ईतिहासीक योद्धा #नरवीर सूर्याजी मालुसरे #साखर #पोलादपूर येथील समाधीस्थळ उपेक्षित... कोणीही लक्ष देईना.....
हिंदवी स्वराज्यातील तहामध्ये गमावलेले किल्ले परत भगव्याखाली आणण्याच्या मोहिमेची सुरुवात कोंढाणा किल्ला ताब्यात घेऊन कामगिरी फत्ते करून करण्यात आली. याकामी तान्हाजी मालुसरे धारातिर्थी पडले तर मावळ्यांमध्ये वीरश्री संचारण्यासाठी त्यांचे बंधू नरवीर सूर्याजी मालुसरे यांनी दिलेली ’बाप धारातिर्थी पडला म्हणून पळून का रे जाता? गडाचा दोर कापला आहे…लढून मरा नाहीतर उड्या टाकून मरा…’ ही चिथावणी इतिहासात अजरामर झाली. छत्रपती शिवाजी महाराजांसोबत अखेरच्या श्वासापर्यंत लढावूपणे साथ देणार्या नरवीर सूर्याजी मालुसरे यांचा मृत्यू साखर येथे झाल्यानंतर त्यांच्या पत्नीने पार्थिव मांडीवर घेऊन सती जाण्याचा निर्णय घेतला. ही समाधी साखर येथे गेल्या अनेक वर्षांपासून उपेक्षित अवस्थेत दिसून येत असल्याची खंत साखर येथील वंशज अनिल ज्ञानोबा मालुसरे यांनी व्यक्त केली.
तानाजी मालुसरे यांचे बंधु सूर्याजी मालुसरे यांचे समाधीस्थळ पोलादपूर तालुक्यातील साखर याठिकाणी असून त्याकडे शासनाचे पूर्णपणे दुर्लक्षित पणा होत असल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. पोलादपूर तालुक्यातील दुर्गम डोंगराळ भागात वसलेले साखर गाव याठिकाणी तानाजी मालुसरे यांचे बंधु सूर्याजी मालुसरे व त्यांच्या पत्नी सती यांचे समाधीस्थळ आहे. याठिकाणी विशेष आकर्षण म्हणजे सती यांच्या समाधीस्थळ येथे असलेले पिंपळाचे झाड अनेकदा तोडूनही पुन्हा पून्हा निर्माण होत असते त्यामुळे या समाधीला जिवंत समाधी मानले जाते. मात्र याठिकाणी जाणारा रस्ता बिकट असून समाधीस्थळ परिसरात गवताचा वेडा निर्माण झाला आहे.
तानाजी चित्रपटानंतर नरवीर तानाजी मालुसरे यांच्या उमरठ या समाधीस्थळी पर्यटकांची रेलचेल वाढली आहे व त्यातील काही पर्यटक सूर्याजी मालुसरे यांच्या समाधीस्थळी सुद्धा जाऊ लागले आहेत मात्र याठिकाणी पुर्णपणे असुविधा असल्याचे पाहायला मिळत आहे व येणारे पर्यटक इतिहास प्रेमी नाराज होत आहेत.इतिहासकाळातील महत्वाचा दुवा असणारी ही महत्वाची स्थळे शासनाने जतन करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत व इतिहास प्रेमींना अमूल्य असा ऐतिहासिक वारसा जपायला हवा अशी इतिहास प्रेमींची मागणी आहे.उमरठ येथे येणाऱ्या शिवप्रेमींना तानाजी यांचे भाऊ सूर्याजी मालुसरे यांच्या समाधीस्थळ देखील पाहता यावे व तेथे सुद्धा सोयी सुविधा मिळाव्या अशी मागणी होत आहे.
साद सह्याद्री प्रतिष्ठान याबाबत लवकरच एक कार्यक्रम घेणार आहे..
फोटो. दर्शन जंगम #महाड_रायगड
No comments:
Post a Comment