विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 4 November 2023

लाडोजीराव नरसिंहराव शितोळे

 

शितोळे घराण्याचे मूळपुरुष 'जानराव' हे होते. त्यांना पाटसचे देशमुखी वतन मिळाले होते. या घराण्यातील बाळाबाई या महादजी शिंदे यांच्या कन्या,

लाडोजीराव नरसिंहराव शितोळे यांना दिल्या होत्या. लाडोजीराव यांना 'राजा देशमुख बहादुर रुस्तुमेजंग' अशी पदवी होती. ते मध्य प्रदेशमध्ये पोहरी येथे स्वतःचे ठाणे करुन राहत होते. ब्रिटिश अमदानीत 'पोहरी' संस्थान झाले व त्यांचे वंशज संस्थानिक झाले. या घराण्याला पुणे आणि परिसरातील अनेक देशमुखी वतने होती. मुघल बादशाहाकडून सुद्धा या घराण्यास हरियानामध्ये इनामे होती. पेशव्यांच्या कारकिर्दीत खर्ड्याच्या लढाईत शितोळ्यांच्या संबंध आला होता. त्या वेळी पाटस ही लष्करी छावणी होती. पाटस कसब्यात सात गावे असून तीनशेहून अधिक गावच्या देशमुखीचा महसुलाचा कारभार शितोळे-देशमुखांकडे होता.
फोटो- शितोळे देशमुख वाडा
(पाटस, पुणे)

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...