विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 2 July 2023

बळी!

 


बळी! सात काळजांंच्या आत जपून ठेवावा असा निरागस 'माणूस'! आपल्या प्रजेतील प्रत्येक व्यक्तीला तिच्या कष्टाचे व हक्काचे फळ सम्यक रीतीने विभागून देणारा संविभागी नेता!! भारतीयांचे वास्तव आणि विधायक पूर्वसंचित असलेला कृती, प्रकृती आणि संस्कृती यांचा तजेलदार मोहर!!!
बळी- हिरण्यकशिपूचा पणतू , प्रल्हादाचा नातू ,विरोचनाचा पुत्र ,कपिलाचा पुतण्या आणि बाणाचा पिता. भारताच्या सांस्कृतिक इतिहासातील एक अत्यंत उत्तुंग व्यक्तिमत्व! सुमारे साडेतीन ते चार हजार वर्षांपूर्वी होऊन गेलेला भारतीय बहुजन समाजाचा एक महानायक, एक महासम्राट,एक महातत्ववेत्ता!
सुमारे तीन-चार हजार वर्षांपूर्वीचा काळ. बळीराजाच्या पूर्वजांनी केलेल्या उत्तम शेतीमुळे पिकलेल्या धान्याने सिंधू संस्कृतीमधील धान्याची कोठारे भरली होती .बळीराजानेही आपल्या पूर्वजांचा वारसा स्वीकारून तो पुढे नेण्याची पराकाष्टा चालवली होती. त्या कालखंडातील असाच एक प्रसन्न उषःकाल रात्र संपता संपता पडलेल्या पावसाने जमीन भिजून ओलीचिंब झाली होती. मातीचा सुगंध दरवळत होता. विशाल आकाश जमिनीच्या सर्व क्षितिजांना हळुवारपणाने स्पर्श करीत होते .वाऱ्याची एक एक झुळूक सर्वांचे चित्त प्रसन्न करून टाकत होती आणि अशा वातावरणात सूर्याचे किरण पृथ्वीवर ओसंडले .पंचमहाभूतांनी हातात हात घालून प्रकृतीला नवनिर्मिती करण्यासाठी आवाहन केले आणि बळीराजाने आपल्या पूर्वजांचे अनुसरण करीत ,पण त्यांच्यापेक्षा अधिक कौशल्याने ,पेरणी सुरू केली .पेरणी धान्याची होती .पेरणी जीवनमूल्यांची होती, पेरणी जगण्याच्या कलेची होती.पेरणी मानवी रक्तामासाची होती आणि माणसासाठी नव्या नव्या स्वप्नांचीही होती. तेव्हापासून बळीराजा प्रत्येक पिढीच्या श्वासोच्छवासात वसत आहे, उत्कट जिज्ञासेने सृष्टीच्या आणि जीवनाच्या नव्या नव्या रहस्यांचा शोध घेत आहे!
#बळीवंश - डॉ.आ ह साळुंखे
!!! इडा पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो!!!

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...