याचें
आडनांव दाणी. शंकरराव हा निजामाकडे नोकर होता; त्याचे आबाजी, लक्ष्मण व
नारायण असे तीन पुत्र होत. नारोपंत प्रथम उदाजी पवाराच्या हाताखाली
शिलेदारीवर होता. माळव्यांत मराठ्यांनीं जी प्रथम हालचाल सुरू केली,
त्यावेळी (१७२०) याचा उल्लेख उदाजीबरोबरच आढळतो. नंतरचा (१७३०) त्याचा
उल्लेख मल्हारराव होळकराच्या पदरीं असल्याबद्दलचा सांपडतो. मल्हाररावानें
याला इंदूरचा सुभेदार नेमलें होतें. पुढे त्यानें लोकांस हैराण केल्यामुळें
पेशव्यानीं त्यास माळव्याच्या कामावरून परत बोलाविलें.
बुंदेलखंडाची
खंडणी वसूल करीत असतां मराठ्यांचा सुभेदार मल्हार कृष्ण याचा
ओर्च्छेकरानें विश्वासघातानें खून केल्यामुळें पेशव्यानें मल्हाररावाच्या
सांगण्यावरून नारोपंतास त्याच्यावर पाठविलें. नारोपंताने ओर्च्छा घेऊन व
त्यावर गाढवांचा नांगर फिरवून राजास कैद करून झांशीच्या किल्ल्यांत
ठेविलें. यानेंच झांशीची वसाहत केली व किल्ल्याची डागडुजी केली (१७४२);
ओर्च्छाचें ३०।३५ लाखांचें राज्य यानें खालसा करून स्वराज्यांत मिळविलें.
तेव्हां यालाच त्या प्रांताचे सुभेदार नेमण्यांत आलें. त्यानें झांशीस
राहून हा कारभार १४ वर्षे केला. यावेळीं त्यास जरीपटीका, साहेबी नौबत व १५
लाखांचा सरंजाम मिळाला होता. पुढें त्याच्याबद्दल कागाळ्या आल्यावरुन त्यास
पेशव्यांनीं परत बोलाविलें. नंतर तो गुजराथच्या व सावनूरच्या मोहिमांत हजर
होता (१७७५). या लढायांत त्यानें बराच पराक्रम गाजविल्यानें व पुढे
दत्ताजी शिंद्याच्या मध्यस्थीनें पेशव्यांची गैरमर्जी नाहींशी होऊन तो
पुन्हां उत्तरेकडे गेला (१७५७).
या
सुमारास अबदालीनें दिल्लीवर स्वारी केली, त्यावेळीं बादशहाचें रक्षण
करण्याचें काम याच्याकडे असतां, हा पळून गेला. ही त्याची नामर्दी पाहून
बादशहानें पेशव्यांकडे तक्रार केली. पुढें पानपतच्या वेळीं भाऊसाहेबानीं
दिल्लीचें रक्षण करण्याचें आणि रसद पोहोंचविण्याचें काम त्याच्यावर
सोंपवून, सुजाउद्दौला यास अबदालीकडून फोडण्याची कामगिरी सांगितली; परंतु
त्यांपैकी एकहि काम त्याच्याकडून पुरें झालें नाहीं. पानपतचा पळ दिल्लीस
आल्यानंतर मल्हारराव होळकर व नारोपंत हे दख्खनमध्यें निघाले. वाटेंत
नानासाहेब पेशव्यांची व यांची गाठ पडल्यावर त्यांनी या दोघांवर जबर ठपका
ठेवला. थोरल्या माधवरावानींहि यास नांवें ठेवल्यामुळें, हैदरअल्लीवरील व
निजामाविरुद्ध झालेल्या लढायांत हा पेशव्यांबरोबर हजर असें; त्यावेळीं
त्यानें चांगला पराक्रम करून त्यांचा राग घालविला.
No comments:
Post a Comment