झाशीच्या
राणीला स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा देणारी धनगर राणी भीमाबाई होळकर
असल्या तरी इंदौरमध्ये इंग्रज सैन्याची छावणी भीमाबाईने पडू दिली नाही.
भीमाबाईच्या शौर्य पराक्रमाची किर्ती भारतभर झाली आणि १८५७ च्या
स्वातंत्र्य संग्रामात पाठीवर मुल बांधून रणांगणात उतरण्याची प्रेरणा
झाशीची राणी लक्ष्मीबाईला भीमाबाईकडून मिळाली.
भीमाबाईंचा
जन्म १७ सप्टेंबर १७९५ साली पुणे येथे झाला. आईचे नांव लाडाबाई तर पिता
भारताचे आद्य स्वातंत्र्य सेनानी यशवंतराव होळकर. दौलतराव शिंदेंनी
सत्तालालसेमुळे मल्हारराव होळकर (दुसरे) यांचा पुण्यात खून केला. यशवंतराव व
विठोजींच्याही जीवावर शिंदे उठल्याने उभयतांना पुण्यातुन निसटुन जावे
लागले. शिंद्यांनी त्याचा सुड असा घेतला की नवजात भीमाबाई आणि माता
लाडाबाईला कैदेत टाकले. त्यांची सुटका यशवंतरावांनी २५ ऑक्टोबर १८०२ रोजी
पुण्यावर स्वारी करून शिंदे व पेशव्यांचा दणदणीत पराभव केल्यानंतर झाली.
तब्बल
सहा वर्ष या वीरांगनेला मातेसह कैदेत रहावे लागले. सुटकेनंतर मात्र
यशवंतरावांनी भीमाबाईच्या शिक्षणाची व लष्करी प्रशिक्षणाची सुरुवात केली.
ब्रिटिश विदुषी मेरी सदरल्यंड म्हणतात, ज्या काळात भारतात महिलांना गोषात
रहावे लागे, शिक्षणाचा विचारही नव्हता, अत्यंत बंदिस्त व मानहानीचे जीवन
जगावे लागे त्या काळात, यशवंतरावांसारख्या द्रष्ट्या पुरुषाने भीमाबाईला
शिक्षण देने व लढवैय्याही बनवणे ही एक क्रांतीकारक घटना होती. अर्थात अशी
सामाजिक क्रांती होळकर घराण्याला नवीन नव्हती. अहिल्याबाई होळकर स्वतः
शिक्षित तर होत्याच पण त्या काळात भालाफेकीत त्यांचा हात धरणारा कोणी
पुरुषही नव्हता. एवढेच नव्हे तर जगातील पहिले महिलांना लष्करी प्रशिक्षण
देणारे विद्यालयही स्थापन करून महिलांची बटालियन उभारली होती. या बटालियनला
घाबरून रघुनाथराव पेशव्यालाही पळुन जावे लागले होते.
भीमाबाईचा
विवाह धारचे संस्थानिक गोविंदराव बुळे यांच्याशी झाला. यशवंतरावांनी
आपल्या लाडक्या कन्येला पेटलवाड येथील जहागीरही व्यक्तिगत उत्पन्नासाठी
दिली. परंतु विवाहानंतर दोनेक वर्षातच भीमाबाईवर वैधव्य कोसळले. त्या परत
माहेरी आल्या व यशवंतरावांनी भानपुरा येथे सुरू केलेल्या तोफांच्या
कारखान्याचे व नवीन लष्कर भरतीचे काम पाहु लागल्या. त्यांना उत्तम
अस्वपरिक्षा अवगत होती. त्यामुळे भारतभरातुन यशवंतरावांनी एक लक्ष घोडे
आपल्या सैन्यासाठी विकत घ्यायचा सपाटा लावला होता त्यात मुख्य भुमिका
भीमाबाई बजावत होत्या.
इंग्रजांनी
भीमाबाईची खरी शक्ती तिचे पेंढारी इमानदार सैन्य आहे हे लक्षात घेवुन
पेंढा-यांविरुद्धच मोहीम हाती घेतली. पेंढा-यांना पुनर्वसनाच्या,
जमीनी-जागीरी देण्याच्या आमिषांचीही बरसात केली. त्यामुळे अनेक पेंढारी
भीमाबाईला सोडुन जावु लागले. आपल्या पित्याप्रमानेच भीमाबाईने भारतातील
सम्स्थानिकांना बंड करण्याची पत्रे पाठवण्याचा सपाटा लावला होता पण कोणीही
सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. माल्कम तर पिसाळुन भीमाबाईच्या
सर्वनाशासाठे भीमाबाईचा माग काढत होता, पण भीमाबाई आज येथे तर उद्या तिथे.
त्यांनी
इंग्रजी तळांना अचानक हल्ले करून लुटण्याचा धडाका लावलेला होता.
भीमाबाईवरील मोहीम यशस्वी व्हायचे नांव घेत नव्हती. माल्कमने पुन्हा कपटाचा
आश्रय घेतला. त्याने भीमाबाईचा मुख्य सेनानी रोशन खान ह्यालाच फितुर करून
घेतले. भीमाबाईचा तळ धारनजिक पडला असतांना त्याने ती खबर माल्कमला दिली.
माल्कमने तातडीने विल्ल्यम केइर या नजिक असलेल्या सेनानीला भीमाबाईवर
हल्ला करण्यास पाठवले. चहुबाजुंनी घेराव पडला. यावेळीस दुर्दैव असे कि
एकाही सैनिकाने शस्त्र उचलले नाही. ते सरळ भीमाबाईला एकाकी सोडुन निघुन
गेले.
भीमाबाईला
कैद करण्यात आले. रामपुरा येथील गढीत त्यांना बंदिस्त करण्यात आले. पुढे
२८ नोव्हेंबर १८५८ मध्ये भीमाबाईंचा म्रुत्यु झाला. कैदेतच जन्म आणि
कैदेतच म्रुत्यु असे दुर्दैव या थोर महिलेच्या वाट्याला आले.
स्त्रोत :
No comments:
Post a Comment