठ्यांनी अफगाण स्त्रियांच्या अंगाला हात लावला नाही. पत्थरगडमध्ये मराठ्यांना खूप लूट मिळाली. मराठ्यांनी रोहिल्यांवर मोठा विजय मिळवला. ह्या विजयाचे शिल्पकार होते,
पत्थरगडमध्ये
नाजीबाची समाधी होती ती फोडून त्याची हाडे फेकून त्यांवर नाचणारे, साऱ्या
अंगाला त्याची भुकटी फासून आनंद साजरा करणारे विसजीपंत बिनीवले,
आणि..
..अख्ख्या रोहिलखंडात जमिनीवर २ वीट ही बांधकाम असेल तर तोफा लावून उडवण्याची भीष्मप्रतिज्ञा घेतलेले महादजी शिंदे..!
दिल्लीवर
नियंत्रण ठेवण्याच्या मराठ्यांच्या मान्सुब्यातील सर्वांत मोठा अडथळा
म्हणजे नजीबखानचे खानदान. हे वैर मराठ्यांना तीन पिढ्या पुरले आणि तिन्ही
पिढ्यांचे साक्षीदार होते स्वतः महाराजा महादजी शिंदे! अर्थात पानिपतच्या
वेळी महादजींना नजीबाविरुद्ध फार काही करायची संधी मिळाली नाही. पण नजीबचा
मुलगा झाबेत आणि नातू गुलाम कादिर यांचा पुरता नक्षा उतरवून त्यांना
घुडघ्यावर आणले.
No comments:
Post a Comment