विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 18 August 2023

सेनाखासखेल श्रीमंत दमाजीराव गायकवाड

 


सेनाखासखेल श्रीमंत दमाजीराव गायकवाड यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !
जोधपुरचा राजा अभयसिंग याने आपल्या वकीलाच्या माध्यमातुन विश्वासघाताने श्रीमंत पिलाजी गायकवाडांचा खुन केला.
पिलाजीं नंतर त्यांचा मुलगा दमाजी गायकवाड यांनी मोगलांचा सुभेदार मारवाडचा राजा अभयसिंग याच्याविरुद्ध जोरदार आघाडी उघडली. बडोदा शहर परत मिळविले. अभयसिंगच्या जोधपूर या प्रांतात दमाजींनी धडक मारली. सन १७५३ साली त्यांनी अहमदाबाद शहर हस्तगत केले आणि गुजरातमधील मोगल सत्ता संपुष्टात आणली. सुरत बंदरावर कब्जा करण्याचे इंग्रजांचे प्रयत्न त्यांनी हाणून पाडले.
परंतु सन १७५९ साली नानासाहेब पेशव्यांनी इंग्रजांविरुद्ध दमाजींना मदत न केल्यामुळे सुरत बंदर तसेच गुजरातच्या किनारपट्टीचा पूर्व भाग इंग्रजांच्या ताब्यात गेला.
दमाजी पानिपतच्या लढाईत सामील होते. सन १७६२ मधील निजामाविरुद्धच्या घोडनदीच्या लढाईत दमाजींनी केलेल्या कामगिरीमुळे 'सेनाखासखेल' हा 'किताब मिळाला. तसेच त्रंबकराव दाभाडे (दुसरे) हे निजामाच्या बाजूने असल्यामुळे, पेशव्यांनी दाभाडेंचे गुजरातेवरील अधिकार पूर्णपणे रद्द केले व ते गायकवाडांच्या स्वाधीन केले. दमाजींना गुजरातेत मराठ्यांचे राज्य वाढविण्याचे श्रेय जाते. श्रीमंत दमाजींचे दि. १८ ऑगस्ट १७६८ रोजी निधन झाले.
मराठेशाहीतील पराक्रमी वीरास विनम्र अभिवादन !

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...