Post by Prakash Lonkar
पौराणिक तसेच ऐतिहासिक काळातील युद्ध,समर प्रसंग वा एखाद्या राजाचे लष्करी बळ वाचताना चतुरंग सेना हा शब्द प्रयोग बऱ्याचदा आपल्या वाचण्यात येऊन गेला असेल.चतुरंग सेना म्हणजे हत्ती,घोडे,रथ आणि पायदळ हि चार अंगे असलेली सेना!
आजच्या पोस्टमध्ये सतराव्या,अठराव्या शतकात हिंदुस्थानातील प्रबळ लष्करी शक्ती म्हणून गणल्या गेलेल्या मराठ्यांच्या घोडदळाविषयी माहिती देत आहे.घोडदळाशी संबंधित बऱ्याच मुद्द्यांचा पोस्टमध्ये समावेश केल्याने ती काहीशी लांबली आहे.
मराठेशाहीचा काळ घोडदळाचे सुवर्णयुग होते.प्रवास,सामानाची वाहतूक,लग्न प्रसंगी,लष्करी मोहिमा,इ.कामात घोड्यांचा वापर होत असे किंबहुना तत्कालीन समाजाचे असे सहसा कुठलेही अंग नव्हते जिथे घोड्यांचा वापर होत नसायचा.मराठ्यांचा अंमल असलेला असा कुठलाही भाग नव्हता जिथे घोडे आणि त्यांचा वापर करणारे नव्हते.घोड्यावर मांड ठोकून घोड्सवारी करता येणे हे सर्व नागरिकांसाठी आवश्यक झाले होते.पुणे दरबारात पेशव्यांपुढे जेव्हा सरदारांच्या वारसांना सरदारकीची वस्त्रे द्यावयाचा प्रसंग येई तेव्हा अशा वारसदाराना मूळव्याधीचा विकार नाही आणि घोड्यावर बसण्याचा चांगला सराव आहे हे निक्षून पाहूनच सरदारकी दिली जायची.महिलानी सुद्धा घोड्सवारीत प्राविण्य मिळविल्याची भरपूर उदाहरणे आढळतात जसे कि जिजाऊ साहेब,ताराराणी,झांशीची राणी,बायजाबाई शिंदे इ. रायगडा सारख्या दुर्गम,डोंगरी किल्ल्यांवरची दुकानांची जोती पुरुषभर उंचीची ठेवली जात जेणेकरून किल्ल्यावर तैनात असलेल्या,आलेल्या घोडेस्वाराना घोड्यावरून पायउतार न होता खरेदी करता यावी.मराठेशाहित घोड्याच्या सर्व व्यापकतेमुळे तो त्या काळातील महाराष्ट्राचा राष्ट्रीय प्राणी तसेच वाहनच होता असे म्हणणे तत्कालीन वस्तुस्थितीला धरून होईल.समस्त मराठी जनतेच्या आवडीच्या घोड्याने केवळ भौतिक बाबींवरच आपला ठसा उमटवला नाही तर तेव्हाच्या मराठी साहित्य,(literature) भाषा, म्हणी यावरसुद्धा प्रभाव टाकला होता. गेल्या पिढीतील प्रख्यात इतिहास संशोधक य.न.केळकर म्हणतात कि मराठीत घोड्यावरून तयार झालेल्या वाक्प्रचार किंवा म्हणींची संख्या अन्य कुठल्याही पशुवरून तयार झालेल्या म्हणी,वाक्प्रचारांपेक्षा अधिक आहे.त्यासाठी त्यांनी काही मनोरंजक उदाहरणे पण दिली आहेत.घोडे मारणे,घोडे पेंड खाणे,गंगेत घोडे न्हाणे,नालेसाठी घोडा घेणे,घोडे दामटणे,घोडा मैदान जवळ असणे, घोडनवरी, घोडनवरा, कागदी घोडे नाचवणे,वरातीमागून घोडे, घरचे झाले थोडे व्याह्याने धाडले घोडे,वगैरे.यावरून तत्कालीन मराठी समाज आणि त्याचे घोड्या बरोबरचे सहचर्य, निकटता दिसून येते. काही विदेशी लोकांना तर महाराष्ट्र म्हणजे घोड्यांचा देश असे वाटले.
मराठ्यांचा मुख्य पेशा लष्करी असल्याने पावसाळा सोडला तर बाकी सर्व काळ कुठे न कुठे मराठे लष्करी मोहिमांवर गुंतलेले असत ज्यात त्यांचे द्रुतगती घोडदळ मुख्य ताकद होती.उत्तर मराठेशाहीत म्हणजे थोरले शाहू महाराज सिंहासनाधिष्ठ झाल्या नंतरच्या काळात म्हणजे ऑगस्ट १७९१ मध्ये विश्वनाथ बाळाजी भट पेशव्यांची छ.शाहू महाराजांनी `सेनाकर्ते` पदी नेमणूक केल्यानंतर मराठी फौजांचे वारू अखंड हिंदुस्थानात श्रीरंगपट्टण ते अटक,कटक,असे चौफेर,चौखूर उधळले होते.मराठ्यांच्या घोड्यांच्या टापांखाली आला नाही असा हिंदुस्थानातील क्वचितच एखादा भूभाग राहिला असेल.
घोड्यांची काळजी,निगा: लढाऊ मराठ्यांचे घोडा हे शस्त्राइतकेच वा कधी कधी त्याहून अधिक महत्वाचे साधन असल्याने त्याची खूप काळजी घेतली जाई. मोठ्या घोड्यांना ओल्या गवता बरोबर अर्धा शेर तूप खाण्यास दिले जायचे. शिंगरे तयार करण्यासाठी त्यांना दुध,खिरी तर पाजीतच पण त्याशिवाय कणिक, गूळ, अफू, हळद, मीठ, राई, काळे जिरे, धणे इ. पदार्थ घातलेला खुराक नेहमी दिला जाई. घोड्यांच्या व्यवस्थेसाठी स्वतंत्र पागा होत्या. घोड्यांना प्रशिक्षण देणाऱ्या व्यक्तीस चाबुकस्वार म्हणत. पागेच्या अंमलदारास पाग्या म्हणत. एका पागेत १० ते ८०० घोड्यांची काळजी घेतली जाई. ५०० वा त्याहून अधिक घोडे असलेल्या पागेवर एका सरदाराची नियुक्ती असायची. सरकारकडून ज्यांना घोडा मिळायचा त्यांना बारगीर म्हणत तर स्वतःचा घोडा असणार्यास शिलेदार म्हणत. शिलेदार आपल्या खर्चाने घोडा बाळगून फौजेत चाकरी करायचा.त्याचा घोडा अरबी असायचा. त्याला ठराविक वार्षिक वेतन दिले जाई.ह्या दोघात शिलेदाराचा रुबाब, मान अधिक असायचा. प्रत्येक शिलेदार आपल्या सोबत एखादा स्वतंत्र महार जातीतील पोरगा निव्वळ घोड्याची काळजी घेण्यासाठी बाळगीत असे.पागांमध्ये तैनात कर्मचारी म्हणजे नालबंद(घोड्यांना नाला मारणारे),जिनगर(खोगीर तयार करणारे),शालोत्री(घोड्यांचा डॉक्टर),मोतद्दार(घोडे सांभाळणारा) हे असत.तेघोड्यांनी भरपूर भरारी मारल्यानंतर थकलेल्या घोड्यांच्या पायांच्या शीरांची(नसा)मालिश करून त्याला पुढील प्रवासासाठी तयार ठेवीत.
एका दिवसात कापले जाणारे अंतर: एका दिवसात लांब लांब अंतरे कापण्यात मराठ्यांच्या घोडदळाशी सहसा कुणी बरोबरी करू शकत नसायचे.छत्रपती शिवाजी महाराजांना मोगल सैतान समजायचे कारण ते आपल्या चपळ घोड्यावरून लांब लांब मजली मारून कुठेही,केव्हाही प्रकट व्हायचे.छ.राजाराम महाराजांच्या काळात धनाजी-संताजी शत्रूवर अचानक धाडी घालून विद्युतवेगाने निसटून जाण्यासाठी मशहूर होते.थोरले बाजीराव,गोपाळराव पटवर्धन,राघोबा दादा,महादजी शिंदे,मल्हारराव होळकर हि मंडळी पण कमी वेळेत जास्त अंतर कापण्यात वस्ताद होती.लांबची सफर करताना जर घोडा थकला,युद्धात जायबंदी झाला,मृत पावला तर अतिरिक्त,राखीव घोडा ज्याला कोतवाल घोडा म्हटले जाई,बाळगत असत.कोतवाल घोड्याची देखरेख करणारा घोडे कोतवाल म्हणून ओळखला जाई.
मराठ्यांच्या घोड्यांच्या जाती: मराठ्यांच्या घोडदलात प्रामुख्याने भीमथडी,नीरथडी,माणदेश,वऱ्हाड,गंगथडी जातीचे घोडे असत.घोडनदी,सातारा,दहिवडी,पंढरपूर,प्रवरेकाठचे आश्वी गाव ह्या ठिकाणी उत्तम घोड्यांची पैदास केली जाई.पेशव्यांच्या घोडदळात इराणी,अरबी घोड्यांचा पण समावेश व्हायला लागला होता.इथे पैदास केलेली घोडी अत्यंत काटक,बळकट आणि हुशारीसाठी प्रसिद्ध होती.पेशव्यांच्या फौजेत वीस हजार भीमथडी घोडे होते. दौलतराव शिंदेंच्या तैनात इंग्रज लष्कराचा प्रमुख कॅप्टन ब्रौटन होता.शिंद्यांच्या लष्करातील घोड्यांचे वर्णन त्याने कसे केले आहे ते बघा...सणासमारंभाचे वेळी शिंदे आपला रिसाला घेऊन बाहेर पडतात तेव्हा नामी दखनी घोडी पहावयास मिळतात.ठेंगण्या दक्षिणी घोड्या व अरबी घोडे यापासून हि अवलाद काढतात.त्यांच्यासारखी शहाणी,चलाख,कष्टाळू घोडी सबंध हिंदुस्तानात अन्यत्र दिसत नाहीत.त्यांच्या किमत तीन ते चार हजार रुपये अशा भारी असतात.अशा घोड्यांवर मराठ्यांचा जीव कि प्राण असतो.
घोड्यांचे प्रशिक्षण: मराठ्यांकडे चाबुकस्वार म्हणून अश्व प्रशिक्षक असायचे.टापांचा आवाज न करता चालणे,भरधाव धावत असताना खुण करताच थांबणे वगैरे बऱ्याच गोष्टी शिकविल्या जायच्या.एबे डूबॉई ह्या विदेशी माणसाने मराठ्यांच्या घोड्याच्या हुशारीचा त्याने बघितलेला अनुभव कथन केला आहे.एका शिलेदाराने आपला घोडा उभा केला होता.त्याचे लक्ष नसल्याचे बघून एकाने तो घोडा लांबवला.मालकाने हि गोष्ट बघितल्यावर घोड्याला हाळी दिली.लगेच ते घोडे जागीच थांबले,काही केल्या हलेना.शेवटी चोर घोडा सोडून पळून गेला.एडवर्ड मूर म्हणतो कि घोड्यांची निगा घेण्यात आणि त्यांना शिकवून तरबेज करण्यात उभ्या जगात मराठ्यांची सर कुणाला येयील असे वाटत नाही..
घोड्यांचा व्यापार:राज्यात जातिवंत जनावरांपासून घोड्यांची पैदास करण्या बरोबरच विदेशी घोड्यांची पण खरेदी विक्री होत असे.हेडे,चारण,लमाण,सौदागर,गोसावी समाजाचे लोक हा व्यापार करत.घोड्यांच्या योग्यतेप्रमाणे तट्टू वीस रुपयांपासून तर तुर्की घोडा दहा हजार रुपयाला विकला जाई.साधे घोडे शंभर ते दोनशे,मध्यम दर्जाची सातशे ते आठशे रुपयात मिळायची.शिलेदारांची घोडी ४००-५०० रुपयां पर्यंतची असत तर एकांडे सरदार/पागेच्या सरदारांची घोडी ८००-१००० रुपयाच्या रेंज मध्ये असायची. मोठमोठ्या,नामांकित सरदारांची घोडी खूपच किमतीची असायची.उत्तम,जातिवंत घोडे कुणाकडे दिसल्यास ते येनकेन प्रकारे आपल्याकडे आणण्याचे प्रयत्न होत असत.
ओळख चिन्ह/डाग: आपल्या पागेतील घोडे,शत्रूकडून हस्तगत झालेले घोडे,विना तपासणी एखादे घोडे पागेत घुसविले आहे काय,गणतीच्या वेळी एकच जनावर अनेकदा दाखवून त्यासाठी रोजमुर्रा घेणे यासारखे प्रकार टाळण्यासाठी घोड्यांच्या शरीरावर विशिष्ठ खुण करण्याची पद्धत होती.मराठ्यांनी हि पद्धत मोगलांपासून उचलली होती.परंतु मराठ्यांनी तिची मोगलांप्रमाणे काटेकोरपणे अंमलबजावणी केली नाही.पण पागेत स्वार,शिलेदार यांच्या व्यक्तिगत तपशिला बरोबरच त्यांच्या घोड्यांचा तपशील जसे कि घोड्याची चेहरपट्टी,त्याच्या अंगच्या खोड्या,रंग,रूप,जात,चिन्हे,लक्षणे इत्यादी बाबींची पण खूपच तपशीलवार नोंद केली जायची.
मराठेशाहीच्या अंतिम पर्वातील विविध सरदारांकडच्या घोडदळाची संख्या: **
बाजीराव द्वितीय-४००००
दौलतराव शिंदे -६००००
नागपूरकर भोसले-५००००
यशवंतराव होळकर-३००००
बडोदेकर गायकवाड-३००००
घोडदळ तसेच पायदळाच्या खर्चासाठी सर्व सरदाराना जहागिरी देण्यात आल्या होत्या.सरदारांनी ठरवून दिल्या प्रमाणे दर्जेदार घोडदळ आणि पायदळ ठेवले आहे कि नाही याची अचानक तपासणी होत असे.
घोडदळातील पदे: मराठ्यांच्या घोडदळाचे संघटन खालील प्रमाणे होते.**
१-स्वार
२-हवालदार-२५ बारगीर/शिलेदारांवरील अधिकारी
३-जुमलेदार-१२५ बारगीरांवरील अधिकारी
४-एक हजारी-१२५० बारगीरांचा मुख्य
५-पंच हजारी-५००० बारगिरांवरील अधिकारी
६-सरनोबत-सर्व पंच हजारी बारगीरांचा मुख्य
याशिवाय घोडदळ अधिकाऱ्यांच्या हाताखाली १ ब्राह्मण सबनीस,१ प्रभू ज्ञातीचा कारखानीस मदतीला असत.
घोडदलातील शिपायास रुपये सहा ते वीस दरमहा पगार मिळायचा.घोडदलातील एकांडे कुलीन घराण्यातीलच असत.ते फौजेतील मुख्य सरदारान बरोबर असत.एकांड्याना मासिक रुपये १०० ते १००० पर्यंतची तैनात व एक घोडा सरकारकडून मिळायचा.
प्रख्यात इतिहासकार निनाद बेडेकरांनी मराठ्यांच्या महाराष्ट्रा बाहेरील पन्नास गाजलेल्या लढायांची माहिती झंझावात ह्या पुस्तकात दिली आहे.अन्य माहिती बरोबर बेडेकरांनी मराठी फौजा जिथून निघाल्या त्या ठिकाणापासून त्यांचे युद्धस्थळा पर्यंतची अंतरे व नकाशा सुद्धा दिला आहे.छत्रपती थोरले शाहू महाराजांच्या मृत्यू नंतर(डिसेंबर १७४९) नंतर मराठ्यांचा कारभार राजधानी साताऱ्याहून पुणे इथे स्थलांतरित होऊन मराठ्यांचे राजकारण पुण्याहून सुरु झाले.त्यामुळे मराठ्यांच्या हिंदुस्थानातील कुठल्याही लष्करी मोहिमेची सुरुवात पुण्याहून होऊ लागली.त्यामुळे निनाद बेडेकरांनी दिलेली अंतरे पुण्या पासूनची आहेत.वानगी दाखल काही ठिकाणे आणि पुण्यापासून चे अंतर देत आहे. जयपूर-११८०, सुरत ४१५, उज्जैन-६५०, मंदसौर-७८५, कटक-१५५०, ग्वाल्हेर-१०८५, लाहोर-१८१०, अटक-२२३०, आग्रा-१२००, अलीगड-१४७०, कालींजर-१२१८, पेशावर २३२०, दिल्लि-१४४०- गुर्रमकोंडा-९७५ ( सर्व अंतरे किलोमीटर मधली आहेत)
इंग्रजांनी हिंदुस्थानावर प्रभुत्व मिळविल्यानंतर हेतुपुरस्सर भारतीय राजे/महाराजान्कडील सैन्यात मोठ्या प्रमाणावर कपात केली.तसेच इंग्रज काळात देशी संस्थानिकांमधील आपापसातील युद्धे, लढाया पण बंद झाल्या. याचा परिणाम लष्करी पेशावर अवलंबून असणाऱ्या सर्वच जणांवर झाला,अगदी घोड्यांसारख्या प्राण्यांवर सुद्धा. युद्ध, लढाया बंद झाल्यावर घोड्यांचा त्यासाठी होणारा वापर पण खूप कमी झाला.तसेच वैज्ञानिक प्रगतीमुळे प्रवासाची विविध गतिमान वाहने उपलब्ध झाल्याने एक काळ गाजवलेल्या घोड्यांचा उपयोग फक्त टांगे, शर्यती, पोलोसारखे विदेशी खेळ, लग्नाच्या वराती सारख्या फुटकळ कामासाठी होऊ लागला.कालाय तस्मै नम:
Post by Prakash Lonkar
संदर्भ:य.न.केळकर लिखित रत्नाकर,जानेवारी,१९३२ मधील लेख.
२-पेशवे-श्रीराम केळकर **
३- झंझावात-निनाद बेडेकर.

No comments:
Post a Comment