पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील मुर्टी-मोडवे गावात मराठा सरदार पुरंदरे यांची भव्य गढी आहे. मुर्टी-मोडवे हे गाव चौफुला बारामती रस्त्यावर आहे. अष्टविनायकातील पहिला गणपती मोरगावपासून १३ कि.मी अंतरावर आहे. गावात प्रवेश करतानाच रस्त्यावरून आपल्याला दोन गढ्या दिसतात. एक गढी सरदार पुरंदरेंची तर दुसरी गढी सरदार मोरे घराण्याची. ह्या लेखात आपण सरदार पुरंदरे गढीबद्दल माहिती घेणार आहोत.
पुरंदरे गढीची एकदम भक्कम तटबंदी आपल्याला आकर्षित करते. एकदम सुस्थितीत आहे. ४ बुरूज, भक्कम तटबंदी, भव्य प्रवेशद्वार ही वैशिष्ट्ये आहेत गढीची. आतमध्ये एक भक्कम वाडा आहे. पण सद्यस्थितीत वाड्यात कोणीही रहात नाही. त्या वाड्याचे सागवानी प्रवेशद्वार त्यावर कोरलेले गणेश शिल्प एकदम अप्रतिम. वाड्यास पाणीपुरवठा करण्यासाठी खापरी नळाची व्यवस्था केलेली आहे. आत संपूर्ण तटबंदी पहाता येते. चुन्याची घाणी आहेत.
'लोकरस' ऊर्फ 'वाघ' पुरंदरे हे इ.स. १७०० पर्यंत पुरंदर किल्ल्याचे सुभेदार होते. पुरंदरे हे घराणे मूळ सासवड-सुप्याला स्थायिक झाले. त्यानंतर त्याच्या दोन ● शाखा झाल्या. त्यापैकी अंबाजी त्र्यंबक यांना 'सुपे' तर तुको त्र्यंबक यांना 'मोडये" हे गाव मिळाले व त्यांनी त्या त्या ठिकाणी वस्ती केली व वाडे बांधले.
राजाराम महाराजांच्या वेळेस जिंजीच्या वेढ्यात शंकराजी नारायण, रामचंद्रपंत अमात्य, धनाजी जाधव, संताजी घोरपडे हे लढत होते. त्या वेळी जुल्फिकारखानाने मार्गशीर्ष वद्य ३ शके १६१४ मध्ये जिंजीचा वेढा उठविला. राजाराममहाराजांनी या कामगिरीबद्दल काही लोकांना बक्षिसे देऊन त्यांचा गौरव केला. धनाजी जाधवांच्या लष्करात तुको त्र्यंबक पुरंदरे होते. त्यांना त्यांच्या गावी दोन जमिनी दिल्या. शके १६१४ च्या फाल्गुन महिन्यात तुकोपंत यांनी धनाजी जाधवांबरोबर जाऊन सनदा घेतल्या. तुको त्र्यंबक व अंबाजी या बंधुद्रयाशिवाय त्यांचे चुलत बंधू काशी विश्वनाथ गिरमाजी विश्वनाथ व भाऊबंद चिंतो महादेव वगैरे हे आपापल्या मगदुराप्रमाणे राजकारणात भाग घेत.
या घराण्यावर सेनापती धनाजी जाधवांची मर्जी होती. शाहूराजे मोगली कैदेतून सुटून येताच अंबाजी पुरंदर्यांचा पुतण्या मल्हार तुकदेव हे खानदेशात लांबकानीच्या मुक्कामात शाहूला येऊन मिळाले. त्यामुळे धनाजीरावांना ताराराणींच्या पक्षातून फोडणे सुलभ झाले. अंबाजीपंत हे पेशव्यांचे मुतालिक झाले. पुढे मल्हार तुको व दादासाहेब मुतालिकी चालवू लागले.
सनद
श्री धर्म प्रा धोतेता शेष व णीदाशण थेरिव । राजारामस्यमुद्रे । यं विश्ववंधा । विराजते । स्वस्ति श्री राज्याभिषेक शके १९ अंशिरानाम संवत्सरे फाल्गुन सुध वितीया इंदू वासरे क्षत्रीये कुलावंतस श्री राजाराम छत्रपती याणी तुको त्रिमल पुरंदरे कुलकर्णी व जो तिस्ते मौ जे सुपे ।। ।। सुपे यांसी दिल्हे
जैसे जे सक्ष नृहरीप्रीत मुद्रा नीराजी जन्मनः॥ राजा राम प्रतिनिधेः प्रह्लादस्य विराजते । तुम्ही चंद्रीचे मुक्कामी स्वामी सनिध येऊन विदित केले की स्वामी धर्म प्रभु आहेत कितेका वृत्तीपत्ताचा उधार केला हे कीती यैकोन वृत्तीच्या उदेशेसेवेशी आलो आहे तरी स्वामीने कृपाळू होऊन नूतन वृत्ती करून देविलिया स्वामीचे अन्न भक्षून सार्वकाल स्वमसि कल्याण चिंतून सुखरूप वृत्ती अनभवून असेन म्हणून श्रुत् केले. त्यावर मनास आणो ना तुमच्या पुरातन वृत्तीने योगक्षम चालत नाही पैसे जाणून स्वामी तुम्हावरी कृपाळू होऊन नूतन इनाम अजरामरामत करून दिश असे जमीन विघा पोडाव्या विधी याने चावर ॥ निमचावरास कुलवाव कुलुबानु हलिपटी व पेस्तर पट्टी देखिल इनाम दिधला असे सदरहू जमीन चावर मौजे खुर्द प ॥ सुपे पैकी स्थल ब्राह्मणीस हे भूमी आपले स्वाधीन करून घेऊन तुम्ही तुमचे पुत्र पौत्रिकादिप वंशपरंपरेने अनुभवून सुखरूप असणे यास कोणी अन्याय करील त्यास आपापले स्वधर्माची आण असे जाणिजे निदेश समक्ष (मर्या । देयं विरा । जते) सदर सनदेवर छ. राजाराम महाराजांची मुद्रा व प्रल्हाद निराजी या प्रतिनिधींचा शिक्का आहे.
वरील सनदेवरून हे लक्षात येते की, राजाराम महाराजांच्या कारकीर्दीत तुको पुरंदऱ्यांना इनाम जमीन सुपे व ब्राह्मणी या गावी दिल्याचे समजते. या पत्रावरून आणखी एक गोष्ट लक्षात येते की, तुको पुरंदरे यांनी हे इनामपत्र जिंजी येथे जाऊन राजाराम महाराजांकडून करवून आणले.
No comments:
Post a Comment