विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 28 July 2023

आरमार सरदार माणेकजी सुर्यवंशी

 



आरमार सरदार माणेकजी सुर्यवंशी🚩🚩
मराठ्यांच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार तयार केला अनेक किल्ला बांधले. या काळात माणेकजी सुर्यवंशी हे आरमारी सेवेत रुजू झाले आपल्या कर्तबगारी मुळ इतिहासात अजरामर झाले. माणेकजी सुर्यवंशी हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात नावारूपास आले व छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात प्रबंळगड व खांदेरी या दोन्ही किल्ला चे किल्लेदार होते असे काही नोंद वरून दिसते
संभाजी राजा याचा अंमल शके १६०२ पासून शके म्हणजे १६१० एकूण नऊ वर्षे होता .
सागरगड, खांदेरी व कुलाबा ह्या दोन गढ्या व प्रांतीं जमाबंदी चालत असतां, चेंऊल गांवांत खासगी अल्ली मुसलमान रहात होता. त्याची हवेली निवारशी होती. सबब संभाजीनें दोन बुरूज बांधिले. त्यास राजकोट नांव दिलें, शके १६०४. संभाजी राजे राज्य करीत असतां हबशी फौज घेऊन आरमारसुध्दां पालवचे खाडीत आला. तेथून रात्रीचे समयी छापा घालून चेंऊलचीं घरें दग्ध केली. मालमत्ता लुटून नेली.
शके १६०७ यावर्षी संभाजी राजाच्या तर्फेनें सागरगड, राजकोट, खांदेरी व 🚩🚩कुलाबा येथें अंमलदार होते ते :-
सूर्यवंशी मराठे माणकोजी 🚩🚩यांची नेमणूक खांदेरी येथें तीन वर्षें,
🚩🚩 उदाजी पडवळ 🚩🚩यांची नेमणूक सागरगड येथें चार वर्षें,
🚩🚩सुभानजी खराडे🚩🚩 यांची नेमणूक राजकोट येथें सहा वर्षे🚩🚩,
भिवजी गुजर 🚩🚩यांची नेमणूक कुलाबा सहा वर्षें.
छत्रपती संभाजी राजा रायगड येथें राज्य करीत असतां 🚩🚩कान्होजी आंग्रे 🚩🚩फिरतें आरमार घेऊन समुद्रामध्यें सदरहू लोकांचा परामृश घेत असे.
तेव्हांपासून चेंऊल प्रांतीं पातशाही अंमलाची पैवस्ती जाली. राजकोट, सागरगड व अमिनाबाद ऊर्फ पाली या
किल्ल्यांजवळ पातशाही अमलाची पैवस्ती जाली.
कुलाबा, खांदेरी व उंदेरी किल्ल्यांवर महाराज छत्रपति तर्फेचे अंमलदार होते. 🚩🚩माणकोजी सूर्यवंशी, सुभानजी खराडे व उदाजी पडवळ 🚩🚩प्रबळगडास गेले. 🚩🚩भिवजी गुजर व कान्होजी आंग्रे 🚩🚩कुलाबा, खांदेरी येथेंच राहिले.
साभार
संतोष जी झिपरे

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...