भाग ६
मुघलानी बेगमेचे प्रताप त्याला समजले तसे तो तिच्या कडे हा प्रस्ताव घेवून गेला. तिकडे पळून जाणाऱ्या पैसेवाल्या जमीनदारांना दरोडेखोर आणि जाटांनी लुटले. जे वाचले ते काही मथुरेस पळाले तर काही दिल्लीस परतले. अंताजी माणकेश्वर यांना फौजेसह माघार घ्यावी लागली. इकडे दिल्लीत एक वेगळाच प्रकार घडला, इमादुल्मुल्काच्या सैन्याला गेल्या काही महिन्यांच्या धामधूमीमुळे पगार मिळाला नव्हता त्यामुळे त्यांनी बंडाळी केली आणि वजिराला त्याच्याच वाड्यात कैद केले. आता दिल्ली अनाथ झाली आणि हाच मोका साधून नजीब खानाने आपले रोहिला सैन्य दिल्लीत दाखल करीत अब्दालीच्या सैन्यात सामील केले. दि.२८ जानेवारी ५७ रोजी अब्दाली मोठ्या थाटात दिल्लीत प्रवेशला. त्याने आपल्या नावाने खुत्बा पढवला. बादशाहला राजवाड्यातून हाकलून दिले. त्याला २ कोट रुपये हवे होते परंतु वजीराकडे यावेळी एक लाख सुद्धा नव्हते. यावेळी कजाग मुघलांनी बेगम समोर आली व तिनी अब्दालीची कृपादृष्टी मागितली. या मोबदल्यात तिने अब्दालीला राजवाड्यातील सर्व संपत्ती, जनाना आणि दिल्लीतील इतर सर्व माहिती पुरविली. अब्दालीने खुश होवून तिला मुलगी म्हणून स्वीकारले आणि जम्मू-कश्मीर तसेच जालंधर दुआब प्रांत तिला नजर केले. तिने दिल्लीतील सर श्रीमंत लोकांची माहिती तसेच त्यांच्या संपत्ती ठेवण्याच्या जागा सांगितल्या. अफगाणी टोळ्यांनी पुढील काही दिवस दिल्लीत ज्या खाणत्या लावल्या आणि जी लुटमार लावली त्याचे वर्णन शब्दात करणे केवळ अशक्य आहे. अब्दाली मुघलांनी बेगमेवर आणखी खुश झाला आणि त्याने तिला आता स्वतःचा मुलगा बनवून “सुलतान मीर्झा” खिताब दिला. आता अब्दाली पिसाळला. दिल्ली पाठोपाठ तो आग्रा आणि मथुरेच्या दिशेने लुट करीत निघाला.
No comments:
Post a Comment