विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 14 August 2023

एक पराक्रमी वीर म्हणजे सरदार यशवंतराव होळकर

 

दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धात एखाद्या देदीप्यमान ताऱ्याप्रमाणे प्रकाशमान असणारा


एक पराक्रमी वीर म्हणजे सरदार यशवंतराव होळकर.
यशवंतरावांनी पुण्यावर हल्ला केला तो दौलतराव शिंद्यांच्या विरोधात. अर्थात, आम्हां सरदारांच्या भांडणात पेशव्यांनी कोणाचीही बाजू घेऊ नये असं यशवंतरावांनी सांगितलेलं. पण विठोजी होळकरांच्या हत्येनंतर यशवंतराव भडकले असावेत, अन आपलं वचन पाळणार नाहीत, आपल्याला कैद करून ठेवतील असं वाटल्याने बाजीराव रघुनाथ पळून इंग्रजांकडे गेले अन ३१ डिसेंबर १८०२ रोजी अत्यंत नामुष्कीचा असा तैनाती फौजेचा करार केला. बाजीरावांनी इंग्रजांशी केलेल्या करारातील अनेक कलमे ही आपल्या दृष्टीने पडतं घेणारी होती, हे बाजीरावांनाही माहीत होतं, पण एका भयंकर गैरसमजाने पछाडल्याने त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली. इथे यशवंतराव मात्र मनात कसलीही सूडाची बुद्धी न धरता केवळ आणि केवळ स्वराज्याचा विचार करत होते. विठोजींना त्यांच्या दुष्कृत्याबद्दल बाजीरावांनी शिक्षा दिली, आपलं त्याबद्दल काही म्हणणं नाही असं यशवंतरावांचं स्पष्ट म्हणणं होतं. पण दुर्दैवाने बाजीरावांच्या आसपासच्या सल्लागारांनी ही गोष्ट त्यांना कधी पटू दिली नाही. यशवंतराव मात्र कायम, श्रीमंतांनी परत यावं आणि गादी सांभाळावी हा प्रयत्न करतच राहिले.
इथे यशवंतराव आणि दौलतराव हे परस्परविरोधी असले तरीही नागपूरकर भोसल्यांच्या दरम्यानगिरीने यांनी परस्पर वैर काही काळ थोपवलं अन हे तिघेही इंग्रजांच्या विरुद्ध आघाडी उघडली. हे तिघे एकत्र असे कधी लढले नाहीत, पण आपण स्वराज्यासाठी लढत असून इंग्रजांना दूर ठेवायचं आहे ही गोष्ट तिघांच्याही मनात होती. तीन वर्षांनी हे युद्ध संपलं आणि इंग्रजांनी शिंदे-भोसल्यांशी स्वतंत्र आणि यशवंतराव होळकरांशी स्वतंत्र करार केले. मधल्या काळात बाजीरावांनाही आपण काय चूक केली हे समजून त्यांनी सरदारांना अंतर्गत मदत केली असावी असं दर्शवणारं एक पत्रं याच पत्रसंग्रहात आहे, अन गम्मत म्हणजे ते यशवंतराव होळकरांचंच आहे. असो, यशवंतरावांचं औंधच्या पंतप्रतिनिधींना लिहिलेलं पुढील पत्रं पाहिलं म्हणजे या महापुरुषाच्या मनाचा ठाव घेता येतो..
पत्राचा स्रोत: भारत सरकारच्या केंद्रीय (दिल्ली) दफ्तरखान्यातील ऐतिहासिक मराठी साधने.
- कौस्तुभ कस्तुरे

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...