भाग ४
लेखन ::सतीश राजगुरे
ब्रिटीशांनी
तात्काळ कारवाई करून सर्व संशयित तुकड्यांना नि:शस्त्र केले. प्रमुख
सैनिकांचे एकतर कोर्ट-मार्शल केले किंवा फाशी दिली किंवा त्यांना हद्दपार
तरी करण्यात आले. असे म्हणतात की, 30 जून 1857 रोजी किल्ल्याच्या
पूर्वेकडील भिंतीवर सुमारे नऊ सैनिकांना सशस्त्र उठाव केल्याबद्दल फाशी
देण्यात आली. नऊ जणांना फाशी देण्यात आली, त्या ठिकाणी एक दर्गा आहे जो 'नव
गज अली बाबा'चा दर्गा म्हणून ओळखला जातो.
ब्रिटीश
सरकारने भारतात सत्ता हाती घेतल्यावर नागपूरकचे अनियमित पोलीस दल बरखास्त
करून नवीन पोलीस दलाची स्थापना करण्यात आली. नोकरीवरून काढून टाकलेल्या
लोकांचा इंग्रजांविरुद्ध राग होताच. त्यांचा संताप पाहून किल्ल्यात
पायदळासह सुमारे एक लोखंडी तोफ, दोन पितळी तोफा आणि दोन लोखंडी अशा पाच
तोफा तैनात करण्यात आल्या.
राजा
पाचवा जॉर्ज आणि क्वीन मेरी यांनी तब्बल 54 वर्षांनी नागपूरला भेट दिली.
त्यानंतर सीताबर्डी किल्ल्यातच त्यांचे वास्तव्य होते. त्यावेळी त्यांनी
किल्ल्याच्या पूर्वेकडील लोकांना संबोधित केले. या किल्ल्यावर 15 एप्रिल ते
23 मे 1923 दरम्यान सुमारे 36 दिवस महात्मा गांधीं होते, परंतु कैदी
म्हणून. गांधीजींना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करून येथे आणण्यात आले
होते.
नियमित
लष्करी सैनिकांना पदमुक्त केल्यानंतर त्यांना नागरी प्रशासनाच्या
मदतीसाठी तैनात करण्यात आले. त्यासाठी इंग्रजांनी ऑगस्ट 1939 मध्ये
सीताबर्डी किल्ल्यात 7 सेंट्रल प्रोव्हिन्स (CP) अर्बन बटालियन इंडियन
टेरिटोरियल फोर्सची स्थापना केली. फोर्सचीदुसरी कंपनी अमरावतीत तैनात
होती. भारताच्या स्वातंत्र्यानंतर, 1949 मध्ये त्याची पुनर्रचना 118
बटालियन (प्रादेशिक सैन्य) अशी करण्यात आली. आजही प्रादेशिक सैन्याची 118
वी बटालियन सीताबर्डी किल्ल्यात असते. 26 जानेवारी, 1 मे (महाराष्ट्र दिन)
आणि 15 ऑगस्ट रोजी किल्ला सर्वसामान्यांसाठी खुला केला जातो.
No comments:
Post a Comment