संताजी घोरपडे
- भाग ८
संताजीच्या कारकिर्दीत दोन मोठे विजय म्हणजे दोड्डरी ची लढाई आणि दूसरी बसवापट्टणची लढाई. या दोन लढायांची तुलना साल्हेर किंवा कांचनबारीच्या लढायांशी होऊ शकते. संताजीस नेस्तनाबूत करण्यासाठी औरंगजेबाने कासिम खाना बरोबर अनेक नामवंत सरदार त्यांच्या मागे पाठवले होते. कासिम खान बरोबर खानाजाद खान, असालत खान, मुराद खान, सफसिख खान असे अनेक सरदार मोठा तोफखाना, भरपूर धन, आणि काम्बक्षचे सुद्धा सैन्य दिमतीला दिले होते.संताजी मोगल सैन्याच्या हालचाली वर लक्ष ठेउन होते. त्यांना आपल्या गुप्तहेरा कडून बित्तंबातमी मिळत होती. कासिम खानाने आपले सामान रवाना केल्याची खबर संताजीस मिळाली. संताजिने गनिमी काव्याचे डाव आखले आणि त्या प्रमाणे आपल्या सैन्याच्या ३ तुकड्या केल्या. पहिल्या तुकडीने कासिम खानाच्या सामानावर हल्ला केला. तो हल्ला परतावण्यासाठी कासिम खानने आपले बरेच सैन्य खानाजाद खाना बरोबर तिथे पाठवून दिले. संताजिच्या दुसर्या तुकडीने खानाजाद खानाला वाटेत गाठला आणि लढाई सुरु केली. आता कासिम खानाची छावणीत शुकशुकाट होता, तीच संधी साधत मराठ्यांच्या तिसर्या तुकडीने या छावणीवर हल्ला केला आणि मोगली सैन्याची पूरी वाताहात करून टाकली. मोगली सैन्य रणंगण सोडून पळत सुटले आणि दोडेरीच्या गढ़ीचा आश्रय घेतला. संताजीने या गढ़ीला वेढा घातला आणि मोगलांची रसद मारली.दोडेरीच्या मोगल किल्लेदाराने किल्ल्याचे दरवाजे बंद केले आणि बाहेर असलेल्या कासिम खानाच्या सैन्यास संताजीच्या तावडीत मोकले सोडले. कासिम खान आणि त्याचे सरदार दोरखंड लाउन एक रात्री किल्ल्यात निघून गेले, फौजेला संताजीच्या तोंडी देऊन. जसे दिवस जाऊ लागले तशी किल्ल्यातली रसद सुद्धा संपत आली. खानाचे सैन्यतर उपाशी मरू लागले. शेवटी मोग्लंनी संताजीकड़े जीवदानाची याचना केली. संताजीने मोग्लांचे अनेक हत्ती, घोडे, तोफा, नगद, आणि सोबत दोन लाख होनाची खंडणी घेतली. ही नामुष्की सहन न होउन कासिम खानाने विष पिउन आत्महत्या केली.या लढाईचे दाखले मोगल इतिहासकार देतात पण आपल्या इतिहासकारांनी या एका मोठ्या लढाईचे साधे वृत सुद्धा दिले नाही.
(संदर्भ- मराठ्यांचे स्वातंत्रयुद्ध)
No comments:
Post a Comment