विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 14 December 2023

१५ डिसेंबर इ.स.१८५७ कोल्हापूरकरांचे १८५७ मधील बंड

 

१५ डिसेंबर इ.स.१८५७
कोल्हापूरकरांचे १८५७ मधील बंड
उत्तरेत जसा इंग्रजांविरूध्दच्या बंडाचा रेटा अधिक होता त्या प्रमाणे दक्षिणेत ही बंड चालूच होते.
कोल्हापूरच्या राजापेक्षा त्यांचा धाकटा भाऊ चिमासहेबाने बिघडलेली घडी पुन्हा बसविण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूरच्या खाजगी सैन्यात इतर लढ्वय्यात फारच कसोशीने गुप्त तयारी चालविली व ता.१५ डिसेंबर १८५७ च्या पहाटे कोल्हापूर शहर पुन्हा एकदा बंड करून उठले. शहरातील तोफा मोर्चावर उभारल्या गेल्या. दरवाजे बंद झाले व जिकडेतिकडे स्वातंत्र्याची नौबत धडाडली. जेकबने आपल्या हाताखालील लोकांस सज्ज करून शहरातील एका कच्च्या दरवाजाने जेव्हा प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तेव्हापासून तो इंग्रजी सैन्य राजवाड्याच्यापाशी लगटेपर्यंत लढाई चालू होती. पराजय होताच नेहमीच्या डावाप्रमाणे छत्रपतीने सांगितले की फौजेने व लोकांनी मला न जुमानता बंड उभारले होते. बंडाचे पुढारी कोण हे कळण्यासाठी जेकबने वाटेल तितके प्रयत्न केले;परंतु जो कोणी धरला जाई त्याने त्याच्या पलीकडे कधीही मागमूस लागू दिला नाही. एका पुढाऱ्याने तर त्याला पकडण्यात आल्यावर आपल्याजवळ असलेले आक्षेपार्ह पत्र अधिकाऱ्यांच्यासमक्ष फाडून गिळून टाकले. दुसऱ्या एकाला तोफेच्या तोंडी बांधीत असता त्याने चुकून नाव घेतले,ते ऐकताच जवळ असलेल्या नेटिव्ह सरकारी नोकरांपैकी एक नाहीसा झाला व त्याने त्या पुढाऱ्याला ही वर्दी दिली तेव्हा तो पुढारी फरार झाला. चिमासाहेबाला मात्र एकटे गाठून हद्दपार करण्यात आले. अशा परस्परविश्वासाने क्रांतिकारक,कटवाले एकमेकांशी बांधलेले असत आणि याच पध्दतीने निरनिराळ्या गटांना एकत्रित करण्यात येत होते.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...