यशवंतराव थोरात कोल्हापूरकर छत्रपती दुसरे संभाजीराजे भोसले यांचा सेनाखासखेल आणि प्रमुख आधारस्तंभापैकी एक होते. छत्रपती संभाजींनी त्याच्या शौर्यासाठी यशवंत राव यांना 'सेनाखासखेल' हा किताब दिला. यशवंतराव थोरात हे वारणा खो-यातला एक पिढीजात वतनदार होते. ते त्याच्या पदरी स्वतंत्र फौज बाळगून होते. छत्रपती संभाजींनी यशवंत राव यांना विजापूर प्रांतात ९ लक्ष उत्पन्नाचा प्रदेश जहागीर म्हणून दिला. त्यांनी आष्टा या ठाण्याला आपल्या कामकाजाचे मुख्यालय बनवले.1717 पर्यंत कराड आणि मिरजचा प्रदेश मुघल सेनापती पदुल्लाखानच्या ताब्यात होता. 1717 मध्ये यशवंतराव आणि संभाजी II यांच्यात गैरसमज झाल्यामुळे यशवंतराव छत्रपती शाहूं कडे गेले . त्यावेळी शाहूंना कराड आणि मिरजच्या प्रदेशावर आपले नियंत्रण प्रस्थापित करायचे होते. म्हणून शाहूंनी १७१७ मध्ये पदुल्लाखानविरुद्ध मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला. यशवंतराव आपल्या सैन्यासह या मोहिमेत सामील झाले. शाहूंच्या सैन्याने कराड येथील पदुल्लाखानच्या लष्करी छावणीवर हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्याने पदुल्लाखानचे सैन्य पांगले. मात्र काही वेळाने त्यांनीही पलटवार केला. लढाईच्या शेवटी पदुल्ला खानचा पराभव झाला आणि तो इस्लामपूरला पळून गेला . ही लढाई 'कराडची लढाई' म्हणून ओळखली जाते. कराडच्या लढाईनंतर कराड आणि मिरजेत शाहूंनी आपली सत्ता स्थापन केली. पण छत्रपती शाहू महाराज आणि यशवंतराव थोरात यांच्या मध्ये गैरसमज झाला . नंतर यशवंतराव पुन्हा कोल्हापूर छत्रपती कडे गेले .जेव्हा छत्रपती शाहूंनी बाळाजी विश्वनाथांना १७१९ मध्ये छत्रपती संभाजींच्या हद्दीतील आक्रमकतेमुळे दुसऱ्या छत्रपती संभाजीविरुद्ध कूच करण्याचा आदेश दिला. बाळाजीने प्रथम आष्टाकडे कूच करून ते ताब्यात घेतले. आष्टा यशवंतरावांच्या ताब्यात होती. त्यावेळी यशवंतराव विजापूरच्या हद्दीत होते. बालाजीबद्दल कळताच तो त्याच्याकडे निघाला. बाळाजी आणि यशवंतरावांचे सैन्य आपटीजवळ एकमेकांसमोर आले. शेवटी पन्हाळ्याच्या किल्ल्याजवळ बाळाजी आणि यशवंतराव यांच्यात पन्हाळ्याची लढाई झाली. युद्धात यशवंतराव भाल्याने जखमी झाले आणि काही वेळाने त्यात त्यांचा मृत्यू झाला. बाळाजीच्या सैन्याने महिनाभरानंतर माघार घेतली. युद्धात यशवंतरावांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी गोदाबाई 'सती' जातात. छत्रपती संभाजी द्वितीय यांनी पन्हाळ्याच्या मैदानाजवळ यशवंतराव आणि त्यांच्या पत्नीचे समाधी मंदिर बांधले.
(टीप - खाली दिलेली छायाचित्रे ही यशवंत राव थोरात आणि गोदाबाई थोरात यांच्या समाधीचे आहेत)
©
अक्षय विठ्ठलराव थोरात
(अनगरे ,ता. श्रीगोंदा )
(Director, Pinakine Remedies pvt Ltd Pune)
9527555631
No comments:
Post a Comment